Contents
show
आर्थिक वाढ
देशातील वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ होणे म्हणजेच आर्थिक वाढ होय. आर्थिक वाढीचे मापन जी. डी. पी. च्या संदर्भात केले जाते. आर्थिक वाढ ही एक संख्यात्मक संकल्पना आहे.
आर्थिक वाढीचा दर – एखाद्या वर्षात झालेले उत्पादन (GDP) मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढलेले आहे, त्यास आर्थिक वाढीचा दर असे म्हणतात.
आर्थिक वाढ ही धनात्मक असू शकते तसेच ती रृणात्मक सुध्दा असू शकते.
आर्थिक विकास
आर्थिक विकास ही एक गुणात्मक संकल्पना आहे. आर्थिक विकासात आर्थिक वाढीबरोबरच संरचनात्मक बदल, आर्थिक-सामाजिक कल्याण यांचा समावेश होतो.
जागतिक स्तरावरील मानव विकासाचे निर्देशांक –
यू. एन. डी. पी. कडून दरवर्षी मानव विकास अहवाल जाहीर केला जातो. या अहवालात पुढील पाच निर्देशांकाचा समावेश असतो.