पृथ्‍वी आणि वृत्ते

कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते. ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते. ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरले जाते.

विषुववृत्त हे ०° चे अक्षवृत्त समजतात. त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात. हे सर्वांत मोठे अक्षवृत्त (बृहतवृत्त) आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर अाणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान-लहान होत जातात. पृथ्वीगोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टाेकांना ती बिंदुस्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे
उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात.

अक्षवृत्तांची मूल्ये सांगताना ती अक्षवृत्ते उत्तर गोलार्धात आहेत की दक्षिण गोलार्धात आहेत हे सांगणे आवश्यक असते. उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तांचा ५° उ., १५° उ.,३०° उ., ५०° उ. तर दक्षिण गाेलार्धातील ५° द., १५°द., ३०°द., ५०°द. असा उल्लेख केला जातो.

पृथ्वीवर प्रत्येकी १° च्या अंतराने एकूण १८१ अक्षवृत्ते काढता येतात.

 1. ०° चे विषुववृत्त.
 2. १° ते ९०° अशी उत्तर गोलार्धातील ९० अक्षवृत्ते.
 3. १° ते ९०° अशी दक्षिण गोलार्धातील ९० अक्षवृत्ते.

उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या अर्धवर्तुळाकार रेषा काढता येतात. याप्रमाणे ‘अम’ पासून प्रत्येक अंशावर अर्धवर्तुळे काढता येतात. यांना रेखावृत्त म्हणतात. रेखावृत्तांपैकी एक रेखावृत्त ०° मानले जाते. ०° रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात. या रेखावृत्तापासून
इतर रेखावृत्तांची कोनीय अंतरे अंशामध्ये सांगितली जातात. त्यांना रेखांश म्हणतात. जसे तुम्ही आकृती १.९ ची कृती करताना मोजलेत. ०° रेखावृत्त व १८०° ही रेखावृत्तेपृथ्वीगोलावर एकमेकांसमोर येतात. त्यांच्यामुळे तयार होणारे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध व पश्चिम गाेलार्ध अशी विभागणी करते. अक्षवृत्ते जशी ध्रुवांकडे लहान लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत. सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात.

लगतच्या कोणत्याही दोन अक्षवृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते. लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते. पृथ्वीच्या गोल आकारामुळे विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धात या रेखावृत्तांमधील अंतर कमी कमी होत जाते, तर दोन्ही ध्रुवांवर ते अंतर शून्य इतके असते. लगतच्या कोणत्याही दाेन अक्षवृत्तांमधील पृथ्वीपृष्ठावरील अंतर १११ किमी असते. तसेच विषुववृत्तावर लगतच्या कोणत्याही दोन रेखावृत्तांमधील अंतर १११ किमी असते. १११ किमी दरम्यान असलेल्या
ठिकाणांची अचूक स्थाने सांगण्यासाठी, अंशाची विभागणी लहान एककात करावी लागते. अंशाची ही विभागणी मिनिट या एककात तर मिनिटाची विभागणी सेकंद या एककात केली जाते. अक्षांश व रेखांश यांची मूल्ये अंश, मिनिट, सेकंद या एककामध्ये सांगण्याची पद्धत आहे. यामध्ये अंशाचे ६० भाग होतात व प्रत्येक भाग एक मिनिटाचा असताे. तसेच मिनिटाचे ६० भाग होतात व प्रत्येक भाग एक सेकंदाचा असतो. ही मूल्येचिन्हांनी पुढीलप्रमाणे दाखवता येतात. अंश (… °), मिनिट(…’ ), सेकंद (…’ ‘ )

कोणत्याही दोन रेखावृत्तां दरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते तर ध्रुवांवर हे अंतर शून्य असते.

 1. विषुववृत्त – १११ किमी
 2. कर्कवृत्त/मकरवृत्त – १०२ किमी
 3. आर्क्टिक/अंटार्क्टिक वृत्त – ४४ किमी
 4. उत्तर/दक्षिण ध्रुव – ० किमी

प्रत्येकी १° च्या अंतराने एकूण ३६० रेखावृत्ते काढता येतात.

 1. ०° मूळ रेखावृत्त
 2. १८०° रेखावृत्त
 3. १° पूर्व ते १७९° पूर्व रेखावृत्ते, म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण १७९ रेखावृत्‍ते असतात.
 4. १° पश्चिम ते १७९° पश्चि म रेखावृत्ते, म्हणजेच पश्चिम गाेलार्धा त एकूण १७९ रेखावृत्‍ते असतात.

विषुववृत्तापासून २३°३०’ उत्तर तसेच २३° ३०’ दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागांत सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. २३° ३०’ उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व २३°३०’ दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात.

विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील ६६° ३०’ ही दोन अक्षवृत्तेदेखील महत्त्वाची आहेत. विषुववृत्त ते ६६° ३०’ उत्तर व दक्षिण अक्षवृत्तेयादरम्यान वर्षभरात २४ तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना अनुक्रमे आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात.

६६° ३०’ उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून ९०° उत्तर व ९०° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो. हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त ६ महिन्यांचा असतो. येथे दिनमानाच्या
काळात आकाशात सूर्यक्षितिज समांतर दिसतो.

०° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त (Prime Meredian) म्हणून महत्त्वाचे आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ‘ग्रिनिचचे रेखावृत्त’ (G.M.T= Greenwich Mean Time) म्हणूनही ओळखले जाते.

१८०° रेखावृत्त हेही एक महत्‍त्‍वाचे रेखावृत्‍त आहे. मूळ रेखावृत्‍तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे १८०° ेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्‍ते काढली जातात. १८०° रेखावृत्ता संदर्भान े ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ विचारात घेतली जाते. विषुववृत्त हे बृहतवृत्त अाहे तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्तेमिळून बृहतवृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होतो.