उपराष्ट्रपती

संविधानाच्या पाचव्या भागात उपराष्ट्रपती पदाविषयी तरतूदी आहेत.

उपराष्ट्रपतीची निवडणूक

संविधानातील कलम ६६(१) नुसार, उपराष्ट्रपती एका निर्वाचकगणाकडून निवडला जाईल. या निर्वाचकगणामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असेल. उपराष्ट्रपतींची निवडणूक, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे घेतली जाईल आणि अशा निवडणूकीतील मतदान, गुप्त मतदान पद्धतीने होईल.

निवडणूक विवाद

 1. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीतून उद्भवणारे किंवा त्याच्याशी निगडित असणारे सर्व शंकास्पद मुद्दे व विवाद यांची चाैकशी व निर्णय, सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात येईल व त्याचा निर्णय अंतिम असेल.
 2. जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली तर त्याने आपल्या पदाचे अधिकार वापरताना व कर्तव्ये पार पाडताना केलेल्या कृती अविधीग्राह्य ठरत नाहीत.
 3. संविधानातील तरतूदींशी अधीन राहून, संसदेला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधीच्या किंवा तिच्याशी निगडित असलेल्या कोणत्याही बाबींचे कायद्याद्वारे नियमन करता येईल.
 4. एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक निर्वाचकगणामध्ये कोणत्याही कारणामुळे सदस्याची एखादी जागा रिक्त असल्याच्या कारणामुळे प्रश्नास्पद करता येणार नाही.

उपराष्ट्रपती पदासाठी पाञता

 1. तो भारताचा नागरिक असावा.
 2. त्याने वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत.
 3. तो राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पाञ असावा.
 4. तो कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा. अपवाद- कार्यरत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, केंद्र किंवा राज्यातील मंञी.

उपराष्ट्रपती पदासाठी शर्ती

उपराष्ट्रपती संसदेच्या किंवा कोणत्याही राज्याच्या विधीमंडळाचा सदस्य नसावा. असा सदस्य उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास तो उपराष्ट्रपती म्हणून ज्या दिनांकास पद ग्रहण करेल त्या दिनांकास त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असे मानण्यात येईल.

उपराष्ट्रपतींचा पदावधी

 1. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करतील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीसाठी पद ग्रहण करतील.
 2. ते, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतील.
 3. राज्यसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या व लोकसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करता येईल. परंतू यासाठी कोणताही ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल किमान चाैदा दिवसांची नोटीस द्यावी लागते.
 4. ते, आपला पदावधी संपला असला तरी, त्यांचा उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत आपले पद धारण करणे चालू ठेवतील.
 5. उपराष्ट्रपतींचे पद धारण करणारी किंवा धारण केलेली व्यक्ती, संविधानातील अन्य तरतूदींना अधीन राहून त्या पदासाठी होणार्या पुर्ननिवडणूकीस पाञ असेल.

उपराष्ट्रपतींनी घ्यायची शपथ किंवा प्रतिज्ञा

 1. कलम ६९ नुसार उपराष्ट्रपतींना आपले पद ग्रहण करण्यापूर्वी, राष्ट्रपतींच्या समक्ष किंवा त्यांनी यासंबंधात नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समक्ष शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करावी लागते.
 2. कलम ६९ मधील शपथेचा नमुना दिला आहे- मी क.ख. ईश्वरसाक्ष शपथ घेतो की/गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो मी कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि आता जे कर्तव्य अंगीकारणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडीन.

उपराष्ट्रपतीपद रिक्त होणे

उपराष्ट्रपतींचे पद पुढील कारणांमुळे रिक्त होते.

 1. पदावधी समाप्त झाल्याने
 2. राजीनामा
 3. पदच्युती
 4. मृत्यू
 5. इतर कारणांनी जसे निवडणूक अवैध ठरवल्याने किंवा अपाञतेमुळे

उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यावर करावयाची कार्यवाही कलम ६८ मध्ये नमूद केली आहे. यानुसार

 1. पदावधी समाप्त झाल्याने रिक्त होणारे पद भरण्यासाठी निवडणूक घ्यावयाची असेल तर, तो अवधी संपण्यापूर्वी निवडणूक पूर्ण करण्यात येईल.
 2. अन्य कारणांमुळे पद रिक्त झाले असेल तर ते पद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्यात येईल आणि निवडून आलेली व्यक्ती आपले पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीसाठी पदावर राहील.

निवडणूक विवाद-

कार्ये व अधिकार-

भारतीय व अमेरिकन उपराष्ट्रपतींची तुलना-

भारताचे उपराष्ट्रपती-