गोपाळ गणेश आगरकर

जन्म व शिक्षण

गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू येथे एका गरीब कुटुंबात झाला. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला.

गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य
  • १८८० मध्ये आगरकरांनी मुंबई येथे विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
  • पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले. पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.
  • आगरकर हे, बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.
  • १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले.  सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.
  • आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील.
  • कोल्हापूर प्रकरणावरून आगरकर व टिळक यांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा   डोंगरीच्या तुरुंगातील १०० दिवस हा लेख प्रसिद्ध आहे.
  • स्ञियांनी जाकीटे घातलीच पाहिजेत हा लेख त्यांनी लिहिला होता.