जहालमतवाद

जहालमतवादाच्या उदयाची कारणे :

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सन १९०५ ते १९२० या कालखंडामध्ये जहालमतवाद्यांचे वर्चस्व होते. या जहालमतवाद उदयास खालील कारणे कारणीभूत होती.

ब्रिटिशांनी भारताचे केलेले आर्थिक शोषण

ब्रिटिशांनी भारतामध्ये जे आर्थिक शोषणाचे धोरण अवलंबलेले होते. त्याविषयी मवाळ नेत्यांनी सतत आपले विचार मांडले होते. परंतु प्रत्यक्षात हे शोषण थांबविण्यासाठी काहीच केलेले नव्हते. दादाभाई नौरोजी, दिनशा वाच्छा व न्या. एम. जी. रानडे इत्यादी विचारवंतांनी ब्रिटिशाद्वारे केल्या गेलेल्या आर्थिक शोषणाचे अभ्यासपूर्ण विवेचन केलेले होते. भारतीयांच्या कल्याणापेक्षा ब्रिटिश आपल्या कारखानदारांची अधिक काळजी घेतात, हे स्पष्ट केलेले होते. भारतातून मिळविलेल्या पैशाच्या जोरावरच इंग्लंडधील औद्योगिकीकरण झालेले होते. दादाभाई नौरोजींनी आपल्या ‘आर्थिक नि:सारणाच्या सिद्धांता’द्वारे सिद्ध केले होते.

सन १८९२ च्या कायद्याने भारतीयांची केलेले निराशा :

सन १८९२ मध्ये कौन्सिल कायदा अस्तित्वात आला. या कायद्यान्वये केंद्रीय व प्रांतिक कायदेंडळात भारतीय सदस्यांच्या संख्येत वाढ केली होती व त्यांना काही हक्क दिले होते. परंतु वास्तवात या कायदेंडळात सरकारी सदस्यांचे बहुत होते व गव्हर्नर जनरला अधिक अधिकार मिळालेले होते. त्यामुळे या कायद्याने भारतीय नेत्याचा भ्रनिराश झाला. अंदाजपत्रकावर भारतीय सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार होता. परंतु त्यांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. ब्रिटिशांचे हे कूटील धोरण नेमस्त पुढाऱ्यांच्या लक्षात आले नाही. ब्रिटिशावरील नेमस्तांचा विश्वास अवास्तव आहे अशी भूमिका मांडून जहालमतवाद्यांनी नेमस्तांवर टिका केली. 

प्लेगच्या साथीकडे ब्रिटिशांनी केलेले दुर्लक्ष 

सन १८९६-९७ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात प्लेगची साथ पसरलेली होती. प्लेगच्या साथीचे निवारण करण्यासाठी रॅंड या अधिकाऱ्यांची प्लेगचा कमिशनर म्हणून नेमणूक केली. प्लेगच्या साथीचे निवारण करताना भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम केले. ब्रिटिश सैनिक प्लेगचे जंतू नष्ट करण्याच्या नावाखाली देवघरात प्रवेश करणे, सामानाची नासधूस करणे इत्यादी स्वरुपाचे प्रकार करु लागले. सनातनी वृत्तीच्या लोकांना हे सहन झाले नाही. प्लेगच्या साथीत लाखो लोक मृत्यू पावले. परंतु ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांर्भीयाने पाहिले नाही. म्हणून सर्वसामान्य जनतेतील प्रक्षोभ वाढत गेला. या प्रक्षोभाची प्रतिक्रिया म्हणजे पुण्यातील चाफेकर बंधुंनी २२ जुलै १८९७ रोजी रॅंड व ॲम्हर्स्ट या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खून केले. लोकमान्य टिळकांनी या घटनेचे समर्थन करत केसरीतून लिखाण केले. ब्रिटिश सरकारवर टिका केली म्हणून टिळकांना १८ महिन्यांची सक्त कारावासाची शिक्षा केली. या घटनेुळे ब्रिटिश विरोधी जनमत संघटित होण्यास मदत झाली व जहालमतवादी विचारसरणीस पोषक वातावरण निर्माण झाले.

भारतातील दुष्काळाबाबत ब्रिटिशांची उदासीनता

सन १८७५ ते १९०० या काळामध्ये भारतातील विविध भागामध्ये वारंवार दुष्काळ पडलेले होते. या दुष्काळाबरोबर रोगराई वाढलेली होती व लाखो लोक उपासमारीचे बळी पडलेले होते. परंतु या दुष्काळाच्या काळातही ब्रिटिश अधिकारी शेतकऱ्यांकडून शेतसारा वसूल करत होते. उपासमारीकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केलेले होते. ब्रिटिशांची दुष्काळ निवारण यंत्रणा पूर्णपणे निष्फळ झालेली होती. भयंकर दुष्काळी परिस्थितीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्यांच्यात प्रचंड रोष व चिड निर्माण होऊन हे लोक जहालवादी विचाराकडे आकर्षित झाले.

लॉर्ड कर्झनचे प्रतिगामी धोरण 

सन १८९८-१९०५ या काळात लॉर्ड कर्झन भारताचा व्हाईसरॉय म्हणून होता. भारतीयाबद्दल सहानुभूती नसणाऱ्या कर्झनला आपण भारतावर राज्य करण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत अशी त्याची भावना होती. ‘‘राष्ट्रीय सभा व राष्ट्रीयत्व यांचा शांतपणे मृत्यू घडून येईल’’ असे कर्झनचे म्हणणे होते. परंतु भारतामध्ये कर्झनच्या काळात त्याच्या विधानाच्या विपरित परिस्थिती निर्माण झाली. कलकत्ता महापालिका कायदा (१८९९), सरकारी गुप्ततेचा कायदा; विद्यापीठ कायदा (१९०४), बंगालची फाळणी (१९०५) या कर्झनच्या धोरणामुळे भारतीयांध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. कर्झनची भारतातील ७ वर्षांची एकतंत्री व अनियंत्रित राजवट म्हणजे शिष्टंडळे, चुका आणि आयोग अशीच होती. त्यामुळे भारतीय जनमानसावर त्यांची तीव्र प्रतिक्रिया उमटली व जहालमतवाद्यांच्या उदयास मदत झाली.

काँग्रेसची ध्येय धोरणे व कामगिरीबद्दल नाराजी 

काँग्रेसने सुरवातीच्या १५-२० वर्षांच्या काळात अंगिकृत केलेल्या ध्येय धोरणानुसार व प्रत्यक्ष कार्यपद्धतीमुळे काही साध्य झाले नाही. काँग्रेसच्या एकूण कामगिरीबद्दल तरुणामध्ये नाराजी होती. 

वाढत्या पाश्चात्यीकरणास विरोध

प्रारंभीच्या काँग्रेस नेत्यावर पाश्चात्य विचारांचा पगडा होता. यापैकी काही नेत्यांना पाश्चिमात्य धर्म, साहित्य, राजकीय संस्था, भाषा व संस्कृती ही भारतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे असे वाटत होते. भारतीय जीवनावर व विचारावर पडत असलेला पाश्चात्यांचा प्रभाव नव्या नेतृत्त्वाला चिंतित करणारा होता.  यावेळी आपल्या देशाबद्दल व धर्माबद्दल स्वाभिमान निर्माण करण्याचे कार्य स्वामी विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस, रविंद्रनाथ टागोर व लाला लजपतराय इत्यादी व्यक्तींनी केले. हिंदी राष्ट्रवाद हा हिंदू संस्कृतीचेच एक अंग आहे असे सर्वांना वाटत होते. शिकागोच्या जागतिक व्यासपीठावरुन स्वामी विवेकानंदांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व प्रतिपादन केले. राजकीय वर्चस्वाचा उपयोग ब्रिटिश लोक धार्मिक वर्चस्वासाठी करुन घेत आहेत, हे लक्षात आल्यावर भारतात असंतोष निर्माण होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव व शिवाजी महाराजांची जयंती उत्सव सुरू केला. बंगालमध्ये अरविंद घोष, बिपिनचंद पाल यांनी जहालमतवाद्यांचा प्रचार केला. राष्ट्र कार्य म्हणजे धर्म कार्य, ईश्वर कार्य असे सांगून अरविंद घोषांनी आपल्या विचारांना आध्यात्मिक बैठक प्राप्त करुन दिली. बंगालमध्ये त्यांनी काली उत्सव सुरू केला व त्यांच्या माध्यमातून हिंदुना संघटित करण्याचा प्रयत्न केला. बंकिमचंद्र चटर्जी व रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्या मधून नवतरुणांना लढाऊ राष्ट्रवादाची प्रेरणा मिळाली. या काळात बंकिमचंद्राच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील ‘वंदे मातरम्‌’ हे गीत फार लोकप्रिय झाले. वि. दा. सावरकरांनी लिहिलेल्या ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’ व ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ या ग्रंथांनी जहाल राष्ट्रवादाला प्रोत्साहन देण्याचे कार्य केले.

