पोषण आणि त्याचे महत्व (Nutrition & it’s importance)

मानव हा अन्नासाठी पूर्णपणे वनस्पतीवर किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून असल्यामुळे तो परपोषी आहे.  अन्नामधील विविध घटकाला पोषकद्रव्ये  असे म्हणतात. मानवाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असणारे पोषण आणि त्याचे महत्व (Nutrition & it’s importance) जाणून घेण्यासाठी  महत्वाची असणारी काही पोषणद्रव्ये-

 1. कर्बोदके (Carbohydrates)
 2. प्रथिने (Protine)
 3. मेद (Fat)
 4. जीवनसत्वे (Vitamine)
 5. क्षार/खनिजे (Minerals)

याबद्दलची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-

१) कर्बोदके (Carbohydrates)

 • नावाप्रमाणेच कर्बोदके कार्बन, आॅक्सीजन व हायड्रोजन यांच्या अणूपासून बनलेली असतात.
 • काही कर्बोदके पाण्यात विरघळतात, त्यांना शर्करा असे म्हणतात.
 • मानवाला दैनंदिन जीवनात मिळणार्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे ६० ते ७० टक्के ऊर्जा ही फक्त कर्बोदकांपासून मिळते.
 • १ ग्रॅम कर्बोदकापासून साधारण ४ कॅलरी ऊर्जा मिळते.
 • शरीराच्या गरजेनुसार ती आपल्याला ऊर्जा देतात व उरलेले यकृतामध्ये ग्लुकोजच्या रूपात तर स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या रूपात साठवली जातात.
 • पाण्यात विरघळणार्या कर्बोदकाद्वारे कोलेस्ट्राॅलचे शोषण केले जाते व अविद्राव्य कर्बोदकांद्वारे मलोत्सर्जनास मदत होते.
 • कर्बोदकांचे स्ञोत- गहू, तांदूळ, बटाटे, रताळी, मुग, मका, दूध, दुधाचे पदार्थ इ
 • कर्बोदकातील साखरेच्या रेणूचे प्रमाण यानुसार त्यांचे प्रमूख तीन गटांत वर्गीकरण केले जाते.

एकशर्करेय (Monosaccharides)- ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, ग्लिसराल्डिहाईड, रायबोज, इ.

द्विशर्करेय (Disaccharides)- माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज, इ.

बहुशर्करेय (Polysaccharides)- स्टार्च, ग्लायकोजन, गम, सेल्युलोज, इ.


२) प्रथिने (Protine)

 • प्रथिने हा शब्द प्रोटिआेज या ग्रीक श्दापासून आला असून प्रथिने अॅमिनोआम्लापासून बनलेले असतात.
 • मानवाला दैनंदिन जीवनात मिळणार्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे १० ते १२ टक्के ऊर्जा ही फक्त प्रथिनांपासून मिळते.
 • सर्व विकरे () तसेच बहुतांशी संप्रेरके () ही प्रथिनांपासून बनलेली असतात.
 • शरीरबांधणीसाठी ( केस, नखे, त्वचा)  प्रथिने उपयुक्त असतात.
 • ५ वर्षाखालील बालकांच्या आहारातील प्रथिनांच्या अभावामुळे त्याना सुकटी , सुजवटी/चंद्रमुखी हा विकार जडला जातो. वाढ खुंटणे, वजन कमी होणे, पोट फुगणे, अॅनिमिया, त्वचा सैल होणे, पातळ केस ही त्याची लक्षणे आहेत.
 • प्रथिनांचे स्ञोत- काजू, बदाम, पालेभाज्या, डाळी, शेंगा, दूध, अंडी, मांस इ

३) मेद/स्निग्ध पदार्थ (Fat)

 • कार्बन, आॅक्सीजन व हायड्रोजन यांच्या रेणूपासून बनलेले व पाण्यात अविद्राव्य असणारे चरबीयुक्त पदार्थ म्हणजेच मेद होय.
 • मानवाला दैनंदिन जीवनात मिळणार्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे १५ ते २० टक्के ऊर्जा ही फक्त मेदांपासून मिळते.
 • शरीराला बाकी पोषणद्रव्यांच्या तुलनेने मेदापासून जास्त ऊर्जा मिळते व ती म्हणजे १ ग्रॅम मेदापासून ९ कॅलरी ऊर्जा.
 • त्चचेखाली असणारे मेद आपल्या शरीराचे तापमान नियंञित ठेवतात.
 • शरीरात बरीचशी संप्रेरके मेदाच्या स्वरूपात असतात. उदा. इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्राॅन, टेस्ट्रोस्टेराॅन, इ.
 • कोलेस्ट्राॅल हेदेखील एक मेदच आहे ज्याचे प्रमाण मानवी शरीरात सुमारे ६० ग्रॅम असते परंतु रोज त्यापैकी फक्त १ ग्रॅमच वापरले जाते.
 • मेदाचे स्ञोत- शेंगदाणे, सोयाबीन, सरकी, मोहरी, दूध, लोणी, तूप, अंडी, मांस इ

४) जीवनसत्वे (Vitamine)

 • जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)- ब आणि क
 • स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) – अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.

