अस्पृश्यता जातीव्यवस्थेचे निर्मुलन

Contents show

 महात्मा जोतिबा फुले यांचे अस्पृश्यांच्या उध्दाराचे कार्य :

कनिष्ठ वर्गातील लोकांचे अज्ञान, निरक्षरता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी त्यांच्या मुक्ततेसाठी कार्य करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ग्रंथ, काव्ये अशी उपयुक्त पुस्तके लिहली. वर्णव्यवस्था हिंदू समाजाला लागलेला कलंक आहे. म्हणून तो दूर करण्याचे कार्य जोतिबांनी हाती घेतले. जोतिबा फुले सामाजिक चळवळीचे आद्यप्रवर्तक होते. अस्पृश्यता ही समाज जीवनातील लाजिरवाणी बाब आहे. अस्पृश्यांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी म्हणून त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे कार्य जोतिबांनी हाती घेतले. अतिशूद्रांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले.

अस्पृश्यासाठी शाळा :

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाप्रमाणे अस्पृशांच्या शिक्षणालाही महत्व दिले. शिक्षणाशिवाय त्यांच्यात परिवर्तन होणार नाही. शिक्षणाच्या अभावामुळे सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. तसेच त्यांचे आर्थिक शोषण वाढले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण देवून जागृत करणे आवश्यक आहे असे त्यांना वाटले. म्हणून महात्मा फुलेंनी तत्कालीन लोकांच्या रुढी परंपरेचा विचार न करता अस्पृश्यामध्ये शिक्षण प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले. इ.स.१८५२ मध्ये पूणे शहरात नाना पेठेत अस्पृश्यासाठी पहिली शाळा काढली. आणि हजारो वर्षे अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना ज्ञानाचे /शिक्षणाचे सर्व प्रथम दरवाजे उघडून देण्याचे काम केले. अस्पृश्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी शिक्षण देवून त्यांना शहाणे करणारे महात्मा फुले पहिले समाजसुधारक ठरतात. सुरुवातीस सनातण्यानी फुलेनी सुरु केलेली शाळा बंद पाडली. तरीही ते नाराज झाले नाहीत. अस्पृशांच्या शिक्षण कार्यात अधिकच जोाने कार्य करु लागले. इ.स.१८५२ मध्ये पुण्यातच वेताळ पेठेत सदाशिवराव बाल्लाळ गोवंडे यांच्या वाड्याात अस्पृशांसाठी पुन्हा शाळा सुरु केली. अल्पावधीत विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. फुलेंच्या या शैक्षणिक कार्यास अनेक युरोपीयन/ स्थानिक दानशूर लोकांनी आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शाळांचा विकास होवून अस्पृश्य विद्यार्थी शिक्षण घेवू लागले. इ.स.१८५८ पर्यंत त्यांनी संस्थेार्फत पुण्यात तीन शाळा सुरु केल्या. शाळेतील मुलांना पाणी पिण्याची अडचण निर्माण झाली. म्हणून आपल्या रहात्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. अस्पृश्यांच्यात जागृती व्हावी म्हणून त्याच वर्गातील लोकांचे सहकार्य त्यांनी घेतले. लहूजी साळवे, मांग आणि राणोजी महार यांनी महार-मांग वाड्याातून मुलांना शाळेत आणण्याचे काम केले. राघो सुखराम, विष्णू मोरेश्वर, धुराजी अप्पाजी चांभार, केसो त्र्यंबक, विठोबा बापूजी, विनायक गणेश, धोंडो सदाशिव, गुनु राझुजी, ग्यानु शिऊजी व गणू शिवजी मांग यांनी दलितांच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले.

