Contents
show
जीवाणू (Bacteria) व जीवाणूजन्य रोग
जीवाणू (Bacteria) व जीवाणूजन्य रोग
- आकाराने मोठे, एकपेशीय, अकेंद्रकी व मुक्त गुणसुञे अशी यांची काही वैशिष्ट्ये.
- पृथ्वीवर जीवाणूंचे अस्तित्व मानवापेक्षा जास्त काळापासून आहे.
- जीवाणू हे कुठल्याही वातावरणात तग धरू शकतात. जसे की, जमिनीमध्ये खोलावर, अंतराळात, उकळत्या पाण्यात, अतिशय थंडगार पाण्यात, सल्फुरिक आम्लात इ.
१) विषमज्वर (Typhoid)
१) विषमज्वर (Typhoid)
- जीवाणू – सालमोनेला टायफी
- प्रसार – दूषित अन्न व पाणी, घरमाशीद्वारे
- अवयव – आतड्यांचा प्रादुर्भाव
- लक्षणे – मळमळ, डोकेदुखी, अतसार, भूक मंदावणे, खूप ताप येणे (१०४० F), पोटावर व छातीवर पूरळ येणे.
- उपचार – निदान करण्यासाठी विडाल टेस्ट, औषध म्हणून क्लोरोमासेटीन, व लसीकरणासाठी TAB लस ०.५ ml.
२) क्षयरोग (Tuberculosis)
२) क्षयरोग (Tuberculosis)
- जीवाणू – मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली
- प्रसार – थुंकीद्वारे, हवेद्वारे
- अवयव – विशेषतः फुप्फुसावर प्रादुर्भाव
- लक्षणे – तीन आठवडे किंवा त्याहून अधिक काळापासून गंभीर ताप येणे, खोकला, वजन कमी होणे, अशक्तपणा किंवा थकवा आणि रक्त थुंकणे.
- उपचार – निदान करण्यासाठी X-Ray, औषध म्हणून स्ट्रेप्टोमायसीन व लसीकरणासाठी बी. सी. जी.
३) काॅलरा (Cholera)
३) काॅलरा (Cholera)
- जीवाणू – विब्रीओ काॅलरा
- प्रसार – दूषित अन्न व पाणी
- लक्षणे – पोटदुखी, उलट्या, तीव्र जुलाब, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, पायांत गोळे येणे
- उपचार – औषध म्हणून ORS (Oral Rehydration Solution) व लसीकरणासाठी हाफकीनची लस
४) घटसर्प (Diptheria)
४) घटसर्प (Diptheria)
- जीवाणू – काॅर्निबॅक्टेरियम डिप्थेरी
- प्रसार – हवेमार्फत
- अवयव – श्वसनसंस्था
- लक्षणे – श्वासोच्छवासाला ञास होणे, घसा लाल होणे
- उपचार – औषध म्हणून पेनिसीलीन व लसीकरणासाठी ञिगुणी लस
५) डांग्या खोकला (Whooping cough/Pertusis)
५) डांग्या खोकला (Whooping cough/Pertusis)
- जीवाणू – हिमोफिलस परट्युसीस
- प्रसार – हवेमार्फत
- अवयव -श्वसनसंस्था
- लक्षणे – तीव्र खोकला, छातीत दुखणे
- उपचार – लसीकरणासाठी ञिगुणी लस
६) धनुर्वात (Tetanus)
६) धनुर्वात (Tetanus)
- जीवाणू – क्लाॅस्ट्रिडियम टिटॅनी
- प्रसार – ओल्या जखमेतून
- अवयव – मध्यवर्ती चेतासंस्था
- लक्षणे – ताप, तीव्र वेदना, दातखिळी बसणे
- उपचार – लसीकरणासाठी ञिगुणी लस
७) न्यूमोनिया (Pneumonia)
७) न्यूमोनिया (Pneumonia)
- जीवाणू – डिप्लोकोकस न्युमोनी
- प्रसार – हवेमार्फत
- अवयव – फुप्फुसावर सुज येणे
- लक्षणे – छाती दुखणे, श्वसनासाठी ञास, थंडी वाजून येणे, ताप आणि घाम येणे आणि खोकला (सूखी किंवा कफ).
- उपचार – औषध पेनिसीलीन
८) कुष्ठरोग (Leprosy)
८) कुष्ठरोग (Leprosy)
- जीवाणू – मायकोबॅक्टेरियम लेप्रि
- प्रसार – रक्त, द्रवबिंदू
- अवयव – परिघीय चेतासंस्था
- लक्षणे – त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर चट्टे, सुरकत्या पडणे, बोट झडणे
- उपचार – औषध म्हणून Dapsone, Quinolones, Rifampicin , लस उपलब्ध नाही.
विषाणू (virus) व विषाणूजन्य रोग
विषाणू (virus) व विषाणूजन्य रोग
- विषाणू हे नाव पॅस्टिअर (Pasteur) या शास्त्रज्ञाने दिले.
- विषाणूंना ठराविक पेशीरचना नसल्यामुळे ते अपेशीय (Non Cellular) स्वरूपाचे असतात व विषाणूंमध्ये पेशीरस, पेशीभित्तिकाही नसते.
