दाब(Pressure)

काही महत्वाच्या संज्ञा- उत्प्लाविता (Thrust), दाब (Pressure), प्लावी बल (Buoyant Force), आर्किमिडीजचे तत्व(), घनता (Density) :

उत्प्लाविता(Thrust):

एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर लांब दिशेने प्रयुक्त बलास उत्प्लाविता म्हणतात. उत्प्लाविता हा बलाचाच एक प्रकार आहे जो लंब दिशेने प्रयुक्त होतो.

दाब(Pressure):

दाबसुद्धा बलाचाच एक प्रकार आहे. दाब म्हणजे एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त केलेले बल.

 • म्हणजेच एकक क्षेत्रफळावर प्रयुक्त केलेली उत्प्लाविता.
 • SI पद्धतीचे एकक N/M (Pa)
 • याच एककाला “ब्लेस पास्कल” या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ पास्कल असे म्हणतात.
 • जेवढे जास्त क्षेत्रफळ तेवढाच कमी दाब.

ब्लेस पास्कल

ब्लेस पास्कल हे फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञव गणिती होते. ज्याला पास्कालचा नियम म्हणतात त्याची सूत्ररूपाने मांडणी यांनीच केली.

प्लावी बल(Buoyant Force):

एखादी वस्तू द्रवात बुडाली असता द्रव वस्तूला वर ढकलते, म्हणजेच द्रव वस्तूवर वरच्या दिशेने लंब बल प्रयुक्त करते यालाच प्लावी बल म्हणतात.

 • द्रवात बुडालेल्या वस्तूचे वजन प्लावक बलामुळेच कमी जाणवते.
 • द्रवाच्या लंबरूपाने वर बल प्रयुक्त होण्याच्या गुणधर्मास प्लावक्ता (Buoyancy) म्हणतात.
 • प्लावी बल दोन गोष्टींवर अवलंबून असते
  • वस्तूचे आकारमान = जेवढे जास्त आकारमान तेवढे जास्त प्लावी बल.
  • द्रवाची घनता = जेवढी जास्त घनता तेवढे जास्त प्लावी बल.
 • प्लावी बल आणि वस्तूचे वजन
  • जर प्लावी बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते.
  • आणि जर प्लावी बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते.
  • जर प्लावी बल वस्तूच्या वजनाइतकाच असेल तर वस्तू अर्धवट भाग बुडते व अर्धवट भाग तरंगते.

 

आर्किमिडीजचे तत्व():

तत्व:

जेंव्हा एखादी वस्तू द्रवामध्ये पूर्णतः किंवा अंशतः बुडवली जाते तेंव्हा वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाइतकेच बल वरच्या दिशेने प्रयुक्त होते.

 • जर आपण एखादी वस्तू पाण्यात पूर्णतः बुडवली असेल किंवा अंशतः बुडवली असेल तर, ती वस्तू पाण्याची जागा घेते.
 • ती वस्तू तिच्या आकारमानाइतके पाणी बाजूला सरते, अथवा विस्थापित करते.
 • जेवढे पाणी बाजूला सरले तेवढेच बल, पाणी वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त करते.

आर्किमिडीज च्या तत्वाचे उपाययोजन / दैनंदिन उपयोग:

१. पाणबुडी:

पाणबुडीच्या दोन्ही टोकाला मोठ्या टाक्या जोडलेल्या असतात. जेंव्हा पाणबुडीला पाण्याच्या पृष्ठभागाखाली राहायचे असते तेंव्हा टाकीमध्ये पाणी भरले जाते जेणेकरून जहाजाचे वजन वाढेल आणि पाणबुडी पाण्यांत बुडेल. तसेच जेंव्हा पाण्यावर तरंगायचे असते तेव्हा या टाक्या रिकाम्या केल्या जातात. वजन कमी झाल्यामुळे ते जहाज पाण्यावर तरंगू लागते. म्हणजेच अावश्यकतेनुसार टाकीतले पाणी कमी जास्त करून जहाज तरंगवले अथवा बुडवले जाते.

२. विविध उपकरणे:

दुग्धतामापी(), अार्द्रतामापी() अशा विविध उपकरणांमध्ये याच तत्वाचा वापर केला जातो.

 

घनता (Density):

“घनता म्हणजे वस्तूच्या वस्तुमानाचे व आकारमानाचे गुणोत्तर.”

 • सूत्र : घनता = वस्तुमान/आकारमान
 • SI एकक kg/m
 • जर पदार्थाची घनता द्रवापेक्षा जास्त असेल तर ती द्रवात बुडते.
 • जर पदार्थाची घनता द्रवापेक्षा कमी असेल तर ती द्रवात तरंगते.
 • पदार्थाची घनता त्या पदार्थासाठी ठराविक असते.

सापेक्ष घनता()

पाण्याची घनता एकक मानून इतर पदार्थांची घनता मोजली तर त्यास सापेक्ष घनता म्हणतात. कोणत्याही पदार्थाच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असलेले गुणोत्तर म्हणजे सापेक्ष घनता होय.

 • सूत्र : सापेक्ष घनता = (पदार्थाची घनता)/(पाण्याची घनता)
 • यालाच “विशिष्ट गुरुत्व” असे म्हणतात.