‘नारीशक्ती’ पुरस्कार

नारी शक्ती पुरस्कार (स्त्री शक्ती पुरस्कार) ही महिलांच्या असामान्य कामगिरीसाठी स्त्रियांना देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सहा श्रेणींमध्ये दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1991 मध्ये झाली. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनी, नवी दिल्ली येथे 8 मार्च रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक (रू .100,000) आणि प्रमाणपत्र दिले जाते

श्रेणी

हा पुरस्कार भारतीय इतिहासातील प्रतिष्ठित स्त्रियांच्या नावावरून पुढील श्रेणींमध्ये दिला जातो.

 1. अहिल्या बाई होळकर पुरस्कार:
 2. कन्नगी पुरस्कार: एक महान तमिळ स्त्री कन्नगीच्या नावावरून
 3. माता जिजाबाई पुरस्कार:
 4. राणी गियादिनलिनू झेलिआंग पुरस्कार: 20 व्या शतकातील आध्यात्मिक आणि राजकीय नागा राणी गेडलिनुच्या नावावरून
 5. राणी लक्ष्मी बाई पुरस्कार:
 6. रानी रूद्रममा देवी पुरस्कार (स्त्री व पुरुष दोघांसाठी): रुढ्रामा देवी नावाचा 13 व्या शतकातील दख्खनची राज्यकर्ती

नारी शक्ती पुरस्कार-२०१७

 • अनाथांची आई डॉ. सिंधुताई सपकाळ आणि ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला बळवंत आपटे यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारीशक्ती’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने जागतिक महिला दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

डॉ. सिंधुताई सपकाळ

या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठीभाषक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सिंधुताईंना बरेच राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले काही –

 • पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (२०१२).
 • २०१० – स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
 • मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
 • आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
 • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
 • राजाई पुरस्कार.
 • शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
 • श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार १९९२.
 • सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला रिअल हीरो पुरस्कार (२०१२).
 • २००८ – दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.
 • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

 उर्मिला आपटे 

उर्मिला बळवंत आपटे या मुंबई येथील ‘भारतीय स्त्री शक्ती’ स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत. यांना त्यांच्या संस्थेच्यावतीने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामाच्या योगदानबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय स्त्री शक्ती ही स्वयंसेवी संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारिरिक आरोग्य, स्वाभीमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या पंचसुत्रीवर मोहिम, सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या माध्यमातून समुपदेशनाचे कार्य करते.