पद्मविभूषण

पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट सेवा/कार्याचा सन्मान करण्यासाठी प्रदान केला जातो.

पद्मविभूषण पुरस्काराबाबत महत्वाच्या बाबी

  1. १९५४ पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
  2. सर्वप्रथम सी. राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी. व्ही. रमण यांना १९५४ मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  3. तेंव्हापासून एकूण ४५ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यापैकी १२ जणांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
  4. सुरुवातीस मरणोत्तर पद्मविभूषण देण्याबाबत तरतूद नव्हती. मात्र १९५५ मध्ये अशी तरतूद करण्यात आली.
  5. सर्वप्रथम लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला.
  6. तसेच सुरुवातीस कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार मर्यादित होता. मात्र २०११ मध्ये सरकारने “कोणत्याही क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सेवा/कार्यासाठी” असा निकष केला.  त्यानुसार सचिन तेंडुलकरला २०१४ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. पद्मविभूषण मिळवणारा तो पहिला खेळाडू आहे.
  7. सचिन तेंडुलकर (४०) हा पद्मविभूषण मिळवणारा सर्वात तरुण व्यक्ती तर धोंडो केशव कर्वे (१००) हे सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत.
  8. सामान्यपणे जन्माने भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला असला तरी, मदर तेरेसा या स्वीकृत नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला तर खान  अब्दुल गफारखान (पाकिस्तान) आणि नेल्सन मंडेला (द. आफ्रिका) या दोन परकीय नागरिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.     
  9. पद्मविभूषण पुरस्कार १९७७ ते १९८० (सरकार बदलल्यामुळे) आणि १९९२ ते १९९५ (पुरस्कारांच्या संवैधानिकतेबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल  करण्यात आल्याने) या काळात संस्थगित करण्यात आले होते.
  10. १९९२ मध्ये सुभाषचंद्र बोस यांना “मरणोत्तर” पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत असलेल्या वादामुळे पुरस्कार रद्द करण्यात आला.

  11. १. १९५४ – डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर, १८८८ – १७ एप्रिल, १९७५)
    २. १९५४ – चक्रवर्ती राजगोपालाचारी (१० डिसेंबर, १८७८ – २५ डिसेंबर, १९७२)
    ३. १९५४ – डॉक्टर चन्‍द्रशेखर वेंकटरमण (७ नोव्हेंबर, १८८८ – २१ नोव्हेंबर, १९७०)
    ४. १९५५ – डॉक्टर भगवान दास (१२ जानेवारी, १८६९ – १८ सप्टेंबर, १९५८)
    ५. १९५५ – सर डॉ॰ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१५ सप्टेंबर, १८६० – १२ एप्रिल, १९६२)
    ६. १९५५ – पं. जवाहर लाल नेहरु (१४ नोव्हेंबर, १८८९ – २७ मे, १९६४)
    ७. १९५७ – गोविंद वल्लभ पंत (१० सप्टेंबर, १८८७ – ७ मार्च, १९६१)
    ८. १९५८ – डॉ॰ धोंडो केशव कर्वे (१८ एप्रिल, १८५८ – ९ नोव्हेंबर, १९६२)
    ९. १९६१ – डॉ॰ बिधन चंद्र रॉय (१ जुलै, १८८२ – १ जुलै, १९६२)
    १०. १९६१ – पुरूषोत्तम दास टंडन (१ ऑगस्ट, १८८२ – १ जुलै, १९६२)
    ११. १९६२ – डॉ॰ राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर, १८८४ – २८ फेब्रुवारी, १९६३)
    १२. १९६३ – डॉ॰ जाकिर हुसैन (८ फेब्रुवारी, १८९७ – ३ मे, १९६९)
    १३. १९६३ – डॉ॰ पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२)
    १४. १९६६ – लाल बहादुर शास्त्री (२ ऑक्टोबर, १९०४ – ११ जानेवारी, १९६६), मरणोत्तर
    १५. १९७१ – इंदिरा गाँधी (१९ नोव्हेंबर, १९१७ – ३१ ऑक्टोबर, १९८४)
    १६. १९७५ – वराहगिरी वेंकट गिरी (१० ऑगस्ट, १८९४ – २३ जून, १९८०)
    १७. १९७६ – के. कामराज (१५ जुलै, १९०३ – १९७५), मरणोत्तर
    १८. १९८० – मदर टेरेसा (२७ ऑगस्ट, १९१० – ५ सप्टेंबर, १९९७)
    १९. १९८३ – आचार्य विनोबा भावे (११ सप्टेंबर, १८९५ – १५ नोव्हेंबर, १९८२), मरणोत्तर
    २०. १९८७ – खान अब्दुल गफ्फार खान (१८९० – २० जानेवारी, १९८८), पहले गैर-भारतीय
    २१. १९८८ – एम जी आर (१७ जानेवारी, १९१७ – २४ डिसेंबर, १९८७), मरणोत्तर
    २२. १९९० – बाबा साहेब डॉ॰ भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), मरणोत्तर
    २३. १९९० – नेल्सन मंडेला (१८ जुलै, १९१८ – ५ डिसेंबर, २०१३), दूसरे गैर-भारतीय
    २४. १९९१ – राजीव गांधी (२० ऑगस्ट, १९४४ – २१ मे, १९९१), मरणोत्तर
    २५. १९९१ – सरदार वल्लभ भाई पटेल (३१ ऑक्टोबर, १८७५ – १५ डिसेंबर, १९५०), मरणोत्तर
    २६. १९९१ – मोरारजी देसाई (२९ फेब्रुवारी, १८९६ – १० एप्रिल, १९९५)
    २७. १९९२ – मौलाना अबुल कलाम आज़ाद (११ नोव्हेंबर, १८८८ – २२ फेब्रुवारी, १९५८), मरणोत्तर
    २८. १९९२ – जे आर डी टाटा (२९ जुलै, १९०४ – २९ नोव्हेंबर, १९९३)
    २९. १९९२ – सत्यजीत रे (२ मे, १९२१ – २३ एप्रिल, १९९२)
    ३०. १९९७ – अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर, १९३१-२७ जुलै, २०१५)
    ३१. १९९७ – गुलजारी लाल नंदा (४ जुलै, १८९८ – १५ जानेवारी, १९९८)
    ३२. १९९७ – अरुणा असाफ़ अली (१६ जुलै, १९०९ – २९ जुलै, १९९६), मरणोत्तर
    ३३. १९९८ – एम एस सुब्बुलक्ष्मी (१६ सप्टेंबर, १९१६ – ११ डिसेंबर, २००४)
    ३४. १९९८ – सी सुब्रामनीयम (३० जानेवारी, १९१० – ७ नोव्हेंबर, २०००)
    ३५. १९९८ – जयप्रकाश नारायण (११ ऑक्टोबर, १९०२ – ८ ऑक्टोबर, १९७९), मरणोत्तर
    ३६. १९९९ – पं. रवि शंकर (७ एप्रिल, १९२०-१२ डिसेंबर,२०१२ )
    ३७. १९९९ – अमृत्य सेन (३ नोव्हेंबर, १९३३)
    ३८. १९९९ – गोपीनाथ बोरदोलोई (१८९०-१९५०), मरणोत्तर
    ३९. २००१ – लता मंगेशकर (२८ सप्टेंबर, १९२९)
    ४०. २००१ – उस्ताद बिस्मिल्ला ख़ां (२१ मार्च, १९१६ – २१ ऑगस्ट, २००६)
    ४१. २००८ – पं.भीमसेन जोशी (४ फेब्रुवारी, १९२२ -२५ जानेवारी, २०११)
    ४२. २०१४ सी॰ एन॰ आर॰ राव (३० जून, १९३४- ), १६ नोव्हेंबर, २०१४
    ४३. २०१४ सचिन तेंदुलकर (२४ एप्रिल, १९७३- ), १६ नोव्हेंबर, २०१४
    ४४. २०१५ अटल बिहारी वाजपेयी (२५ डिसेंबर, १९२४- ), २५ डिसेंबर, २०१५
    ४५. २०१५ मदन मोहन मालवीय (२५ डिसेंबर, १८६१- १२ नोव्हेंबर, १९४६, मरणोत्तर, २५ डिसेंबर, २०१५

Leave a Reply