डॉ. पंजाबराव देशमुख

समाजकार्य
 • कर्मवीर भाऊराव पाटीलांच्या पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षणप्रसाराच्या कार्याप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख यांनी विदर्भात हे कार्य खूप चांगल्या पद्धतीने केले.
 • अमरावती येथे जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना पंजाबरावांनी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे केले व अनेक शिक्षणकेंद्रे सुरु केली.
 • डॉ. पंजाबराव देशमुख प्रांतिक सरकारमध्ये शिक्षणमंत्री असताना ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून अनेक सवलती उपलब्ध करुन दिल्या.
 • ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवली.
 • तसेच प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली.
 • १९२६- मध्ये त्यांनी अमरावती येथे ‘श्रद्धानंद छात्रालय’ सुरु केले.
 • १९२७- शेतकरी संघाची स्थापना. शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले.
 • १९३२ – श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना . ग्रामोद्धार मंडळाची स्थापना. देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
 • १९३३ – शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
 • १९५० – लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.
 • १९५५ – भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
 • १९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना. ‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’.
 • १८ ऑगस्ट १९२८ – अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
 • १९३० – प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
 • लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
 • १९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.
 • १९६० – दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले