जागतिक कामगार संघटना (International Labour Organisation)

जागतिक कामगार संघटना (International Labour Organisation) ही संयुक्त राष्ट्राची कागमार प्रश्नाशी विशेषतः आंतरराष्ट्रीय कामगार मानके, सामाजिक सुरक्षा आणि सर्वांसाठी कामाची संधी यांच्याशी निगडीत असलेली संस्था आहे.

स्थापना –

जागतिक कामगार संघटनेची स्थापना १९१९ साली झाली.

मुख्यालय-

जागतिक कामगार संघटनेचे मुख्याालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आहे.

रचना-

जागतिक कामगार संघटनेची रचना ञिस्तरीय आहे. यामध्ये सरकारे, नियोक्ते आणि कामगारांची प्रतिनिधीत्व असते. सामान्यतः यांचे प्रमाण २ : १ : १ असे असते.

आंतरराष्ट्रीय कामगार परिषद-

जागतिक कामगार संघटनेकडून दरवर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे आयोजन केले जाते. तिलाच कामगार संसद असेही म्हणतात. या परिषदेत ठराव आणि शिफारसी मंजूर करून स्वीकृत केल्या जातात. प्रत्येक सदस्य राष्ट्राचे या परिषदेवर ४ प्रतिनिधी असतात. २ सरकारी प्रतिनिधी, १ नियोक्त्यांचा प्रतिनिधी व १ कामगारांचा प्रतिनिधी असतो.

प्रमुख-

जुआॅन सोमाविया हे आंतरराष्ट्रीय कागमार संघटनेचे १९९९ ते २०१२ पर्यंत महासंचालक होते. २०१२ पासून गाय रायडर हे जागतिक कामगार संघटनेचे महासंचालक आहेत.

सदस्य-

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे १८७ सदस्य आहेत. यापैकी १८६ सदस्य यूनोच्या सदस्यापैकी आहेत तर कूक आयलॅंड्स हा एक सदस्य आहे.

अंडोरा, भूतान, लक्स्टंस्टाईन, मायक्रोनेशिया, मोनॅको, नौरऊ आणि उत्तर कोरिया हे यूनोचे सदस्य जागतिक कामगार संघटनेचे सदस्य नाहीत.

नोबेल शांतता पुरस्कार- 

१९६९ मध्ये जागतिक कामगार संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. कामगारांसाठी चांगले व न्याय्य कार्य केल्याबद्दल आणि विकसनशील राष्ट्रांना तांञिक साहाय्य पुरवल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.