तैनाती फौज

लॉर्ड वेलस्लीने प्रथम तैनाती फौज ही पद्धत भारतात सुरू केली. या पद्धतीनुसार भारतीय संस्थानिकांना कंपनीशी एक करार करावा लागे. या कराराच्या अटी पुढीलप्रमाणे असत.

  1. भारतीय संस्थानिकाने ब्रिटिश फौज त्याच्या राज्यात कायम ठेवून घ्यावी.
  2. त्याचा खर्च म्हणून कंपनीस पैसा व काही प्रदेश द्यावा.
  3. ही पद्धत स्विकारणाऱ्यांनी ब्रिटीशांच्या परवानगीशिवाय दुसऱ्या राजांशी युद्ध अथवा तह करु नये.
  4. आपल्या राजधानीत एक इंग्रज अधिकारी (रेसिडेंट) ठेवावा.
  5. इंग्रजाशिवाय कोणत्याही युरोपियन व्यक्तीस नोकर म्हणून ठेवू नये.
  6. ही पद्धत स्वीकारणाऱ्या संस्थानिकाने ब्रिटीशांच्या सर्वोच्च सत्तेला मान्य करावे.
  7. ही पद्धत स्वीकारणाऱ्या राजांचे इंग्रज अंतर्गत व बाह्य संरक्षण करतील.

तैनाती फौजेचा स्वीकार

तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिला भारतीय संस्थानिक म्हणजे निजामशहा होय. मराठे व टिपू सुलतान यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी १७९८ मध्ये त्याने तैनाती फौज स्विकारली.

१८०१ मध्ये अयोध्याचा नवाब, १८०२ मध्ये बाजीराव, १८०३ मध्ये शिंदे व भोसले व १८०५ मध्ये होळकर यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला.