Skip to content- केंद्रीय कॅबिनेटने आयुष्मान भारत–राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान या योजनेस मंजुरी दिली आहे.
- ही योजना राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजना व जेष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या दोन केंद्र–पुरस्कृत योजनांचे एकत्रीकरण करून तयार केली आहे.
- या योजनेमध्ये प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपये आरोग्य विमा संरक्षण देण्याची तरतूद आहे. या योजनेंतर्गत देशातील सुमारे दहा कोटी कुटुंबाना आरोग्य विमा संरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
- योजनेचा लाभ कोणाला घेता येणार –
- ग्रामीण भागांत जे कुटुंब एकाच खोलीत राहाते आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे,
- ज्या कुटुंबात १६ ते ५९ या वयोगटातील कुणीही नाही,
- ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे असे कुटुंब,
- कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब,
- अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि
- मजुरीवर पोट भरणारे कुटुंब.
You Might Also Like