 

अस्पृश्यता निवारण :

महात्मा फुले यांनी अस्पृश्यतेबाबत विचार मांडले व प्रत्यक्षात कामही केले. अस्पृश्यांची कैफियत ही फुल्यांनी लिहलेली पुस्तिका म्हणजे या समाजावरील अत्याचाराची कहाणीच आहे. पेशवाईत अस्पृश्यांना कसे निर्दयपणे वागविले जात होते. त्यांना वेठबिगारी करावी लागत असे. त्यांना इमारतीच्या पायाखाली जिवंत गाडले जात असे. अस्पृश्य बांधवांना बहिष्कृत न मानता त्यांच्याशी बंधूभावाने वागण्यास सुरुवात केली पाहिजे आणि सर्वांनी मिळून दास्यमुक्तीसाठी झटले पाहिजे असे आवाहनही फुलेनी केले आहे. महार मांगांना बंधनमुक्त करुन त्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला केला. अस्पृश्यतेुळे शुद्र अतिशुद्रांना वेगवेगळ्याा व्यवसायाचे दरवाजे बंद झाले होते. पशुपेक्षाही हिन जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या जातीव्यवस्थेतील महार-मागांना बंधमुक्त करुन त्यांच्या सर्वागीण प्रगतीचा मार्ग खुला केला तर देशाच्या ज्ञान भांडारात, संपत्तीत, लौकिकात भर घालतील अशी अशा फुल्यांना वाटत होती. कोणतीही एक जात श्रेष्ठ व कनिष्ठ समजणे संकुचितपणाचे आहे. अस्पृश्यांच्या अन्यायाबाबत त्यांनी ब्राह्मणांना जबाबदार धरले तसेच बहुजन समाजातील लोकही तितकेच जबाबदार आहेत असे त्यांचे मत होते. गुलामगिरी हा ग्रंथ लिहून वरिष्ठ वर्गींयावर कठोर टिका केली. जातीयतेवर व दाभिंकतेवर आसूड ओढला आहे. ब्राहमणाकडून शुद्रबांधवांची फसवणूक कशी होते आहे हे सांगण्यासाठी मी हा ग्रंथ लिहला. असे ते म्हणत.

सत्यशोधक समाजाची स्थापना :

सामाजिक सुधारणेसाठी शुद्रातिशुद्राची स्थिती सुधारावी यासाठी जोतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. (१८७३ मध्ये) धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे हे सत्य शोधक समाजाचे उदि्‌दष्ट होते. ‘सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी’ या पुस्तकातून सत्यशोधक समाजाचे विचार मांडले आहेत. ‘सर्वसाक्ष जगत्पती, त्याला नकोच मध्यस्थी’ हे या समाजाचे ब्रीदवाक्य होते. या समाजाचे उदि्‌दष्ट स्पष्ट करताना ते म्हणतात. ब्राहमण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यातून शुद्र लोकांना मुक्त करण्याकरिता त्याचे वास्तविक अधिकार समजून देण्यासाठी हा समाज आहे. समता, बंधुता व स्वातंत्र्य हे विचार रुजविण्यासाठी त्यांनी हा समाज स्थापन केला. सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळावी. समाज जागृती व्हावी हा मुख्य हेतू होता. कनिष्ठ वर्गाला त्यांच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ही एक चळवळ होती.

राजर्षी शाहू महाराज १८७४-१९२२ :

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात कोल्हापूर येथील शाहू महाराजांचे नांव अविस्मरणीय ठरते. त्यांनी आपल्या राज्यात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव अशा सुधारणा करुन लोककल्याण करण्याचा प्रयत्न केला. म.फुले यांनी सुरु केलेले समाजसुधारणेचे कार्य पुढे नेण्याचे कार्य छ.शाहूनी केले. या कार्याुळे त्यांचे व्यक्तीमत्व कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व भारतातही लोकप्रिय झाले. सर्वसामान्यांचे कल्याण करणे. बहुजन समाजाची विविध सामाजिक बंधनातून सुटका करणे, त्यांना साक्षर बनविणे, त्यांच्यात जागृती निर्माण करुन प्रगत बनविण्यासाठी प्रयत्न करणे. आपले कर्तव्य मानले. त्यानुसार आयुष्यभर अस्पृशोद्धाराचे कार्य केले. आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण करण्यात म.फुले, राजर्षी शाहू, महर्षी कर्वे, वि.रा.शिंदे, डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. राजर्षी शाहू महाराजाबद्‌दल वि.रा.शिंदे म्हणतात ‘‘शाहू राजा नुसता मराठा नव्हता, ब्राम्हणेतरही नव्हता, तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता. तो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा स्वाभाविक तरंग होता. हेच जास्त खरे’’ कानपूर येथील कुर्मी, क्षत्रिय, जातीय परिषदेत १९१९ मध्ये शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी देण्यात आली. शाहू महाराजाचा जन्म इ.स.१८७४ मध्ये कागलचे जहागीरदार व कोल्हापूर संस्थानचे रिंजट आबासाहेब घाटगे यांचे पोटी झाला. त्याचे मुळ नाम यशवंत. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या गादीवर वारस नव्हता म्हणून शाहूंना कोल्हापूरच्या महाराणी आनंदीबाईने दत्तक घेतले. १८८४ मध्ये दत्तक विधान झाले. राजकोट व धारवाड येथे शिक्षण झाले. १८८१ मध्ये ते १७ वर्षाचे असताना बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची मुलगी लक्ष्मी बरोबर विवाह झाला. लक्ष्मीचे वय ११ वर्षाचे होते. २ एप्रिल १९९४ रोजी त्यांचा राज्याभिषेक विधी झाला. तेव्हापासून ६ मे १९२२ असे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. प्रारंभीच्या २ वर्षात त्यांनी अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले.

