ईस्ट इंडिया असोसिएशन

स्थापना व कार्ये

ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था दादाभाई नौरोजींनी १ डिसेंबर १८६६ रोजी लंडनमध्ये स्थापन केली. इंग्रज व हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असलेला गैरसमज दूर करणे आणि इंग्रजांना भारतीयांच्या अडचणीची माहिती करुन देणे हे या सभेचे उद्दिष्ट होते.

  • या असोसिएशनच्या वतीने हिंदूस्थान संबंधी इंग्लंडची कर्तव्ये, हिंदूस्थानमधील पाटबंधारे व कालवे, सिव्हील सर्व्हिसची परिक्षा या विषयासंबंधी इंग्लंडमधील लोकांना माहिती करुन देण्यात आली.
  • इ.स.१८६९ मध्ये दादाभाई नौरोजी हिंदूस्थानात आले. हिंदूस्थानातील राजे रजवाड्यांकडून आपल्या कार्यास अर्थसहाय्य मिळावे यासाठी काठेवाडातील संस्थानांचा दौरा काढून कच्छ, जुनागड, गोंडल येथून रक्कम जमा केली.
  • मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा उघडण्यात आल्या.
  • मुंबई शाखेच्या कार्यकारिणीवर सर जमोटजी जिजीभॉय, मंगलदास नथूभाई, प्रामजी नसरवानजी पटेल, डॉ. भाऊ दाजी, फिरोजशहा मेहता, बाळ मंगेश वागळे हे कार्यकर्ते कार्यरत होते.