तत्कालीन आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव 

१९ व्या शतकाच्या अखेरिस वसाहतवादाच्या विरोधी ज्या चळवळी किंवा लढे जागतिक पातळीवर लढले गेले त्या घटनांचा भारतातील जहाल राष्ट्रवादाच्या उदयास प्रेरक घटक ठरलेल्या दिसतात. इजिप्त, इराण, तुर्कस्थान व रशिया मधील नवसमाजाच्या निर्मितीसाठी झालेल्या राष्ट्रवादी चळवळीमुळे भारतीयांच्यामध्ये नवीन आकांक्षा निर्माण झाल्या. यामध्ये चिनी लोकांनी परकीय दडपशाही विरुद्ध केलेले बॉक्सर बंड, इजिप्तमधील राष्ट्रवाद्यांनी पाश्चात्य सत्तांच्या दडपशाही विरुद्ध चालवलेली चळवळ, आर्यलंडधील ब्रिटिशविरोधी सिनकिन चळवळ इत्यादी समावेश होता. सन १८९६ मध्ये अडोवाच्या लढाईत ॲबिसिनियाने इटालीचा पराभव केला. सन १९०४-०५ मध्ये जपानने खंडप्राय रशियाचा पराभव केला. युरोपीय राष्ट्रे अजिंक्य आहेत व आशियायी राष्ट्रे मागास आहेत या कल्पनेला तडा गेला. वरील आंतरराष्ट्रीय घटनांुळे ब्रिटिशांचा पराभव करु शकतो असा आत्मविश्वास जहालमतवाद्यांना वाटू लागला.

जहालमतवादाच्या उदयास वृत्तपत्रांनी दिलेली प्रेरणा 

जहालमतवादाच्या उदयास तत्कालीन अनेक वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोकमान्य टिळक यांनी, ‘मराठा’ व ‘केसरी’ व बिपिनचंद्र पाल यांनी ‘न्यू इंडिया’ य वृत्तपत्रातून ब्रिटिशांच्या धोरणावर कठोर टिका केली. लाला लजपतराय यांनी ‘ट्रिब्यून’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून पंजाबमधील तरुणाच्या पर्यंत जहाल राष्ट्रवादाचा संदेश पोहचवण्याचे काम केले. बंगालमध्ये ‘बंगाली, ‘संध्या’, ‘युगांतर’ व ‘हिंदू पेट्रियट’या वृत्तपत्रांनी जहालमतवादाच्या प्रसाराचे काम केले. हिंदू पेट्रियटने तर ब्रिटिश निळ बागायतदारांच्या कडून मजूराच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. याशिवाय किशोरीचंद्र मित्र यांनी ‘इंडियन फिल्ड’, गिरीषचंद्र घोष यांनी संपादित केलेले ‘बंगाली’ व ‘नवगोपाळ’ अशा वृत्तपत्रांनी व साप्ताहिकांनी जहाल राष्ट्रवादाच्या प्रसाराचे कार्य केले.

बंगालची फाळणी 

लॉर्ड कर्झन याने सन १९०५ मध्ये बंगाल प्रांताचा विस्तार क्षेत्रफळ १ लाख ९० हजार चौ. मैल, लोकसंख्या ८ कोटी व प्रशासकीय गैरसोयींचे कारण पुढे करुन पूर्व बंगाल व पश्चिम बंगाल अशी फाळणी केली. पश्चिम बंगालमध्ये बहुसंख्य हिंदू होते व पूर्व बंगालमध्ये बहुसंख्य मुस्लीम संख्यांक होते. हिंदू- मुस्लीम यांच्यात या फाळणीच्या माध्यमातून फूट पाडणे व भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खिळ घालणे हा खरा हेतू या फाळणीच्या मागे होता. ‘फोडा व झोडा’ या नितीचा अवलंब करुन हिंदू-मुस्लीम अशी फूट पाडण्याच्या कर्झनच्या धोरणाला तीव्र विरोध झाला. फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन सुरू केले. या चळवळीच्या माध्यमातून जहालमतवाद्यांनी स्वदेशी, बहिष्का, स्वराज्य व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचा कार्यक्रम घोषित केला. विदेशी वस्तूच्या बहिष्काराला व्यापक स्वरूप प्राप्त झाले व संपूर्ण भारतातून याला प्रतिसाद मिळाला त्यामुळे स्वदेशी वस्तूचा वापर वाढला. राष्ट्रवादी तरुणांनी क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केल्या. बंगालच्या फाळणी विरुद्ध निर्माण झालेली जनचळवळ व यांच्या माध्यमातून उदयास आलेला प्रखर जहाल राष्ट्रवाद ब्रिटिशांच्या नजरेत भरणारा व नोंद घेण्यासारखा ठरला.

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: