जागतिक बॅंक समुहामध्ये(WORLD BANK GROUP) पाच संस्थांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय पुर्नबांधणी व विकास बॅंक (International Bank for Reconstruction and Development-IBRD)
IBRD ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था असून ती मध्यम उत्पन्न असणार्या विकसनशील देशांना कर्जपुरवठा करते. एकञितपणे IBRD व IDA या दोघांना जागतिक बॅंक असे संबोधले जाते. या दोन्हींचे नेतृत्व व कर्मचारीवर्ग समान आहेत. IBRD स्वायत्त देशांना दळणवळण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उर्जा, स्वच्छता यांच्याशी संबंधित प्रकल्पांना कर्जपुरवठा करते.
ऐेतिहासिक पार्श्वभूमी
IBRD ची स्थापना ब्रेटनवुड परिषदेत १९४४ साली दुसर्या महायुद्धानंतर युद्धपिडीत युरोप पुर्नबांधणी करण्यासाठी केली होती. IBRD ची ध्येये मार्शल प्लान ने घोषित केली होती. १९४० व १९५० च्या दशकात IBRD ने युरोप मधील अनेक देशांना पायाभूत सुविधांसाठी कर्जपुरवठा केला. पहिले कर्ज फ्रांसला दिले गेले. युरोपच्या पुर्नबांधणीनंतर IBRD चे ध्येय जगातील गरिबी नष्ट करणे असे बदलण्यात आले.
स्थापना
IBRD १९४४ साली ब्रेटनवुड परिषदेत करण्यात आली. ती १९४६ साली कार्यरत झाली.
मुख्यालय
वाॅशिंग्टन डी. सी.
सदस्य
१८९. भारत हा संस्थापक सदस्य आहे.
कार्ये
- मध्यम उत्पन्न गटातील सदस्य देशांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.
- शाश्वत, न्याय व रोजगारवर्धक वृद्धीला प्रोत्साहन देणे.
- मध्यम व अल्प उत्पन्न गटातील देशांतील गरिबी नष्ट करणे.
आंतरराष्ट्रीय विकास संघटन (International Development Association-IDA)
प्रस्तावना | १९४० व १९५० च्या दशकात गरीब विकसनशील देशांना IBRD चा कर्जपुरवठा परवडण्याजोगा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा देशांना अतिसुलभ कर्जपुरवठा करणार्या संस्थेची आवश्यकता भासू लागली. यातुनच IDA चा उदय झाला. |
स्थापना | १९६० |
सदस्य | १७३. माञ त्यापैकी ८१ देश सुलभ कर्ज पुरवठयास पाञ आहेत. |
मुख्यालय | वाशिंग्टन डी.सी. |
कार्ये | IDA आपल्या अतिगरीब विकसनशील सदस्य देशांना व्याजविरहीत वित्तपुरवठा करते. म्हणुन तिला जागतिक बॅंकेची सुलभ कर्जखिडकी असे म्हणतात. |
आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ (International Finance Corporation-IFC)
स्थापना | १९५६ |
मुख्यालय | वाशिंग्टन डी.सी. |
सदस्य | १८४ |
कार्य | विकसनशील देशातील खाजगी क्षेञाच्या विकासासाठी गुंतवणूक सल्ला, मालमत्ता व्यवस्थापन इ. सेवा पुरविणे. |
बहुपक्षीय गुंतवणूक हमी अभिकरण (Multilateral Investment Guarantee Agency-MIGA)
स्थापना | १९८८ |
मुख्यालय | वाशिंग्टन डी.सी. |
सदस्य | १८१ |
कार्य | हे अभिकरण विकसनशील देशातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचे राजकीय व गैरव्यापारी जोखमींपासुन होणाऱ्या हानींबाबत हमी देते. |
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवाद निवारण केंद्र (International Centre for Settlement of Investment Disputes- ICSID)
स्थापना | १९६५ |
मुख्यालय | वाशिंग्टन डी.सी. |
सदस्य | १६१-(स्वाक्षरी करणारे व करारबद्ध ) १५३-(करारबद्ध) |
कार्य | हे केंद्र आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांच्या विवादांमध्ये समझाैता घडविण्यासाठी मध्यस्थ म्हणून कार्य करते. |