अ जीवनसत्व (A)  

 

 • पाण्यात विरघळत नाही, पण मेदात विरघळते.
 • अ-जीवनसत्त्वामुळे द्ष्टी चांगली राहते, हाडांची वाढ होते आणि फुफ्फुसे व रक्त यांचे पोषण होते.
 • या जीवनसत्त्वामुळे शरीराचे जंतुसंसर्गापासून संरक्षण होते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो.
 • गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध, लोणी, चीज, प्राण्याचे यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक इ. मध्ये अ जीवनसत्व असते.

ब जीवनसत्व (B)

ब   (थायमीन), ब   (रायबोफ्लेवीन), ब   (नायासीन) , ब  , ब  (पायरिडॉक्सिन), ब  , ब   (फॉलीक ऍसीड), ब १२  (सायनोकोबलामाईन) हे याचे मुख्य प्रकार आहेत. ‘ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे तोंड येणे. गालांवर चट्टे येणेतोंडाच्या आत फोड येणे या खुणा दिसतात. ओठांच्या कडा चिराळतात.


क जीवनसत्व (C)

 • त्वचा मुलायम व चकचकीत राहते यामुळे याला वार्ध्यक्यविरोधी जीवनसत्व असेही म्हणतात.
 • लाल रक्तपेशीमचे प्रमाण नियंञित ठेवणे, रोगांचा सामना करणे, रक्त गोठवणे ही याची कार्ये आहेत.
 • क जीवनसत्वाअभावी स्कर्व्ही रोग होतो. हाडातील कॅल्शियम कमी होते. किडनी स्टोन निर्माण होतो.
 • या जीवनसत्वाचे मुख्य स्ञोत म्हणजे लिंबू, संत्रेमोसंबीआवळा, अननस, द्राक्षे, टोमॅटो, पालक, कोबी, केळी, पेरू इ.

ड जीवनसत्व (D)

 • हाडांमध्ये व दातांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी ‘ जीवनसत्त्वाची गरज असते. याच्या अभावी लहान मुलांमध्ये मुडदूस व मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थिमृदूता विकार जडतात.
 • सूर्यप्रकाशात (विशेषत: कोवळे ऊन) त्त्वचेखाली ‘ड’ जीवनसत्त्व तयार होत असते. दूध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व भरपूर असते. 

इ जीवनसत्व (E)

 •  इ-जीवनसत्व पाण्यात विरघळत नाही परंतु मेदात विरघळणारे आहे.
 • पुनरूत्पादन संस्थेत हे जीवनसत्व महत्वाचे कारय बजावते म्हणून याला वांझपणा विरोधी जीवनसत्व असेही आेळखले जाते.
 • सर्व वनस्पती तेल या याच्या मुख्य स्ञोत आहेत.

के जीवनसत्व (K)

रक्त गोठण्याच्या कार्यात मदत करते.  याच्या अभावामुळे अॅनेमिया, कावीळ हे रोग उद्भवतात. पालक, कोबी, दुध, कडधान्ये, यकृत इ  हे याचे मुख्य स्ञोत आहेत.


 • यापैकी काही महत्वाची खनिजे पुढिलप्रमाणे

कॅल्शियम (Calcium) 

हाडे व दात यांच्या वाढीसाठी व मजबूतीकरणााठी कॅल्शियम अतिशय उपयुक्त खनिज आहे. कॅल्शियमअभावी लहान मुलांमध्ये मुडदूस व मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थिमृदूता हे विकार जडतात. मुख्य स्ञोत पालक, मेथी, अळू, राजगीरा, मिहरीची पाने, कठीण कवचाची फळे, तेलबिया, नाचणी हे आहेत.

लोह (Iron) 

शरीरामध्ये सर्वाधिक लोह रक्तामध्ये आढळते व काही अंशी यकृत, मूञपिंड या इंद्रियांमध्ये असते. लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय हा रोग उद्भवतो व अतिसंचयनामुळे सिडेराॅसिस हा रोग होतो. शरीरातील वेगवेगळ्या भागात आॅक्सीजन पुरवण्याचे महत्वपूर्ण कार्य करणारे हिमोग्लोबीन लोहयुक्त असते.

फाॅस्फरस (Phosphorus) 

हाडाचे व दाताचे बळकटीकरण करण्याचे महत्वपूर्ण कार्य. फाॅस्फरस हे डी. एन. ए. व आर. एन. ए. चा अतिशय महत्वाचा घटक आहे. याच्या कमतरतेमुळे दातांची व हाडांची अपूर्ण वाढ, सांधेदुखी, भूक न लागणे, वाढ खुंटणे या समस्या उद्भवतात. याचे मुख्य स्ञोत भाज्या, डाळी, पूर्ण एकदल धान्ये, कठीण कवचाची फळे, दूध व दूग्धजन्य पदार्थ ही आहेत.

आयोडीन (Iodine) 

थायराॅईड ग्रंथीकडून स्ञवले जाणारे पोषणतत्व. शरीराची वाढ व विकास होण्यासाठी महत्वपूर्ण. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. यामुळे मानवाची मानसिक कार्यक्षमता कमी होते. याचे मुख्य स्ञोत आयोडीनयुक्त मीठ, फळे, पालेभाज्या, मासे, मांस, अंडी हे आहेत.