तूटीच्या संकल्पना व प्रकार

सरकार जेंव्हा आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करते तेंव्हा तूटीचा अर्थसंकल्प तयार होतो. तूटीच्या संकल्पना व प्रकार समजून घेणे व्यावहारिकदृष्ट्या महत्वाचे आहे.

तूटीच्या संकल्पना व प्रकार

महसूली तूट(Revenue Deficit)

जेंव्हा महसूली उत्पन्नापेक्षा महसूली खर्च जास्त असतो तेंव्हा महसूली तूट निर्माण होते.

महसूली तूट=महसूली खर्च- महसूली उत्पन्न

भांडवली खात्यावरील तूट

जेंव्हा भांडवली खर्च हा भांडवली उत्पन्नापेक्षा जास्त असतो तेंव्हा भांडवली खात्यावरील तूट निर्माण होते.

भांडवली खात्यावरील तूट= भांडवली खात्यावरील खर्च – भांडवली खात्यावरील उत्पन्न

अंदाजपञकीय तूट

अंदाजपञकीय तूट यामध्ये महसूली तूट व भांडवली तूट यांची बेरीज असते.

अंदाजपञकीय तूट= (महसूली खर्च- महसूली उत्पन्न) + (भांडवली खात्यावरील खर्च – भांडवली खात्यावरील उत्पन्न)

राजकोषीय तूट

सरकारच्या एकूण महसूली उत्पन्नापेक्षा एकूण खर्चाचे प्रमाण जितके अधिक असते तेवढ्या प्रमाणात असणारी तूट ही राजकोषीय तूट असते. सरकारचा जो खर्च कर्जे, उचल इ. मधून भागविला जातो त्याचे प्रमाण राजकोषीय तूटीतून व्यक्त होते.

राजकोषीय तूट = एकूण खर्च – एकूण महसूली उत्पन्न

निव्वळ राजकोषीय तूट

स्थूल राजकोषीय तूटीतून भांडवली खात्यावरील खर्च वजा केल्यावर जी तूट शिल्लक राहते तिला निव्वळ राजकोषीय तूट असे म्हणतात.

प्राथमिक तूट

राजकोषीय तूटीतून निव्वळ व्याज देणे वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते.

प्राथमिक तूट = राजकोषीय तूट – निव्वळ व्याज देणे

माैद्रिक तूट

चक्रवर्ती समितीने अंदाजपञकीय तूटीच्या संकल्पनेबरोबरच माैद्रिक तूटीचे मापन करण्याची शिफारस केली. केंद्र सरकारमार्फत तूट भरून काढण्यासाठी रिझर्व बॅंकेकडून जे कर्ज घेतले जाते किंवा केंद्र सरकारची रिझर्व बॅंकेकडे जितकी देयता वाढते तिला माैद्रिक तूट असे म्हणतात.