- विषाणूंमध्ये एकतर DNA असतात किंवा RNA असतात, दोन्ही एकञ असत नाहीत.
- सर्वच विषाणू घातक असतात व यांच्यामुळे वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये रोग निर्माण होतात.
- विषाणूंचा आकार अतिशय सूक्ष्म असल्याने ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने पाहिले जाऊ शकतात.
१) कांजण्या (Chicken pox)
१) कांजण्या (Chicken pox)
- विषाणू – व्हॉरिसेल्ला झोस्टर
- प्रसार – संपर्क, द्रवबिंदू
- अवयव – त्वचा
- लक्षणे – पूर्ण त्वचेवर पाण्यासारखे फोड येणे
- उपचार – वॅरिसेला विरोधी लस
- हा रोग एकदा होऊन गेल्यावर दुसर्यांदा होत नाही. त्याची रोगप्रिकारक क्षमता जन्मभर टिकते.
२) देवी रोग (Small pox)
२) देवी रोग (Small pox)
- विषाणू -वॅरिआेला
- प्रसार – द्रवबिंदूंच्या मार्फत
- अवयव -त्वचा
- लक्षणे -आंधळेपणा, ताप, अंगावर पुरळ
- उपचार – देवीची लस
३) गोवर (Measles/Rubeola)
३) गोवर (Measles/Rubeola)
- विषाणू – मिस्कोवायरस
- प्रसार -हवा, द्रवबिंदू तसेच संपर्कामार्फत
- अवयव -त्वचा
- लक्षणे -लाल रंगाचे पुरळ, ताप
- उपचार -MMR ञिगुणी लस
४) पोलिओ (Polio)
४) पोलिओ (Polio)
- विषाणू -एन्ट्रो वायरस
- प्रसार -दूषित अन्न व पाणी
- अवयव – मध्यवर्ती चेतासंस्था
- लक्षणे -अशक्तपणा, ताप, घसा लाल होणे
- उपचार – साल्क व सॅबिन या दोन लसी उपलब्ध.
५) स्वाईन फ्ल्यू (Swine flu)
५) स्वाईन फ्ल्यू (Swine flu)
- विषाणू -H1 N1 (पॅन्डेमिक)
- प्रसार – हवा
- अवयव – श्वसनसंस्था
- लक्षणे – ताप, खोकला, थकवा, घसा लाल होणे, छातीत दुखणे
- उपचार – औषध म्हणून टॅमिफ्ल्यू/फ्ल्यूवीर/रेलेन्झ आणि लसीकरणासाठी वॅक्सीग्रीप ञिगुणी लस
६) रेबीज (Rabies)
६) रेबीज (Rabies)
- विषाणू -Rhabdovirus
- प्रसार – कुञा, मांजर, ससा, माकड यांसारखे रेबीज झालेले प्राणी चावल्यामुळे
- अवयव -मध्यवर्ती चेतासंस्था
- लक्षणे – पाण्याची भिती वाटणे (), अशक्तपणा, ताप, हाता-पायावर सुज येणे
- उपचार – रेबीज विरोधी लस
७) हेपॅटॅटिस (Hepatatis)
७) हेपॅटॅटिस (Hepatatis)
- विषाणू – A, B, C, D व E हे पाच प्रकारचे विषाणू
- प्रसार – A आणि E अन्न व पाण्यामार्फत होतात तर B, C व D रक्ताद्वारे किंवा लैंगिक प्रजननाद्वारे पसरले जातात.
- अवयव – यकृत
- लक्षणे – त्वचा व डोळे पिवळे पडणे, पोटदुखी, मळमळ, भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी, राखाडी रंगाची मैला.
- उपचार – A, B आणि D साठी लस उपलब्ध आहे परंतु C व E साठी लस उपलब्ध नाही.
८) गालफूगी (Mumps)
८) गालफूगी (Mumps)
- विषाणू – पॅरामिक्झो वायरस
- प्रसार – थेट संपर्कामुळे
- अवयव – लाळग्रंथी
- लक्षणे – गाल फुगणे, अन्न व पाणी पिण्यास ञास होणे
- उपचार – MMR ञिगुणी लस
९) रूबेला (Rubella)
९) रूबेला (Rubella)
- विषाणू – मिक्झो वायरस
- प्रसार – संपर्क
- अवयव – मानेची ग्रथी
- लक्षणे – ग्रंथीचा आकार वाढणे, शरीरावर चट्टे येणे
- उपचार – MMR ञिगुणी लस
१०) AIDS
१०) AIDS
- विषाणू – HIV (Human Immuno Defficiency Virus)
- प्रसार – लागण झालेल्या व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध, रक्ताशी थेट संबंध संक्रमित आईकडून बाळाला, ड्रग्ज घेणार्या लोकांना संक्रमित सुया, ब्लेड्स इ.
- अवयव – ठराविक अवयवावर होणारा रोग नाही
- लक्षणे – AIDS हा अनेक रोगांचा समूह असल्यामुळे या रोगात क्षयरोग, किण्व संक्रमाण यांसारख्या संधीसाधू संक्रामक रोगांची लागण होते.
- उपचार – लस उपलब्ध नाही.
- निदान- ELISA ही चाचणी करतात.