 

महाराजांचे सामाजिक सुधारणेचे कार्य :

छत्रपती शाहू महाराजांच्या अगोदर सामाजिक जीवनात जातीव्यवस्थेचे प्राबल्य होते. जातीभेदामुळे भारतीय समाजात/राजकारणात एकता राहिली नव्हती. समाजातील वरिष्ठ वर्गातील जातीनी परंपरेच्या आधारे धार्मिक बंधनाद्वारे कनिष्ठ जातीवर अनेक बंधने लादली होती. या जातीभेदामुळे सर्वसामान्य व्यक्तींना माणूस म्हणून असलेले अधिकार मिळत नव्हते. त्यामुळे राष्ट्रीय व सामाजिक ऐक्य नष्ट करणारा जातीभेद संपवून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय होते. यापूर्वीच महाराष्ट्रात अगोदर राजकीय सुधारणा व सामाजिक सुधारणा याविषयी वाद निर्माण झाला होता. सामाजिक सुधारणा नंतर करता येथील अगोदर स्वातंत्र्य मिळविले पाहिजे. असा लोकमान्यांचा आग्रह होता. शाहू महाराजांच्या मते हा वादच चुकीचा आहे. स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशाविरुध्द लढताना सर्व लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर सर्व लोकांना समान अधिकार मिळतील हे सांगणे आवश्यक होते. तरी पण धर्माच्या व जातिसंस्थेच्या प्रभावाखाली असलेल्या नेत्यांनी हा विचार स्विकारल्याने शाहू महाराजांनी जातिभेदाविरुध्द ठाम उभे राहण्याचा दृढ निश्चय केला. जातिभेदाची कालबाह्याता समाजातील विषमता दूर करण्यासाठी उच्च वर्णीयांना पटवून त्याचे मन परिवर्तन करण्यासाठी न्या.रानडे व आगरकरांची धडपड होती. तरीही वरिष्ठ समाजातील प्रतिष्ठा, जन्मजात मिळालेले अधिकार सोडून जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी ते पुढे येण्याचा संभव नव्हता. त्यामुळे जातिसंस्थेतील अन्याय व विषमतेचा जाच ज्यांनी पिढ्याानंपिढ्याा सहन केला. त्या शूद्रातिशुद्राना स्वत:च्या हक्कांसाठी प्रस्तापिताविरुध्द लढा देण्याचा विचार म.फुलेनी मांडला होता. जातिभेद हा आपल्या देशाच्या ऐक्य व प्रगतीच्या मार्गातील धोंड आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली पाहिजे. या विषयी संदेह नव्हता. तरीही जातिभेद नष्ट करणे सहज साध्य नाही. त्यासाठी प्रत्येक जातीने शिक्षण घेवून जनजागृतीच्या माध्यमाने आपले सामर्थ्य व संघटन वाढविले पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यांनी जातीपरिषदांना उत्तेजन दिले मात्र दूरदृष्टी ठेवा पायापुरते पाहू नका. आपल्या प्रयत्नातून जाती बंधने दृढ होणार नाहीत. जातिभेदाची तीव्रता वाढणार नाही. याची दक्षता घेण्यास सुचविले. जातिभेद निर्मुलनांच्या संदर्भात शाहू महाराजांनी केवळ विचारच मांडले नाहीत तर आपल्या आचाराने याविषयी समाजासमोर आदर्श ठेवला. आवश्यक तेथे कायदे करुन या विचाराची अंलबजावणी करण्याचे कार्य केले.

 

वेदोक्त प्रकरण :

वेदोक्त प्रकरण हे राजर्षी शाहूंच्या जीवनात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीतील महत्वाचे प्रकरण आहे. या प्रकरणामुळे ब्राहमणशाहीची/सनातन्यांची समाजावरील पकड ढिली झाली. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ जिवंत ठेवली असे न. र.फाटक म्हणतात. शाहू महाराजांनी सुरुवातीपासून जातिभेदाला विरोध करुन समाजाभिमुख धोरणांचा स्विकार केला होता. महाराजाचे धोरण सामाजिक समता व देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असले तरी अज्ञानी व अंधश्रध्द समाजावर निरनिराळी बंधने लादून आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या सनातन्यांना हे मान्य होण्यासारखे नव्हते. सत्तेवर आल्यानंतर महाराजांना हे जाणवले होते. संस्थानच्या कारभारात ब्राहमण किंवा उच्च जातीच्या लोकांचे प्रमाण अधिक व बहुजनांचे अतिशय अल्प आहे हे पाहून १८९४ पासूनच अब्राहमनांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. अब्राहमनाला नोकरी म्हणजे आपले आर्थिक नुकसान व सामाजिक अवमुल्यन होय अशी धारणा ब्राहमनाची बनली. म्हणून या वर्गाने महाराजांच्या सामाजिक समता निर्माण करण्याच्या कार्याला विरोध केला. अशा या परिस्थितीतच वेदोक्त प्रकरणाची भर पडली. या प्रकरणाने एका महान धार्मिक व सामाजिक बंडखोरीला जन्म दिला.

 

अस्पृश्योद्धार :

अस्पृश्यता म्हणजे मानवजातीला लागलेला कलंक असून, सामाजिक समतेच्या दृष्टीने तो हानिकारक आहे. याची जाणीव शाहू महाराजांना होती. जन्मधिष्टित वर्णव्यवस्थेतून अनेक जाती व जातिभेद निर्माण झाले. समाजाचे स्वरुप विस्कळीत झाले. भेदातून द्वेष वाढला व देशाची एकता नष्ट झाली. याचा परिणाम केवळ धार्मिक अवनती होवून थांबला नाही तर परकियांच्या स्वाऱ्या होवू लागल्या. भारत पारतंष्यात बरेच दिवस अडकला. मानवतेच्या दृष्टीने कलंक असलेली अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे. असे महाराजांचे मत होते. निरनिराळ्या सभा संेलनात ते मत त्यांनी व्यक्त केले. केवळ बोलून व ठराव करुन न थांबता त्याप्रमाणे आचरण करुन अस्पृश्योद्वाराचे कार्य शाहू महाराजांनी केले. जातिबंधनांनी व दारिद्र्यांनी गांजलेल्या समाजात शाहू महाराजांनी शिक्षणाची आवड निर्माण केली. अस्पृश्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळेल अशी व्यवस्था केली. १९०७ मध्ये कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी ‘‘मिस क्लार्क वसतिगृह’’ सुरु केले. त्याठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली. मराठ्याांसाठी सुरु केलेल्या व्हिक्टोरिया वसतिगृहात अस्पृश्य व मुसलमान विद्यार्थ्यांचीही सोय केली. पुढील काळात अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करुन स्पृश्य विद्यार्थ्यांच्या शाळेत अस्पृश्यांना समाविष्ट करण्याचा आदेश काढला. इ.स.१८९९ च्या आदेशाने शाळेत शिक्षकांनी अस्पृश्यता मानायची नाही. अस्पृश्यांना इतर मुलांप्रमाणे वागवावे अशी आज्ञा केली. त्यामुळे अस्पृश्यामध्ये शैक्षणिक प्रसार झाला. शिक्षणाचे त्यांना महत्व समजले. यामुळेच त्यांच्या उन्नतीस खरी सुरुवात होईल. असे शाहू महाराजांचे धोरण होते. शाहू महाराज गादीवर आले तेव्हा १८९४ साली संस्थानात अस्पृश्य समाजाची संख्या सुारे १ लाख होती. त्यांच्या शिक्षणाची गरज शाहू महाराजंाना वाटली त्यासाठी महाराजांनी पुढील धोरणांचा स्विकार केला.

