पंतप्रधान

संसदीय शासनव्यवस्थेत राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो तर खरी सत्ता पंतप्रधानाकडे असते. भारतीय संविधानाने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केल्याने राष्ट्रप्रमुख आहेत तर पंतप्रधान हे शासनप्रमुख आहेत.

भारतीय संविधानाच्या कलम ७४ अन्वये राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंञीमंडळ असेल आणि राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडताना अशा सल्ल्यानुसार वागेल.

नियुक्ती

संविधानात पंतप्रधानाच्या नियुक्तीसाठी कोणतीही पद्धत निश्चित केलेली नाही. कलम ७५ अन्वये पंतप्रधान राष्ट्रपतींकडून नियुक्त केला जातो. संसदीय शासनपद्धतीतील प्रस्थापित संकेतानुसार राष्ट्रपतींकडून लोकसभेत बहुमत असणार्या पक्षाच्या नेत्याची नियुक्ती पंतप्रधान म्हणून केली जाते.

शपथ

पंतप्रधानाला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यांना पद व गोपनियतेची शपथ देतात. या शपथेचा नमुना संविधानाच्या तिसर्या अनुसूचीत देण्यात आला आहे. पंतप्रधानांना पंतप्रधान पदाची शपथ न देता केंद्रीय मंञी म्हणूनच शपथ दिली जाते.

पदावधी

संविधानात पंतप्रधान पदाचा पदावधी निश्चित केलेला नाही. पंतप्रधान राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. माञ जोपर्यंत पंतप्रधान व मंञीमंडळाला लोकसभेत बहुमत असते तोपर्यंत राष्ट्रपती पंतप्रधानांना पदावरून दूर करू शकत नाहीत.

वेतन व भत्ते

पंतप्रधानांचे वेतन व भत्ते संसदेकडून वेळोवेळी कायद्याद्वारे निश्चित केले जातात. पंतप्रधानांना संसद सदस्यांइतकेच वेतन व भत्ते प्राप्त होतात.

पंतप्रधानाचे अधिकार व कार्ये

१)मंञिमंडळाच्या संदर्भात-

केंद्रीय मंञीमंडळात ज्या व्यक्तींची शिफारस पंतप्रधानांकडून होते केवळ त्याच मंञ्याची नियुक्ती राष्ट्रपती करू शकतात. मंञ्यांमध्ये खातेवाटप करण्याचे तसेच त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे महत्वपूर्ण कार्य पंतप्रधान करतात. पंतप्रधान एखाद्या मंञ्याला मंञ्याला राजीनामा देण्याचा आदेश देवू शकतात व तो आदेश न पाळला गेल्यास राष्ट्रपतीला त्यासंदर्भात सल्ला देवू शकतात. ते मंञिमंडळांच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. सर्व मंञ्यांच्या कार्यांचे मार्गदर्शन, दिशादर्शन, नियंञण करुन शासनाच्या धोरणामध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी पंतप्रधानाची असते. पंतप्रधानांचा राजीनामा हा सर्व मंञिमंडळाचा राजीनामा समजला जातो.

२)राष्ट्रपतींच्या संदर्भात-

पंतप्रधान हे राष्ट्रपती व मंञिमंडळ यांमधील संपर्काचे माध्यम(channel of communication) असतात.  त्यानुसार घटनेच्या कलम ७८ मध्ये पंतप्रधानाची कर्तव्ये सांगण्यात आली आहेत ती म्हणजे १.संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनाशी संबंधित मंञिमंडळाचे सर्व निर्णय व विधिविधानाचे सर्व प्रस्ताव राष्ट्रपतींना कळविणे. २. संघराज्याच्या कारभाराचे प्रशासन व विधिविधानासंबंधित राष्ट्रपती मागतील ती माहिती पुरविणे. ३.ज्या बाबींवर एखाद्या मंञ्याने निर्णय घेतला आहे पण मंञिमंडळाने जिचा विचार केला नाही, अशी कोणतीही बाब, राष्ट्रपतीने आवश्यक केल्यास, मंञिमंडळाच्या विचारार्थ सादर करणे. पंतप्रधान राष्ट्रपतींना भारताचे महान्यायवादी, भारताचे महालेखापाल, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, मुख्य व अन्य निवडणूक आयुक्त, वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य.

३)संसदेच्या संदर्भात-

लोकसभेचा नेता या नात्याने पंतप्रधानाचे अधिकार खालीलप्रमाणे

राष्ट्रपतींना संसदेची अधिवेशने बोलावण्यासाठी व स्थगित करण्यासाठी सल्ला देणे.

राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्यासाठी सल्ला देणे.

संसदेत सरकारी धोरणांच्या चर्चेत हस्तक्षेप करून शासनाची बाजू मांडणे.

पंतप्रधानाची भुमिका

विविध राज्यशास्ञाच्या तज्ज्ञांनी ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या भूमिकेचे केलेले वर्णन भारताच्या पंतप्रधानांनासुध्दा लागू पडते.

लाॅर्ड मोर्लेसमानाममधील पहिला (first among equals)
सर विल्यम हारकोर्टगौण तार्यांमधील चंद्र (inter stelles luna minores i.e. a moon among lesser stars)
जेनिंग्जग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सुर्य (a sun around which planets revolves)
मन्रोशासनसंस्थेच्या जहाजाचा कॅप्टन (the captain of the ship of the state)
रॅमसे मुईरthe steersman of steering wheel of the ship of the state)