इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

 • आॅक्टोबर २०१० मध्ये सुरूवात झालेली केंद्रपुरस्कृत योजना.
 • केंद्रीय महिला व बालकल्याण मंञालयामार्फत राबविली जाते.
 • या योजने अंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांसाठी काही अटींवर रोख रक्कम प्रदान केली जाते.जेणेकरून त्यांच्या पोषण व आरोग्याचा दर्जा वाढावा.
 • या योजनेसाठी ICDS या योजनेचा प्लॅटफॉर्म वापरला जातो.
 • देशातील निवडक ५२ जिल्ह्यांमध्ये( सध्या ५३ जिल्ह्यांमध्ये) ही योजना राबवली जाते. यात महाराष्टृातील अमरावती व भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
 • सुरूवातीस या योजनेत लाभार्थ्यांना तीन हप्त्यांमध्ये ४००० रू दिले जात. माञ राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानंतर यात बदल करण्यात आला.
 • सध्या या योजनेत लाभार्थ्यांना दोन हप्त्यांमध्ये ६००० रू. फक्त बॅंक किंवा पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून दिले जातात. पहिला हप्ता गर्भधारणेच्या तिसर्या तिमाहीमध्ये व दुसरा हप्ता सर्व अटींची पूर्तता केल्यावर बाळंतपणानंतर सहा महिन्यांनंतर दिला जातो.
 • संघटित क्षेञातील कर्मचार्यांना पगारी मातृत्व रजा मिळत असल्याने त्यांना या योजनेतून वगळले आहे.
 • १९ वर्षावरील गर्भवती महिलांना पहिल्या दोन यशस्वी(जीवंत) बाळंतपणासाठी या योजनेचा लाभ मिळतो.
 • गर्भधारणा व स्तनदा काळातील गमावलेल्या मजूरीची भरपाई करणे हाही या योजनेमागचा उद्देश आहे.
 • प्रत्येक लाभार्थ्यामागे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना अनुक्रमे २०० व १०० रु. प्रोत्साहन भत्ता मिळतो.
 • ही योजनेचे लाभ Direct Benefit Transfer (DBT) या योजनेखाली दिले जातात.