आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court Of Justice)

आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court Of Justice) ची स्थापना १९४५ साली यू. एन. चार्टरने करण्यात आली. या न्यायालयाने Permenant Court Of International Justice ची जागा घेत १९४६ साली आपले कार्य सुरू केले.

रचना

आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५ न्यायाधिशांचा समावेश असतो. त्यांचि निवड ९ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. संयुक्त राष्ट्र आमसभा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद या न्यायाधिशांची निवड करते. दर ३ वर्षांनी ५ न्यायाधीश निवृत्त होऊन त्यांच्या जागी नवीन न्यायाधिशांची निवड केली जाते. एकाच वेळी एकाच राष्ट्राचे २ न्यायाधीश आंतरराष्ट्रीय न्यायालयात असू शकत नाही. सध्या बारताचे दलवीर भंडारी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयावर न्यायाधीश आहेत.

मुख्यालय

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय नेदरलॅंड्समधील हेग येथील PEACE PALACE येथे आहे.

कार्ये

आंतरराष्ट्रीय न्यायालय सदस्य राष्ट्रांमधील कायदेशीर वादांची सोडवणूक करते. तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय संघटनांकडून व संयुक्त राष्ट्र आमसभेकडून सोपविलेल्या कायदेसीर प्रश्नांबाबत सल्लागारी मत व्यक्त करते.

सदस्य राष्ट्रे

एकूण १९३ सदस्य आहेत.