चलनवाढीला महागाई, भाववाढ,चलनविस्तार,मुद्रास्फिती असेही म्हणतात. वस्तू व सेवांच्या सामान्यपणे असणाऱ्या किंमत पातळीमध्ये होणारी अनियंञित परंतु नियमित वाढ म्हणजे चलनवाढ होय. वस्तू व सेवांच्या किंमती अाज वाढत असतील व काही कालावधीनंतर कमी होत असतील तर त्याला चलनवाढ म्हणता येणार नाही. तसेच फक्त एकाच वस्तू किंवा सेवेची किंमत वाढत असेल तर त्याला चलनवाढ म्हणता येणार नाही. बहुतांश वस्तू व सेवांच्या किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे चलनवाढ होय.
चलनवाढीचे दोन प्रमुख सिध्दांत पुढीलप्रमाणे अाहेत.
१. मागणी ताण चलनवाढ
२. खर्च दाब चलनवाढ
केन्सवादी दृष्टिकोन
१. मागणी ताण चलनवाढ-
केन्सवाद्यांच्या मते मागणी पुरवठा यांच्यात असमतोल निर्माण झाल्यास चलनवाढ होते. पुरवठा स्थिर असताना मगणीमध्ये वाढ झाली किंवा मागणी स्थिर असताना पुरवठ्यामध्ये घट झाली तर मागणी-ताण चलनवाढीची परिस्थिती निर्मााण होते. केन्सवाद्यांच्या मते सरकारी खर्चात कपात व करांमध्ये वाढ करून मागणी ताण चलनवाढ नियंञणात अाणता येते.
२. खर्च दाब चलनवाढ-
केन्सवाद्यांच्या मते उत्पादनप्रक्रियेमध्ये उत्पादक घटकांचा खर्च वाढल्यास खर्च दाब चलनवाढ घडून येते. मजुरीमधील वाढ, करआकारणी ही या प्रकारच्या चलनवाढीमागील कारणे आहेत. केन्सवाद्यांच्या मते किंमती व उत्पन्नावरील नियंञण हे अशा चलनवाढीवरील प्रत्यक्ष उपाय अाहेत तर नैतिक मनवळवणी व कामगार संघटनांच्या मक्तेदारीवर नियंञण हे अप्रत्यक्ष उपाय अाहेत.
१. मागणी ताण चलनवाढ-
चलनवाद्यांच्या मते उत्पादनाची स्थिर पातळी असताना ग्राहकांकडे अतिरिक्त खरेदीशक्ती तयार होणे म्हणजेच मागणी ताण चलनवाढ होय. ही अतिरिक्त खरेदीशक्ती मजुरीतील वाढ व सरकारचा तुटीचा अर्थभरणा या कारणांमुळे होते. म्हणजेच उत्पादन व पुरवठ्यात वाढ न होता झालेली अतिरिक्त चलननिर्मिती हे या प्रकारच्या चलनवाढीचे कारण अाहे.
२. खर्च दाब चलनवाढ-
चलनवाद्यांच्या मते खर्च दाब हा चलनवाढीचा स्वतंञ सिध्दांत नसून त्याला सुध्दा अतिरिक्त पैसा निर्मितीच कारणीभूत आहे. उदा. वेतनवाढ, सार्वजनिक कर्जउभारणी व चलननिर्मिती इत्यादी. चलनवाद्यांच्या मते उत्पादनाची पातळी व पैशाचा पुरवठा यामध्ये समतोल असला पाहिजे. जर अर्थव्यवस्थेत पैशाचा अतिरिक्त पुरवठा वाढला तर चलनवाढीची परिस्थिती निर्माण होते. चलनवाद्यांच्या मते योग्य मौद्रिक धोरणाद्वारेच महागाईवर नियंञण ठेवता येते. उदा. पैशाचा पुरवठा, व्याजाचे दर, सार्वजनिक कर्जउभारणी,इ.
मागणी ताणास कारणीभूत घटक-
१. तूटीचा अर्थभरणा
२. शासकीय खर्चात वाढ
३. चलनपुरवठ्यातील वाढ
४. खाजगी खर्चात वाढ
५. करांमधील कपात
६. स्वस्त पैशाचे धोरण
७.लोकसंख्यावाढ
८. काळा पैसा
खर्च दाबास कारणीभूत घटक-
१. उत्पादक घटकांची टंचाई
२. साठेबाजी
३. नैसर्गिक संकटे
चलनवाढीच्या दरावरून पुढील प्रकार पडतात.
१) रांगणारी महागाई- दर ३ टक्क्यांपेक्षा कमी असतो. ही महागाई धोकादायक नसते.
चालणारी महागाई- दर ३ ते ७ टक्के इतका असतो. ही महागाई अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अावश्यक असते.
धावणारी महागाई- दर १० ते २० टक्के असतो.
बेसुमार महागाई- दर २० ते १०० टक्के किंवा अधिक असतो.