 1. २५ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण सक्ती व मोफत करण्याचा निर्णय घेतला. ४ मार्च १९१८ रोजी त्याची अंलबजावणी केली.
 2. अस्पृशासाठी असलेल्या शाळांच्या संख्येत वाढ केली. ते सत्तेवर आले तेव्हा ५ शाळा होत्या. १९१७ साली त्यांची संख्या २७ झाली.
 3. अस्पृश्य विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत दिली.
 4. खाजगी खर्चातून ३ व दरबारी खर्चातून ४ अशी ७ वसतिगृहे सुरु केली (सोनतळी स्टेशन, बंगला, रुकडी) खाजगी खर्चातून अस्पृश्यांच्या सुरु केलेल्या (पंढरपूर, नागपूर, नाशिक) या वसतीगृहांना भरीव आर्थिक मदत केली.
 5. राजाराम हायस्कूल व कॉलेजमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. तसेच अस्पृश्य विद्यार्थ्यास ५रु.शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली.
 6. दरबारातील मंडळीचे खासगी नोकर म्हणून अस्पृश्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांचे अंगरक्षक महार होते.
 7. जातीवाचक आडनावे बदलण्याचा उपक्रम हाती घेतला. अस्पृश्यांना मराठे व ब्राह्मणाची आडनावे लावली.
 8. २६ ऑगस्ट १९१२ रोजी आपल्या जन्मदिनी मागासलेल्या लोकांसाठी ५० टक्के जागा नोकरीत राखून ठेवण्याचा आदेश काढला.
 9. महार वतने कायद्याने १८१८ साली बंद केली.
 10. गुन्हेगार जातीची (फासेपारधी,गारुडी) पोलिस ठाण्यावरील हजेरी बंद केली. ते म्हणत गुन्हेगार अशी कोणतीच जात नसते. या जातीतील लोकांना नोकऱ्या (रोजगार) देण्याची व्यवस्था केली.
 11. गंगाराम कांबळे या महार व्यक्तीस हॉटेल चालवण्यास आर्थिक मदत केली. (मध्य वस्तीत) स्वत: त्या हॉटेलात चहा फराळ घेत.
 12. शिक्षण, आरोग्य व इतर खात्यात अस्पृश्यता पाळू नये असा नियम केला. आंतरजातीय विवाहाला पाठिंबा दिला. विटाळ (अस्पृश्यता) मानने, कायद्याने गुन्हा ठरविला.
 13. कोल्हापूरचे भवानी मंदिर अस्पृश्यांना खुले केले.
 14. अस्पृश्य व स्पृश्य यांची सहभोजने घडवून आणली.
 15. कोल्हापूर संस्थानात तलाठी अस्पृश्य नेण्याचा निर्णय घेतला.
 16. कोल्हापूर नगरपालिकेच्या अस्थाई समितीचे अध्यक्षपद त्यांनी दत्तोबा पोवार या दलितास दिले होते.

छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्योद्वाराच्या बाबतीत केवळ विचाराच मांडले नाहीत. तर प्रत्यक्ष कृतीही केली. या जातीतील लोकांना समानतेचा अधिकार मिळावा. त्यांचा विकास व्हावा. म्हणून प्रयत्न केले. निरनिराळ्याा परिषदातून सामाजिक सुधारणा विषयी आपले विचार मांडले.

१९२०साली कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे त्यांनी अस्पृश्याची परिषद भरवली. या परिषदेत स्वत: शाहू महाराजांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मुक्ती चळवळीचे नेतृत्व करण्याबाबत प्रोत्साहन दिले.

नागपूर, दिल्ली येथे भरलेल्या अस्पृश्याच्या परिषदाचे अध्यक्षपद स्विकारले व मार्गदर्शन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य :

१९ व्या शतकात भारतीय समाजाला कलंक असलेल्या अस्पृश्यतेच्या निवारणाचे कार्य अनेक समाजसुधारकांनी केले होते. तथापि या सर्वापेक्षा अतिशय निष्ठेने स्वानुभवावर अस्पृश्याना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नवविचाराचा प्रसार करण्याचे व आत्मसन्मानाचा नविन मार्ग दाखविण्याचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. उच्च विद्याविभुषित झाल्यानंतर ही स्वत:च्या स्वार्थाच्या भूमिकेतून आर्थिक प्रलोभनाचा स्विकार न करता, आपले सर्वस्व अस्पृश्य बांधवांच्या उन्नतीसाठी समर्पित केली. आपल्या अस्पृश्य बांधवांची

अत्याचार व गुलामगिरीतून मुक्तता करुन भारतीय घटनेनुसार आपल्या आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अन्यायाविरुध्द समर्थपणे लढण्यासाठी तयार करणारे बंडखोर नेते अलौकिक बुध्दीमत्ता लाभलेले सतत विद्याव्यासंग व ग्रंथ लेखणात रममान होणारे विद्वान व प्रजासत्ताक भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे कार्य असामान्य असे आहे. जातिसंस्था व अस्पृश्यता ही भारतीय समाज जीवनातील कीड असून अस्पृश्यांना अतिशय मानहानीकारक जीवन जगावे लागत होते. महात्मा जोतिबा फुुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, छ.शाहू महाराज, गोपाळबाबा वलंगकर, विठ्‌ठल रामजी शिंदे इत्यादी लोकांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य सुरु केले होते तरी पण वरिष्ठ जातीच्या मानसिकतेत काहीही बदल झाला नाही. डॉ.बाबासाहेब आंबडेकरांना शिक्षण घेताना व नोकरी करताना या मानहानीची व अपमानास्पद वागणूकीची जाणीव झाली होती. त्यामुळे आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करताना त्यांनी अस्पृश्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याच्या कार्याला प्रथम प्राधान्य दिले. अस्पृश्य हेही याच देशाचे नागरिक असून त्यांना ही समानतेचे सर्व हक्क आहेत. न्याय्य हक्कासाठी कोणाच्याही सहानुभूतीची गरज नसून अन्यायाविरुध्द संघर्ष करुन आपले हक्क आपण मिळवले पाहिजेत. याविषयी समाजात जाणीव निर्माण केली. सामाजिक समतेच्या न्याय हक्कासाठी अस्पृश्यांना संघटित करणे व अहिंसक मार्गाने संघर्षासाठी तयार करणे. त्यांचा आत्मविश्वास वाढविणे बाबासाहेबांना महत्वाचे वाटत होते. त्यासाठीच बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह आणि शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणाची चळवळ हाती घेतली.

 

महाडचा सत्याग्रह १९२७ :

