नाम

व्याख्या

सृष्टीमध्ये प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पना केलेल्या वस्तूंना आणि त्यांच्या गुणधर्मांना आेळखण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे नाम होय.

नामाचे प्रकार

मराठीत नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

 1. सामान्यनाम.
 2. विशेषनाम.
 3. भाववाचक नाम.

सामान्यनाम

एकाच गटातील किंवा समूहातील प्रत्येक वस्तूंना त्यांच्या समांतर गुणधर्मांमुळे जे नाव दिले जाते, त्यास सामान्यनाम असे म्हणतात. सामान्यनाम हे समूहातील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते. सामान्यनामाचे अनेकवचन करता येते. उदा. मुलगी, माणूस, घर, तारा, शाळा, नदी, लेखणी, ग्रह इ.

सामान्यनामाचे पुढील दोन प्रकार पडतात.

पदार्थवाचक नाम

जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा कि. ग्रॅम यांसारख्या परिमाणांनी मोजले जातात, त्यांना पदार्थवाचक नामे म्हटले जाते. उदा. दूध, पाणी, कापड, साखर, प्लास्टिक, सोने, पीठ इ.

समूहवाचक नाम

समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकञित समूहाला जे नाव दिले जाते, त्यास समूहवाचक नाम म्हणतात. उदा. कळप, वर्ग, समिती, पेंढी, जुडी, ढिगारा, मोळी इ.

विशेषनाम

ज्या नामातून एखाद्या समूहाचा बोध न होता त्या समूहातील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास विशेषनाम असे म्हणतात. उदा.  कृष्णा, राजेश, पृथ्वी, कुतुबमिनार इ.

भाववाचक नाम/ धर्मवाचक नाम

ज्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, ज्याची चव घेता येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या व ज्यातून प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्या नावाला भाववाचक नाम असे म्हणतात. उदा. विश्रांती, श्रीमंती, गर्व, मनुष्यत्व, चांगुलपणा, वात्सल्य, माणूसकी, सौंदर्य इ.

भाववाचक नामांचे तीन गट पडतात.

 1. स्थितीदर्शक नाम (श्रीमंती, गरिबी).
 2. गुणदर्शक नाम (प्रामाणिकपणा, सौंदर्य).
 3. कृतिदर्शक नाम (चोरी, चळवळ).

प्रत्यय वापरून बनवलेली भाववाचक नामे-

सुदर-सौंदर्य, गंभीर-गांभीर्य, मधुर-माधुर्य, धीर-धैर्य, क्रूर-क्रौर्य, शूर-शौर्य, उदार-आैदार्य, नवीन-नावीन्य.
त्व माणूस-मनुष्यत्व, शञू-शञुत्व, मिञ-मिञत्व, प्रौढ-प्रौढत्व, जड-जडत्व, प्रभाव-प्रभुत्व, नेता-नेतृत्व.
पण/पणा देव-देवपण, बाल-बालपण, शहाणा-शहाणपण, वेडा-वेडेपण, चांगला-चांगुलपणा, म्हातारा-म्हातारपण, मूर्ख-मूर्खपणा.
श्रीमंत-श्रीमंती, गरीब-गरिबी, गोड-गोडी, चोर-चोरी, हुशार-हुशारी
ता नम्र-नम्रता, सम-समता, वक्र-वक्रता, वीर-वीरता, एक-एकता, बंधू- बंधुता
की पाटील-पाटीलकी, मालक-मालकी, आपला-आपुलकी, गाव-गावकी, माणूस-माणुसकी
गिरी गुलाम-गुलामगिरी, फसवा-फसवेगिरी, लुच्चा-लुच्चेगिरी, भामटा-भामटेगिरी, दादा-दादागिरी
वा गोड-गोडवा, गार-गारवा, आेला-आेलावा, दूर-दुरावे, सांगणे-सुगावा, पुरवणे-पुरावा, थकणे-थकवा
आई नवल-नवलाई, चपळ-चपळाई, चतुर-चतुराई, दिरंग-दिरंगाई, महाग-महागाई, दांडगा-दांडगाई
वी  थोर-थोरवी

 

वाक्यातील नाम कसे आेळखावे

 • वाक्याचा कर्ता व कर्म नामच असते. उदा. पारध्याने हरीण पकडले.
 • षष्ठी प्रत्ययाच्या मागे व पुढे नेहमी नामच असतात. उदा. आजकाल मोबाईलचा वापर खूप वाढला आहे.
 • शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामच असतो. उदा. पक्षी फांदीवर बसला.
 • विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नामच असतात. उदा. बाबांना नमस्कार सांगा.
 • सर्वनामाच्या (झा, झी, झे) प्रत्ययानंतर नामच असते. उदा. तुझा पायजमा, माझे पुस्तक.

नामांचे विविध उपयोग

 1. जेंव्हा सामान्यनामाचा विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग होतो, तेंव्हा ते विशेषनाम असते. उदा. आमची बेबी पाचवीला गेली.
 2. जेंव्हा विशेषनामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेकवचन म्हणून केला जातो तेंव्हा ते सामान्यनाम असते. उदा.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

2 thoughts on “नाम”

error: