उत्सर्जन संस्था (Excretory System)

प्रत्येक सजीवाच्या पेशीमध्ये सतत जैवरासायनिक क्रिया घडत असतात. या पेशीद्वारे तयार झालेले व शरीरासाठी टाकाऊ असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजे उत्सर्जन होय. मानवातील उत्सर्जन संस्था (Excretory System) येथे अभ्यासू.

मानवी उत्सर्जन संस्था (Excretory System)

मानवी उत्सर्जन संस्थेचे मुख्य घटक- वृक्कांची जोडी (Pair of Kidney), मूञवाहिनीची जोडी (Pair of Ureter), मूञाशय (Urinary Bladder) ,मूञोत्सर्जन मार्ग (Urethra)

१) वृक्क (Kidney)

 • पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस वृक्क असते. म्हणजे मानवी शरीरात घेवड्याच्या बियांच्या आकाराची दोन वृक्के असतात.
 • वृक्कांची लांबी 10 ते 12 cm असून रुंदी ५ ते ७ cm तर जाडी २ ते ३ cm असते.
 • उजवे वृक्कावर यकृत ग्रंथी असल्यामुळे हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते.
 • वृक्कांची शरीरातील जागा ही छातीच्या मनक्यातील १२ व्या हाडापासून ते कंबरेच्या मनक्यातील तिसर्या हाडापर्यंत असते.  वृक्कांच्या बाह्य आवरणाला वलकुट असे म्हणतात.
 • वृक्कांच्या कार्यात्मक व रचनात्मक घटकाला नेफ्राॅन असे म्हणतात.
 • वृक्काचे वजन पुरुषांमध्ये 125 ते १70 ग्रॅम असून स्त्रियांमध्ये 115 ते  155 ग्रॅम असते.
 • मानवी शरीरातील रक्त वृक्कामधून दररोज 400 वेळा गाळले जाते.
 • वृक्कांमार्फत दररोज साधारणपणे 180-190 लीटर द्रव गाळणातून 1 – 1.9 लीटर मूत्र तयार होते.
 • मूञवहिनीची लांबी ४० सेमी. असते.
 • मूञ हे आम्लधर्मीय असून त्याचा PH 6.00 असतो.
 • युरोक्रोम/युरो-बिलीनोजन या घटकामुळे मूञाला पिवळा रंग प्राप्त होतो.
 • मुञामध्ये ९५% पाणी, २.५% युरिया आणि २.५% उर्वरित पदार्थ असतात. माणूस दररोज जवळपास २५ ते ३० ग्रॅम युरिया शरीराबाहेर टाकतो.
 • वृक्कामध्ये कॅल्शियम आॅक्झलेटचे खडे जमा होणे यालाच मुतखडा असे समजतात.

वृक्काचे कार्य (Functions Of Kidney)

 •  रक्तातील अमोनिया, युरिया व युरिक आम्ल यासारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे.
 •  रक्तातील अयनांचे प्रमाण व सामु (pH)  संतुलित ठेवणे.
 •  रक्ताचा परासरण दाब, आकारमान, आम्ल-आम्लरींचे संतुलन तसेच रक्तदाब नियंत्रित करणे.
 •  वृक्कमुळे शर्करा, अमिनो आम्ले आणि पाणी यांचे पुनःअवशोषण घडून येते.
 •   वृक्कातील ADH (Anti Diuretic Hormone) या संप्रेरकामुळे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.

 

मित्रांसोबत शेयर करा.

Leave a comment

Your email address will not be published.

error: