पंतपधान ग्राम सडक योजना

पंतपधान ग्राम सडक योजना

  • ही योजना २५ डिसेंबर २००० साली अटल बिहारी वाजपेयी यांनी चालू केली.
  • या योजनेचा उद्देश ५०० लोकसंख्या(२००१ च्या जनगणनेनुसार) असणार्या व न जोडल्या गेलेल्या सर्व गावांना सर्व मोसमात चालतील असे रस्ते बांधुन जोडणे. (डोंगराळ भागासाठी २५० लोकसंख्या)
  • ही पुर्णपणे केंदृीय योजना आहे.
  • गृामीण रस्ते हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे.
  • उद्दिष्टे- १) १००० लोकसंख्या असणारी गावे २००३ पर्यंत जोडणे. २) ५०० लोकसंख्या असणारी गावे २००७ पर्यंत जोडणे. ३) डोंगराळ भागात ५०० लोकसंख्या असणारी गावे २००३ पर्यंत जोडणे. ४) डोंगराळ भागात २५० लोकसंख्या असणारी गावे २००७ पर्यंत जोडणे.
  • २००४ ते २०१४ या काळात या योजनेत रस्तेनिर्मितीचा वेग पृतिदिन ९८.५ किमी इतका होता.