इतर महत्त्वाच्या संकल्पना
या प्रकारच्या चलनवाढीचा समावेश मागणी-ताण चलनवाढ यातच होतो. अर्थव्यवस्थेत मागणी स्थिर पातळीवर असताना पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यास अशा प्रकारची चलनवाढ घडून येते. पुरवठ्यामध्ये घट होण्यामागे आपत्ती, अपघात व गैरव्यवस्थापन यासारखी कारणे असतात.
भारतात ही संकल्पना सर्वप्रथम २०००-०१ साली वापरण्यात आली. ऊर्जा व खाद्यपदार्थ वगळता इतर सर्व वस्तू सेवांमधील असलेली चलनवाढ म्हणजे Core Inflation होय.
महागाई कर (Inflation Tax)
शासन तूटीचा अर्थभरणा करण्यासाठी नोटा छापून चलनात अाणतो. माञ तूटीच्या अर्थभरण्यामुळे चलनवाढ होते. चलनवाढीमुळे पैशाचे मूल्य घटते व पैसा बाळगणार्या व्यक्तींचे नुकसान होते. या प्रक्रियेत चलनवाढ ही कर असल्याप्रमाणे कार्य करते.
महागाई चक्र (Inflation Spiral)
चलनवाढीची अशी अवस्था ज्यामध्ये वेतनवाढीमुळे चलनवाढ होते यालाच महागाई चक्र असे म्हणतात. यालाच वेतन-किंमत चक्र असेही म्हणतात.
Inflation Premium
चलनवाढीमुळे पैशाचे मूल्य घटते व पैशाचे मूल्य घटल्यामुळे कर्जदारांना किंवा रृणकोंना फायदा होतो यालाच Inflation Premium असे म्हणतात.
फिलीप्स वक्र (Phillips curve)
अर्थव्यवस्थेतील चलनवाढ व बेरोजगारी यांच्यातील संबंध दर्शविणारा आलेख म्हणजेच फिलीप्स वक्र होय. फिलीप्स वक्रानुसार चलनवाढ व बेरोजगारी यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असते. म्हणजेच चलनवाढीचा दर कमी असेल तर बेरोजगारीचा दर जास्त असतो अणि चलनवाढीचा दर जास्त असेल तर बेरोजगारीचा दर कमी असतो.
मुद्रा संस्फिती (Reflation)
बेरोजगारी कमी करण्यासाठी व आर्थिक वाढीसाठी बाजारात मागणी वाढवण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली चलनवाढ म्हणजेच मुद्रा संस्फिती होय. मोठ्या प्रमाणातील सार्वजनिक खर्च, करकपात, व्याजदर कपात, अतिरिक्त चलननिर्मिती , वेतनवाढ या प्रकारांनी अशी चलनवाढ घडवून अाणली जाते.
मुद्रा अवपात
मुद्रा अवपात ही अशी विरोधाभासाची स्थिती अाहे की ज्यात चलनवाढीचा दर उच्च असतो तर बेरोजगारीचा दरही उच्च असतो.(फिलीप्स वक्र पाहा)
अर्थव्यवस्थेतील विविध घटकांवर चलनवाढीचा होणारा परिणाम पुढीलप्रमाणे आहे.
ऋणको व धनको
चलनवाढीचा ऋणकोंना लाभ होतो व धनकोंचे नुकसान होते.
वित्तपुरवठ्यावर होणारा परिणाम
मागणीवर होणारा परिणाम
चलनवाढ मागणीमध्ये वाढ दर्शविते व पुरवठ्यामध्ये घट दर्शविते.
गुंतवणूकीवर होणारा परिणाम
चलनवाढीमुळे गुंतवणूकीचे प्रमाण वाढते.
बचतीवर होणारा परिणाम
चलनवाढीमुळे बचतदर वाढतो माञ ही वाढ अल्पकालिक असते.
करदात्यांवर होणारा परिणाम
अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत किंमती वाढल्याने ग्राहकांवर अप्रत्यक्ष करांचा अधिक बोजा पडतो.
चलनवाढीमुळे सरकारच्या कर उत्पन्नामध्ये वाढ होते.
विनिमय दरावर होणारा परिणाम
चलनवाढीमुळे देशाच्या चलनाचे अवमूल्यन होते म्हणजेच चलनाचा परकीय चलनाच्या संदर्भात विनिमय दर कमी होतो.
निर्यातीवर होणारा परिणाम
चलनवाढीमुळे निर्यातीचे आकारमान वाढते.
आयातीवर होणारा परिणाम
चलनवाढीमुळे आयात घटते.
व्यापारतोलावर होणारा परिणाम
विकसित देशाच्या बाबतीत चलनवाढीमुळे व्यापारतोल अनुकुल होतो तर विकसनशील देशाच्या बाबतीत व्यापारतोल प्रतिकूल बनतो. याचे कारण विकसनशील देशामध्ये आयात-निर्यात संरचना लवचिक नसते. आयात महाग झाली असली तर तेलासारख्या वस्तू आयात करणे अनिर्वार्य असते.
बेरोजगारीवर होणारा परिणाम
चलनवाढीमुळे बेरोजगारीचा दर कमी होतो.(फिलीप्स वक्र पाहा)