जैवविविधता (Biodiversity)

जैवविविधता (Biodiversity) म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाती, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सुमारे १.७ ते १.८ मिलियन सजीवाच्या जाती आढळतात. या सजीवांची आेळख सहजरीत्या व्हावी म्हणून ‘कार्ल लिनीयस’ या शास्ञज्ञाने द्विनाम पद्धती शोधली.

कार्ल लिनीयस यांची द्विनाम पद्धती

 • यातील नावे साधारणतः लॅटीन भाषेत असतात व ते इटॅलिक लिपीत लिहीतात.
 • या पद्धतीमध्ये पहिला शब्द त्या सजीवाची प्रजाती दर्शवितो तर दुसरा शब्द त्याची जात दर्शवतो.
 • उदा. आंबा हे नाव द्विनाम पद्धतीमध्ये Mangifera indica असे संबोधले जाते. यामध्ये  Mangifera ही प्रजातीआहे तर indica ही जात आहे.
प्राणी प्रजाती जात वैज्ञानिक नाव
सिंह Panthera leo Panthera
वाघ Panthera  tigris Panthera
चित्ता Panthera pardus Panthera
कुञा कॅनीस फॅमिल्यरिस कॅनीस फॅमिल्यरिस
गाय बोस टाॅअरस बोस टाॅअरस
ज्वारी साॅर्घम व्हलगेट साॅर्घम व्हलगेट
जास्वंद हिबीस्कस  रोझा-सायनेन्सिस हिबीस्कस  रोझा-सायनेन्सिस
तुळस Ocimum  Ocimum Ocimum sanctum

‘व्हिटाकर’ यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत

सन १९६९ साली आर. एच. व्हिटाकर यांनी पेशीरचना, सजीवांची रचना व पोषण पद्धती या मुद्द्यांवर आधारीत पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत अस्तत्वात आणली. यामध्ये खालील पाच गटांचा समावेश होतो.

१) सृष्टी मोनेरा (Kingdom Monera)

 • जगातील सर्वात पहिले सजीव म्हणून आेळख.
 • विशेषतः जीवाणूंची सृष्टी.
 • सर्व सजीव एकपेशीय असून स्वयंपोषी किंवा परपोषी असतात.
 • पाच गटांत वर्गीकरण-

आर्कीबॅक्टेरिया– चिखलात तसेच गायी गुरांच्या आतड्यात आढळणारे हे जीवाणू मिथेन वायूची निर्मिती करतात. खार्या पाण्यात, गरम पाण्याच्या ठिकाणी व मिथेन वायू वातावरणात अशा प्रकारचे सजीव आढळतात.

युबॅक्टेरिया– अॅन्टाॅन व्हाॅन लिवेनहुक यांनी सर्वप्रथम सूक्ष्मदर्शकाद्वारे लहान सजीव पाहिला यालाच पुढे चालून ‘बॅक्टेरिया’ असे नाव मिळाले. म्हणून त्यांना ‘बॅक्टोरियोलाॅजीचा जनक’ असे म्हणतात.

सायनोबॅक्टेरिया– यामध्ये हरितद्रव्य असल्यामुळे नील हरित शैवाल म्हणून आेळखतात. वनस्पती नञस्थिरीकरणास मदत करतात.

मायकोप्लाझ्मा– सर्वात लहान आॅक्सिश्वसनी सजीव.  जगातील सर्वात लहान पेशी ‘मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम’ याच गटात मोडते. पेशीभित्तीका नसल्यामुळे या आकारहीन असतात म्हणून यांना ‘मायक्रोबायलाॅजीचे जोकर्स‘ असे आेळखले जाते.

अॅक्टीनोमायसेट्स– धाग्यासारखे जीवाणू असून मातीमध्ये विघटक म्हणून काम करतात.

 


 

२) सृष्टी प्रोटिस्टा (Kingdom Protesta)

 

 • अमीबांसारख्या एकपेशीय सजीवांचा समावेश.
 • स्वयंपोषी व परपोषी दोन्ही सजीवांचा समावेश.
 • पाच गटांत वर्गीकरण-

क्रायसोफाइट्स (Chrysophytes)- सोनेरी शैवाळ किंवा डायअॅटमस म्हणून आेळखले जातात. हे सजीव हालचाल करण्यसाठी चिकट पदार्थ स्ञवतात. अॅन्टीबायोटिक्स, साखर व अल्कोहोल शुद्ध करण्यासाठी, राञीच्या वेळी रंग चकाकीसाठी, ध्वनीरोधक खोली तयार करण्यासाठी डायअॅटमस उपयुक्त आहे.

