धारासना सत्याग्रह

धारासना सत्याग्रह हे मिठावर लावण्यात आलेल्या कराविरोधात मे 1930 मध्ये करण्यात आलेले आंदोलन होते. 26 जानेवारी 1930 रोजी राष्ट्रसभेने ‘संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता. ६ एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी येथे मीठ तयार करून सविनय कायदेभंग केला. त्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ देशभरात सुरु झाली.

धारासना सत्याग्रह

४ मे 1930 रोजी म. गांधींनी लॉर्ड आयर्विन यांना धारासना सत्याग्रहाबाबत पूर्वकल्पना दिली. गांधीजींना तात्काळ अटक झाली. त्यानंतर नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांनाही अटक झाली.

म. गांधींना अटक झाल्यामुळे धारासना येथील मिठागारापुढे सत्याग्रह करण्याची जबाबदारी अब्बास तय्यबजी व महात्मा कस्तुरबाई यांच्याकडे होती. पण त्यांनाही अटक केल्यामुळे चळवळीचे नेतृत्त्व सरोजिनी नायडू यांच्याकडे आले. तीन हजार सत्याग्रही धारासना येथे आंदोलन करीत होते. इतर आंदोलकांना तेथे जाता येवू नये म्हणून पोलिसांनी धारासनाकडे जाणारे सर्व मार्ग रोखले. तरीही मिठाच्या कायद्याचा भंग आंदोलकांनी केला. पोलिसांचा लाठीहल्ला सहन करीत हा सत्याग्रह यशस्वी केला. याशिवाय मुंबई, वडाळा येथेही मिठाचा सत्याग्रह झाला.

चळवळीचे फलीत :

  1. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे फलीत म्हणजे मुंबई गिरणी मालकांनी, कारखानदारांनी व व्यापाऱ्यांनी चळवळीला सढळ हाताने मदत केली.
  2. त्याचबरोबर प्रथमच भारतीय महिलांनी चळवळीमध्ये सहभाग घेतला.
  3. त्याचबरोबर सरहद्द प्रांतातील लढाऊ पठाणांनीसुद्धा चळवळीत सहभाग घेतला.
  4. शेतकऱ्यांचा सहभागही लक्षणीय ठरला. या सहकार्याुळे ब्रिटिश मालावरील बहिष्कारामुळे ब्रिटिश मालाची आयात घटली. याचा परिणाम इंग्लंडच्या कारखानदारीवरती झाला.
  5. मद्यपान निषेधामुळे व मद्य विक्री विरुद्ध केलेल्या विरोधामुळे सरकारचे करांचे उत्पन्न घटले.
  6. ब्रिटिशांच्या कारखान्यात काम करण्यास भारतीय मजूरांनी नकार दिला.
  7. ब्रिटिशांच्या दमननितीची भीती उरली नाही. जनतेचा आत्मविेशास सविनय कायदेभंगाच्या चळवळीने वाढला.