नारायण मेघाजी लोखंडे

नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म १८६८ साली ठाणे येथे झाला. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कव्हेरसर हे होय. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण ठाण्यात झाले. मॅट्रिक नंतर ते नोकरीसाठी मुंबई शहरात आले. प्रथम त्यांनी रेल्वे लोकोमोटिव्ह खात्यात कारकून पदावर नोकरी केली. सन १८७० साली रेल्वेतील नोकरी सोडून पोस्ट खात्यात नोकरीस लागले. त्यांना लिखाणाची आवड होती. १८७० पासून ते बहुजन समाजाचे अज्ञान, चालीरिती शिक्षण ३० लिखाण करीत असत. त्यांच्या वर महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव पडला होता. पुढे १८७७ मध्ये त्यांनी मांडवी मिलमध्ये स्टोअरकीपरची नोकरी पत्करली. १८७० साली पहिले वर्तमानपत्र ‘दीनबंधु’ सुरू झाले. सन १८८० मध्ये ‘दीनबंधु’ मुंबईमधून काढण्याची सर्व जबाबदारी लोखंडेनी स्वीकारली. मांडवी मिलमध्ये नोकरीस आल्यावर त्यांना कामगार जीवनाची कल्पना आली. त्यामधून ते कामगार चळवळीकडे आले.

कामगार चळवळीचा प्रारंभ :

मुंबईमधील कामगार चळवळीची सुरूवात लोखंडे यांनी केली. या चळवळीला फॅक्टरी ॲक्ट कारणीभूत झाला. या फॅक्टरी ॲक्टचा संबंध मँचेस्टर मधील गिरणी मालक व मुंबई येथील गिरणी मालकांच्या स्वार्थांशी आहे. या कामगार चळवळीचे कारण म्हणजे मॅचेस्टरमधील गिरणीवाले फॅक्टरी ॲक्ट, बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन, फॅक्टरी ॲक्टच्या निर्मितीसाठी कमिशन, वृत्तपत्रातील विचार प्रवाह, निर्यात कमी केली, मजूरीचे दर कमी केले इ. कारणे होत.

कामगार वर्गाची स्थिती :

इ. स. १८५४ रोजी मुंबई येथे पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आली असली तरीही त्यापूर्वी चहा व निळीच्या मळयात मजूर वर्ग राबत होता. इंग्लड प्रमाणे भारतातही कमी मजूरी वर्ग राबत होता. इंग्लड प्रमाणे भारतातही कमी मजूरी, भरपूर काम बालमजूर इ. समस्या निर्माण झाल्या. या मजुरांची समस्या सोडविण्याची आवश्यकता वाटू लागली. बंगालमध्ये ब्राम्हो समाज सुधारक शशिपार बॅनर्जी याने इ. स. १८७० मध्ये एक ‘कामगार मंडळ’ स्थापन करून ‘भारत श्रमजीवी’ मासिक कामगारांच्यासाठी सुरू केले. भारतीय मजुरांच्या स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून भारतीय मजुरांनी नव्हे तर लॅकेशायरच्या कापड गिरणी मालकांनी इंग्लड मध्ये सर्व प्रथम मागणी केली कारण भारतातील भांडवलदारांनी भारतीय मजुरांकडून कमी मोबदल्यात काम करून घेतल्यामुळे त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होऊन भारतीय कापड उद्योग लँकेशायरच्या कापड उद्योगाला प्रतिस्पर्धी ठरू शकला असता. भारतीय मजुरांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी १८७५ मध्ये एका आयोगाची स्थापना करण्यात आली. इ. स. १८७८ मध्ये मुंबई कायदे मंडळात कामगारांच्या कामाचे तास कमी करण्यात यावे यासाठी शोरबजी शापूरजी याने ठराव मांडण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. मुंबई मध्ये ना. म. लोखंडे यांनीे इ. स. १८८० मध्ये ‘दीनबंधू’ या इंग्रजी-मराठी साप्ताहीकाचे प्रकाशन सुरू केले. पुढे १८८१ रोजी लॉर्ड रिपनच्या काळात पहिला फॅक्टरी ॲक्ट पास करण्यात आला.

कामगार चळवळ व लोखंडे :

