कटक मंडळ

प्रस्तावना

लष्करी लोक समूह व नागरी समुह यांना नागरी सुविधा पुरवण्याकरिता तसेच कल्याणकारी योजना अमलात आणण्यासाठी लष्करी कटक मंडळ ही नागरी स्वशासन संस्था निर्माण झाली.

 • भारतात छावणी क्षेत्राची स्थापना १९२४ च्या कॅन्टोन्मेंट कायद्याने झाली.
 • सध्या छावणी मंडळाचा कारभार कटक अधिनियम २००६ नुसार चालतो. हा अधिनियम संपूर्ण भारतासाठी लागू आहे.
 • छावणी मंडळाची स्थापना केंद्र सरकारकडून केली जाते. भारताच्या संरक्षण खात्याकडून छावणी क्षेत्राचे नियमन केले जाते. सैनिकी प्रशासनाचा एक भाग म्हणून छावणी कार्य करते. ती स्वायत्त असते. तिला एक सामान्य मुद्रा असते. तिला स्वतःची मालमत्ता प्राप्त करता येते तसेच तिची विल्हेवाटही लावता येते़
 • भारतामध्ये एकूण ६२ छावणी मंडळे आहेत.

सर्वाधिक छावणी मंडळे मध्यप्रदेशमध्ये (१३) असून महाराष्ट्रात पुढील ७ छावणी मंडळे आहेत-

 1. औरंगाबाद
 2. कामठी (नागपूर)
 3. अहमदनगर
 4. देहू
 5. खडकी
 6. पुणे कॅम्प
 7. देवळाली (नाशिक)

कटक मंडळांची रचना

लोकसंख्येच्या आधारावर छावणीचे ४ प्रकार पडतात.

 • प्रथम श्रेणी : ५०००० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी.
 • द्वितीय श्रेणी : ज्या छावणीची लोकसंख्या १०००० पेक्षा अधिक आहे व ५०००० पेक्षा कमी
 • तृतीय श्रेणी : ज्या छावणीची लोकसंख्या २५००पेक्षा आ धिक १०००० पेक्षा कमी आहे.
 • चतुर्थ श्रेणी: ज्या छावणीची लोकसंख्या २५०० पेक्षा कमी आहे.

सदस्य संख्या

छावणी मंडळाची सदस्य संख्या वर्गानुसार वेळोवेळी निश्चित केली जाते. यात नियुत्त सदस्य व निर्वाचित सदस्य असतात. सध्या छावणी मंडळाची सदस्य संख्या 15 इतकी आहे. यापैकी 1) आठ सदस्य नामनिर्देशित तर 2) सात सदस्य निर्वाचित असतात.

नामनिर्देशित सदस्य – 8

 • छावणीचा मुख्य लष्करी अधिकारी
 • जिल्हाधिकाऱ्याकडून नामनिर्देशित प्रथम वर्ग दंडाधिकारी
 • छावणीचा आरोग्य अधिकारी
 • छावणीचा कार्यकारी अभियंता
 • 4 सदस्य मुख्य लष्करी अधिकाऱ्याकडून नामनिर्देशित

पदाधिकारी –

कटकमंडळाचा मुख्य लष्करी अधिकारी हा अध्यक्ष असतो. तर उपाध्यक्ष हा निर्वाचित सदस्यांमधून निवडला जातो. निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल 3 वर्षाचा असतो.