एकात्मिक बाल विकास सेवा

एकात्मिक बाल विकास सेवा

 • राष्ट्रीय बाल धोरण-१९७४ च्या तरतूदींना अनुसरून १९७५ मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा ही योजना सुरू झाली.
 • ही एक केंद्रीय योजना आहे. या योजनेचे उद्देश सहा वर्षांखालील बालकांना व गर्भवती-स्तनदा मातांना पोषणविषयक व प्राथमिक आरोग्यविषयक सुविधा पुरविणे हे आहे.
 • या सुविधा आंगणवाडीच्या माध्यमातून पुरविल्या जातात.

उद्दिष्टेे

 • सहा वर्षांखालील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा स्तर उंचावणे.
 • बालकांच्या मानसिक, शारिरिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
 • बालमृत्यू, कुपोषण, व शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
 • बाल विकासाशी संबधित सर्व विभागांमध्ये समन्वय साधणे.
 • बालकांच्या मातांना पोषणविषयक व प्राथमिक आरोग्यविषयक माहिती पुरविणे.
 • गर्भवती व स्तनदा मातांना पोषण आहार पुरविणे.

सेवा

या योजनेंतर्गत पुढील सेवा पुरविल्या जातात.

 • लसीकरण
 • पूरक पोषण आहार
 • आरोग्य तपासणी
 • रेफरल सेवा
 • शाळापूर्व अनाैपचारिक शिक्षण
 • पोषण व आरोग्यविषयक माहिती

लसीकरण, आरोग्य तपासणी व रेफरल सेवा या सेवा सार्वजनिक आरोग्य सेवेमार्फत पुरविल्या जातात

या योजनेत केंद्र व राज्ये यांचा वाटा- पूरक पोषणाच्या बाबतीत ५०:५० तर इतर बाबतीत ९०:१० असा आहे( ईशान्येकडील राज्यांकरिता सर्व बाबतीत  ९०:१० असा आहे).