डायनोफ्लॅजेलेट्स (Dinoflagellates)- मोठे केंद्रक असणारे हे जीव प्रकाश/रंग उत्सर्जित करतात. या सजीवांद्वारे समुद्रात वीष स्ञवले जाते ज्यामुळे शेलफिश सारख्या माश्यांध्ये हे वीष साचून सेवनाद्वारे ते मानवात रोग निर्माण करतात.

युग्लीनाॅईड्स (Euglenoids)- युग्लीनासारख्या सजीवांचा समावेश. यांचे बाहेरील आवरण प्रथिनांचे बनलेले असते, त्याला पेलिकल असे म्हणतात. यांची आकुंचन व प्रसरण या स्वरूपात होणारी हालचाल म्हणजेच मेटोबोली.

स्लाइम मोल्ड्स (Slime Moulds)- मुख्यतः  विघटकांचा समावेश. या जीवांमध्ये डिल्पाॅईड केंद्रक असून त्यांना  हालचालीसाठी सुडोपोडिया असतात. पशीभित्तीका नसते.

प्रोटोझोआ (Protozoa)- यांचे उपप्रकार पुढीलप्रमाणे

(१) फ्लॅजेलेटा : या वर्गातील प्राण्यांच्या कोशिकेवर कशाभिका असून त्यांच्या साहाय्याने या प्राण्यांचे चलनवलन होते. उदा., गियार्डिया.

(२) सार्कोडिना : या वर्गातील प्राणी पादाभांच्या साहाय्याने चलनवलन करतात. उदा., अमीबा.

(३) स्पोरोझोआ : या वर्गातील प्राण्यांना चलनवलन करण्यास योग्य अशी उपांगे (अवयव ) नसतात. हे प्राणी परजीवी आहेत. उदा., प्लास्मोडियम.

(४) सिलिओफोरा : या वर्गातील प्राण्यांच्या कोशिकेवर अनेक पक्ष्माभिका असून त्यांच्या साहाय्याने चलनवलन होते. उदा., पॅरामिशियम.

 


 

३) सृष्टी कवक (KIngdom Fungi)

 • बुरशीला कवक म्हणूनही संबोधले जाते.
 • कवक एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. ‘यीस्ट’ हे एकपेशीय कवक आहे व  ‘अळंबी’ हे बहुपेशीय कवक आहे
 • काही कवकांची रचना साधी असते तर काहींची रचना गुंतागुंतीची असते. गुतागुंतीच्या रचनेच्या कवकांची संख्या मोठी आहे. कवकांची रचना सामान्यत: तंतुमय असते.
 • सर्व कवके बीजाणू तयार करतात आणि याच बीजाणूंपासून नवीन कवकाची निर्मिती होते.
 • कवकामध्ये भूचर हा कवकाचा एक गट आहे. भूचर कुजलेल्या किंवा मृत वनस्पती किंवा प्राण्यांवर जगतात. उदा. रायझोपस, सेप्रोलेग्निया.
 • कवकाच्या दुसऱ्या गटात मोडणाऱ्या कवकांना बीजानुधानी असतात, म्हणजेच त्यांना त्यांची सूक्ष्म आकाराची बीजे सामावणाऱ्या पिशवीसारखा एक अवयव असतो. हा कवकामधील सर्वात मोठा गट आहे. त्यात उपयोगी आणि उपद्रवी कवकांचा सामावेश आहे.
 • फफ बॉल, मोरचेला आणि भूछत्र यांच प्रथिनयुक्त अन्न म्हणून उपयोग होतो. भूछत्र किंवा अळंबी एक स्वादिष्ट पदार्थ समजला जातो.
 • भूछत्रांमध्ये आकारात आणि रंगात खूप विविधता आढळते. रंगीत भूछत्र सामन्यत: विषारी असतात. खाण्यायोग्य भूछत्र- बटण मशरूम, ऑयस्टर मशरूम.

 

सृष्टी वनस्पती (KIngdom plantae)

 • वनस्पती या बहुपेशीय असून यांना सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते.
 • हा वर्ग स्वयंपोषी असून इतर सर्व सजीवांसाठी हे अन्नाचे प्रमुख स्ञोत आहे.

 

सृष्टी प्राणी (KIngdom Animalia)

 • प्राणी हे बहुपेशीय असून प्रद्रव्यपटल हेच बाहेरील आवरण असते.
 • यांना पेशीभित्तिका नसते.
 • हा वर्ग पूर्णपणे परपोषी आहे.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

One thought on “जैवविविधता (Biodiversity)”

error: