नगरपंचायत

स्थापनेबाबत तरतुदी 

महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्वात कनिष्ठ स्तर म्हणजे नगरपंचायत होय. महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगर वसाहत प्राधिकरण अधिनियम 1965 अन्वये नगरपंचायतीची स्थापना करण्यात येते. ग्रामीण भागाचे शहरी भागात रूपांतर होण्याच्या स्थितीत (संक्रमण अवस्थेत) कार्यरत असणारी संस्था म्हणजे नगरपंचायत होय.

  • लोकसंख्या – 10 हजार ते 25 हजार च्या दरम्यान असावी.
  • व्यावसायिक स्वरूप – त्या क्षेत्रातील 50% पेक्षा जास्त लोकसंख्या बिगर शेती क्षेत्रात गुंतलेली असावी.
  • भौगोलिक स्थान – अ दर्जाच्या नगरपरिषदेपासून किंवा महानगरपालिकेपासून 20 कि.मी. च्या अंतरापर्यंत ते क्षेत्र असावे.
  • राज्यपालाची घोषणा – ते क्षेत्र ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमण करणारे नागरी क्षेत्र आहे अशी घोषणा राज्यपालाने करावी लागते.
महाराष्ट्रातील नगरपंचायती

महाराष्ट्रात एकूण नगर पंचायती ५ आहेत.

नगरपंचायतजिल्हा
शिर्डीअहमदनगर
कणकवलीसिंधुदर्ग
दापोलीरत्नागिरी
केजबीड
मलकापुरसातारा

नगरपंचायत रचना

सदस्य – 9 ते 20 (यामध्ये निर्वाचित, पदसिद्ध व नियुक्त अशा सदस्यांचा समावेश होतो.)

पदसिद्ध सदस्य – संबंधित क्षेत्रातील विधीमंडळ व संसद सदस्य

नियुक्त सदस्य – नागरी प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या दोन सदस्यांची नियुक्ती राज्य शासनामार्फत केली जाते. वार्ड ची निर्मिती जिल्हाधिकारी करतो.

राखीव जागा – महिला 50%, OBC 27%, SC/ST लोकसंख्येच्या प्रमाणात

कार्यकाल :- 5 वर्षे

अध्यक्ष व उपाध्यक्ष

निवड – सध्या अध्यक्षाची निवड प्रत्यक्ष मतदाराकडून केली जाते.

कार्यकाल – 5 वर्षे

राखीव जागा – महिला 50%, OBC 27%, SC/ST लोकसंख्येच्या प्रमाणात

अविश्वासाचा ठराव – सध्या 12 मे 2004 च्या नवीन सुधारणेनुसार सुरूवातीचे तीन वर्षे असा ठराव मांडता येत नाही.

कार्ये –

  • नगरपंचायतीच्या सभा बोलावणे व अध्यक्षस्थान भूषविणे.
  • नगरपंचायतीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

प्रशासकीय प्रमुख

नगरपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास कार्यकारी अधिकारी असे म्हणतात. हा नगरपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करतो. कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक राज्यशासनामार्फत केली जाते.