इ. स.१८८४ मध्ये नारायण मे. लोखंडे यांनी मुंबई येथे कामगारांची जाहीर सभा घेतली. त्यांनी कामगारांच्या वतीने त्याच्या मागण्या सादर करणारा जाहिरनामा फॅक्टरी कमिशनला सादर केला. आणि १८९० मध्ये त्यांनी ‘‘बॉम्बे मिल ॲड हॅण्डस असोसिएशन’’ ही संघटना स्थापन केली. ते मुंबई मिल असोसिएशनचे अध्यक्ष होते. या संघटनेच्या स्थापने ध्ये अनेक नामवंत जॉबर मंडळी अग्रेसर होती. यामध्ये रघू भिकाजी, गणू बाबाजी नारायण सुर्कोजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, व नारायणराव पवार, इ. सत्यशोधकही होते. या संघटनेकडे आपले नियम तयार नव्हते. संघटनेजवळ स्वत:ची नियमावली नव्हती. आणि सभासदांची यादी तयार केली नव्हती. तरीही भारतातील ही पहिली कामगार संघटना होय. या संघटनेने संप, कधी विनंती अर्ज करून कामगारांना सुविधा मिळवून दिल्या आहे. कामगार वर्गाचे शक्ती प्रदर्शन कामगारां ध्ये जागृती निर्माण करण्यासाठी लोखंडेनी २३ सप्टेंबर १८८४ रोजी परळ येथे व २६ सप्टेंबर १८८४ रोजी भायखळा येथे दोन सभा घेतल्या. कामगारांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या सभेने पाच मागण्या सरकारपुढे ठेवल्या. दोन सभामध्ये पास झालेल्या मागण्या एका ठरावाच्या स्वरूपात तयार करण्यात आल्या. व त्या मागण्या १५ ऑक्टोबर १८८४ रोजी फॅक्टरी कमिशनचे अध्यक्ष डब्लु. बी. मुलक यांना सादर करण्यात आल्या.

१) रविवारी सुट्टी देण्यात यावी.

२) दुपारी अर्धा तास जेवणासाठी सुट्टी द्यावी.

३) गिरणीतले काम सकाळी ६.३० ते सूर्यास्तापर्यंतचा लावाव.

४) कामगारांचा पगार पुढील महिन्याच्या १५ तारखे पर्यंत व्हावा

५) कामगाराला गंभीर दुखापत झाल्यास बरा होईपर्यंत पूर्ण पगार व कामगार मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेन्शन देण्यात यावी.

कमिशनला साडेपाच हजार कामगारांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

सन १८८५ मध्ये लोखंडे यांनी पगार कपात व पगाराला उशीर या कारणांवरून दोन गिरण्यांत संप सुरू झाला. टाटा यांच्या मालकीच्या कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये वाढीव पगारासाठी संप करण्यात आला. पुढे २४ एप्रिल १८९० रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर लोखंडेची सभा झाली. यामध्ये कामगारांना आठवड्यामधून एक दिवस तीही रविवारी सुट्टी असावी अशी मागणी करण्यात आली. शेवटी १० जून १८९० रोजी रविवार हा सुट्टीचा दिवस असावा. असे जाहीर करण्यात आले. हा कामगारांचा मोठा विजय होता. सरकार दरबारी त्यांच्या कार्याची व लेखनाची नोंद घेण्यात येऊ लागली. २५ सप्टेंबर १८९०च्या फॅक्टरी लेबर कमिशनमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये बाबू रसिकलाल घोष, सोराबजी शापूरजी बेंगाली, फ्रामजी माणिकजी इ. समावेश होता. या सदस्यांनी कामगार प्रश्न न्याय हक्क व गिरण्यांची वस्तुस्थिती यावर अहवाल तयार केला १८९१ चा विधायक फॅक्टरी ॲक्ट निर्माण होण्यात लोखंडे यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली.

१८९२ वर्ष कामगारांसाठी सुविधा व संप यासाठी गाजले कारण प्रत्येक गिरणीत पगार कपात, अन्याय यामुळे संप होत होते. कामगारांच्या आर्थिक प्रश्नासंदर्भात लोखंडे यांनी जागृत केली. टिळकआगरकर डोंगरीच्या तुरूंगातून सुटले त्या दिवशी त्यांचा सत्कार व मानपत्र देण्याचा कार्यक्रम लोखंडे यांनी केला. १८९३ च्या दंगलीनंतर राणी बागेत त्यांनी आयोजित ऐक्य मेळाव्यास साठ हजार कामगार हजर होते. ‘मराठा ऐकेच्छूक सभा’ ही संस्था सर्वांच्या शिक्षणसाठी व कष्टकरी वर्गाच्या आरोग्यासाठी ‘मराठा प्रॉव्हिडंट हॉस्पिटल’ दीनबंधू नियतकालिक मजुरांच्या तांत्रिक ज्ञानात भर टाकण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रीय लेखन केले.

१८९६ मध्ये कामगारांच्या आरोग्यासाठी त्यांचे कामाचे तास पावणेसात असावेत असे त्यांनी सांगितले. इ. स. १८९३ साठी मुंबई ध्ये हिंदु-मुस्लिम दंगा झाला, त्यामध्ये लोखंडेनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सरकारने १८९५ साली त्यांना ‘रावबहादुर’ ही पदवी देऊन सन्मान केले. असा हा भारतीय कामगार चळवळीचा जनक ९ फेब्रुवारी १८९७ रोजी प्लेगच्या साथीत आकस्मिकपणे वयाच्या ४९ व्यावर्षी मरण पावला. कामगार वर्गात त्यांनी आपल्या कामगिरीने चैतन्य निर्माण केले होते.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: