जागतिक भूक निर्देशांक [Global Hunger Index]

पार्श्वभूमी

जागतिक भूक निर्देशांक- Global Hunger Index हे देशातील उपासमारीच्या परिस्थितीचे मापन करण्याचे एक बहुमितीय साधन आहे.  हा निर्देशांक वर्षातून एकदा प्रसिद्ध केला जातो. इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (आईएफपीआरआय) या संस्थेने हा निर्देशांक तयार केला आणि २००६ मध्ये Welthungerhilfe या जर्मन NGO च्या सहाय्याने प्रथम प्रसिद्ध केला. २००७ पासून Concern Worldwide या आयरिश NGO ने सहप्रकाशक म्हणून सहभागी होण्यास सुरूवात केली.

निर्देशांकाचे मापन

हा निर्देशांक ० ते १०० या दरम्यान मोजला जातो. शून्य याचा अर्थ शून्य उपासमार आणि १०० याचा अर्थ पूर्ण उपासमार.

जागतिक भूक निर्देशांक -घटक

जागतिक भूक निर्देशांक [Global Hunger Index] चे चार निदर्शक घटक आहेत.

 १. एकूण लोकसंख्येमध्ये कुपोषित असणार्या व्यक्तींचे प्रमाण

२. ५ वर्षाखालील बालकांमधील कुपोषित असणार्या बालकांचे प्रमाण

३. ५ वर्षाखालील बालकांमधील खुंटलेली वाढ असणार्या बालकांचे प्रमाण

४. बाल मृत्यूदर – ५ वर्षाखालील बालकांमधील बाल मृत्यूदर

जागतिक भूक निर्देशांक २०१७

इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (आईएफपीआरआय) या संस्थेने २०१७ साठी जाहीर केलेल्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये ११९ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १०० वा आहे. २०१६ च्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक १६ वा होता. विशेष म्हणजे २०१४ च्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचा क्रमांक ५५ इतका होता.

या अहवालात भारताच्या शेजारी असणार्या राष्ट्रांचा क्रमांक पुढीलप्रमाणे आहे- चीन (२९), नेपाळ (७२), म्यानमार (७७), श्रीलंका (८४), बांगलादेश (88) तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान क्रमश: 106व्या व 107व्या स्थानी आहेत. या अहवालात भारताला ३१.४ इतके अंक प्राप्त झाले आहेत.