ग्रॅमी पुरस्कार

ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक  पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो. 

पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स व न्यूयॉर्क ह्या शहरांमध्ये साजरा झाला, तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जात आहेत. २००४ पासून हा सोहळा लॉस एंजेल्सच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो आहे.

ग्रॅमी पुरस्कार-२०१८

  • संगीत जगतातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे झाला.
  • ‘उदयोन्मुख कलाकार’ म्हणून अॅलिसिया कारा आणि ‘सर्वोत्कृष्ट लॅटिन अल्बम’ या गटासाठी शकिरा या दोघी पुरसकारासाठी पाञ ठरल्या आहेत.
  • या पुरस्काराव्यतिरिक्त सर्व महत्त्वाचे पुरस्कार ब्रुनो मार्स, केंड्रिक लामार आणि एड शीरन यां परूषांनी पटकावले आहेत.
  • यात ‘आर अँड बी’ स्टार ब्रुनो मार्स याला २४ के मॅजिक अल्बमसाठी एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले. त्याला ‘अल्बम ऑफ द इयर’ व ‘रेकॉर्ड ऑफ द इयर’ हे दोन्ही सन्मान प्राप्त झाले.
  • यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारात केंड्रिक लमार हा दुसरा मोठा विजेता ठरला, त्याला ‘एलपी डॅम्न’ साठी बेस्ट रॅप अल्बम तर ‘हंबल’ या गीतासाठी बेस्ट रॅप साँग, बेस्ट रॅप कामगिरी, उत्कृष्ट संगीत चित्रफीत हे पुरस्कार मिळाले.