कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय

  • कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय ही योजना  भारत सरकार तर्फे ऑगस्ट २००४ मध्ये सुरु करण्यात आली. १ एप्रिल २००७ पासून ती सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमात विलीन करण्यात आली जी आता त्या कार्यक्रमाचा एक विभाग म्हणून काम करते.
  • या योजनेचा मुख्य उद्देश दुर्बल वर्गांच्या आणि मागासलेल्या भागांतील विशेषतः अनुसूचित जाति ,अनुसूचित जमाति , अन्य मागास वर्गातील मुलींसाठी उच्च प्राथमिक स्तराच्या निवासी शाळा सुरु करणे हा होता.
  • ही योजना शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या गटात लागू आहे, ज्या गटात ग्रामीण महिला साक्षरता राष्ट्रीय सरासरीपेक्षा(४६.१३ %, २००१ ची जनगणना)  कमी आहे आणि साक्षरतेतील लिंगभेद राष्ट्रीय सरासरीपेक्षा(२१.५९%, २००१ ची जनगणना) जास्त आहे.
  • या विद्यालयातील ७५ टक्के जागा अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती , अन्य मागास वर्ग व अल्पसंख्यांक मुलींसाठी  आणि उर्वरित २५ टक्के जागांमध्ये दारिद्र्य रेषेखालील मुलींना प्राधान्य असते.