महाडचा सत्याग्रह म्हणजे अस्पृश्यासाठी क्रांतीची सुरुवात होती. या सत्याग्रहापासून मुक्ती लढ्यााचे निशान रोवले गेले. आपल्या अस्पृश्य बांधवाच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा सत्याग्रह केला. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ‘सी.के.बोले’ यांनी मुंबईच्या विधिमंडळात एक ठराव पास करुन घेतला. त्यानुसार सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, शाळा व बगीचे इ.ठिकाणी मुक्त संचाराला मान्यता देणारा ठराव पास केला जो पूर्वी या लोकांना नव्हता. एवढेच नव्हे तर अस्पृश्यतेच्या नांवाखाली उच्च वर्णीयाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात होती. या ठरावाची अंलबजावणी न करणाऱ्या नगरपालिका व स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अनुदान बंद करण्यात यावे अशी तरतूद ठरावात होती. या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील तलाव अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु वरिष्ठ वर्गातील लोकांच्या भितीमुळे अस्पृश्यांनी तलावावर जावून पाणी भरण्याचे धाडस केले नव्हते. त्यामुळे बाबासाहेबांनी या चवदार तळ्याातील पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरविले. त्यामुळे अस्पृश्यामध्ये धाडस व आत्मविश्वास निर्माण होईल असे त्यांना वाटत होते. बाबासाहेबांनी आपल्या असंख्य अनुयायासह चवदार तळ्यााचे पाणी ओंजळीने पिले. अन्यायी समाज व्यवस्थेविरुध्द केलेले हे बंड होते. आपण माणूस असून माणसाप्रमाणे जगण्याचा आपला हक्क आहे. अस्पृश्याच्या मनात आत्मसन्मान  निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणारी घटना होती. सवर्णानी याविरोधात टिका केली. त्या सर्वांना बाबासाहेबांनी बहिस्कृत भारत या पाक्षिकातून उत्तरे दिली. भिक मागून किंवा रडून काहींच मिळत नाही, त्यासाठी प्रयत्न करुन प्रेरणा मिळवून हक्क घेतले पाहिजे याची जाणीव या सत्याग्रहामुळे झाली. समाजातील असंतोष विचारात घेवून महाड नगरपालिकेने आपण केलेला ठराव रद्‌द केला. त्यानंतर तळ्यााचे शुध्दीकरण करण्यात आले. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांनी २५ व २६ डिसें.१९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद घेण्याचे ठरविले. थोडक्यात पाण्यासाठी महाड येथे बाबासाहेबांनी केलेला सत्याग्रह जगाच्या इतिहासातील पहिला सत्याग्रह होता. (१९ व २० मार्च रोजी महाड येथे कुलाबा जिल्हा परिषदेने सभा आयोजित केली होती. त्या परिषदेचे डॉ.बाबासाहेब अध्यक्ष होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिकार करुन अनेक ठराव करण्यात आले. त्याचवेळी तळ्याातील पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी सर्व परिषदेला आलेल्या लोकांनी तेथे जावून पाणी पिण्याचे ठरवले)

 

मनुस्मृतीचे दहन १९२७ :

२५ व २६ डिसें. रोजी महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेतच हिंदू समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय घेतला होता. या ग्रंथातील निरनिराळ्याा वचनातून जातीव्यवस्था, अस्पृश्यता व विषमतेचा पुरस्कार असून यामुळेच जाती व्यवस्थेला बळकटी प्राप्त झाली आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी कायम करणारी वचने या धर्मग्रंथात आहेत. त्यामुळे सामाजिक विषमता वरिष्ठ-कनिष्ठ भेदभावाचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथाचे २५ डिंसे.१९२७ रोजी डॉ.बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले. प्रस्तापित जाति व्यवस्था व विषमते विरुध्द केलेली ही बंडाची कृती अस्पृश्यांचा आत्मविश्वास वाढविणारी होती.

 

मंदिर प्रवेशाची चळवळ :

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जसा पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याप्रमाणे मंदिर प्रवेशासाठीही सत्याग्रह करावा लागला. अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर जसा प्रवेश नव्हता, त्याचप्रमाणे त्यांना सार्वजनिक हिंदू मंदिरात ही प्रवेश करण्यास बंदी होती. त्यांच्या मंदिर प्रवेशाने मंदिरे बाटणार होती. मंदिरात प्रवेश केल्याने अस्पृश्याचे प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव बाबासाहेबांना होती. अस्पृश्यांना सन्मानाने व हक्काने रहावयास मिळणार की नाही हे पाहण्यासाठी मंदिर प्रवेशाची चळवळ त्यांना आवश्यक वाटत होती.

अंबादेवी मंदिर सत्याग्रह १९२७ :

अमरावती येथे अंबादेवीचे प्राचीन मंदिर आहे. परंपरेप्रमाणे या मंदिरातही अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ.पंजाबराव देशमुखाच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरु झाला. या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी अस्पृश्याने देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्जही केला. सुरुवातीस अर्ज फेटाळण्यात आला. नंतर देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना मंदिर खुले करुन देण्याचे आश्वासन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिले. त्यानुसार मंदिर अस्पृश्यांना खुले झाले. या चळवळीत शामराव गुंड, नानासाहेब अमृतकर हे सक्रिय होते.

पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह १९२७ :

पुणे येथील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते ते खुले करावे यासाठी एस्‌.एम्‌.जोशी, ना.ग.गोरे, रा.के.खाडीलकर, शिरुभावू लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला पत्र लिहून मंदिर सर्वांना खुले करण्याची मागणी केली. परंतु विश्वस्तांना मंदिर खाजगी आहे असा दावा करुन अर्ज फेटाळला. त्यानंतर मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह मंडळ स्थापन करण्यात आले. त्यात शिवराम जानबा कांबळे (अध्यक्ष) पा.ना.राजभोज (उपाध्यक्ष) काका गाडगीळ, विनायक भुस्कुटे, वा.नि.साठे, केशवराव जेधे होते. तसेच न.ची.केळकर, आप्पासाहेब भोपटकर व श्री.म.माटे यांची मंदिर प्रवेशाला अनुकुलता होती. मात्र त्यासाठी सत्याग्रह करण्याची गरज नाही असे वाटत होते. सत्याग्रह मंडळाचे सदस्य ढोंगी आहेत अशी टिका डॉ.आंबेडकरांनी केली होती. त्यामुळे १३ ऑक्टो १९२९ रोजी पुणे मंदिर सत्याग्रह सुरु झाला. एस्‌.एम्‌.जोशी, भुस्कुटे, राजभोज, शिवराम कांबळे, काका गाडगीळ, स्वामी योगानंद इत्यादी कार्यकर्ते मिळून २५० स्त्री-पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला. सत्याग्रहीना मारहाण झाली. निषेध सभा झाली. काही वर्षानंतर या सत्याग्रहाचा परिणाम म्हणून अस्पृश्यांना मंदिर खुले झाले.

नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह :

नाशिक येथे असलेल्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३०-३५ या काळात डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला. मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून ३ मार्च १९३० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अमृतराव रणखांबे, भाऊराव गायकवाड, पा.ना.राजभोज, पतितपावन दास, केशव नारायण देवरे, शंकरराव बर्वे यांनी केले. नाशिकचे जिल्हाधिकारी गॉर्डन हे काळाराम मंदिर सत्याग्रहाकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहत होते. त्यामुळे २ मार्च १९३० रोजी नाशिकचे काळाराम मंदिरच बंद करण्याचा आदेश दिला. ३ मार्चला सत्याग्रहाला सुरुवात झाली. यावेळी १४५ सत्याग्रही होते. त्यात ३९ स्त्रिया होत्या. काळाराम मंदिर खाजगी मालकीचे आहे. असे पुजाऱ्याचे म्हणणे होते. तर त्याला दरवर्षी सरकारी अनुदान मिळते म्हणून ती सार्वजनिक मालमत्ता ठरते. असे सत्याग्रहींना वाटत होते. या लढ्याास सरकार विरुध्द अस्पृश्य असे स्वरुप येऊ नये असे डॉ.आंबेडकरांना वाटत होते. त्यानंतर १ एप्रिल, ७ एप्रिल, व ९ एप्रिल यादिवशी सत्याग्रह झाले. सत्याग्रहीना अटक झाली यात स्त्री-पुरुषांचा समावेश होता. १५ एप्रिलला रामनवमी होती. त्यावेळी सत्याग्रह होवू नये म्हणून १४४ कलम लावण्यात आले. तरीही काही सत्याग्रहीनी मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटक होवून शिक्षाही झाल्या. नंतर २४ मार्च १९३४ रोजी पुन्हा सत्याग्रह करण्याचा विचार होता. परंतु डॉ.बाबासाहेबांनी सत्याग्रह न करण्याचा सल्ला दिला. १९३६ नंतर मंदिराचे दरवाजे उघडले फक्त स्पृश्यांसाठीच या सत्याग्रहामुळे अस्पृश्यांच्या हक्काची जाणीव निर्माण झाली. तसेच अस्पृश्य चळवळीसाठी लढा कसा द्यायचा हे शिकण्यास मिळाले.

 

आयोजित केलेल्या सभा आणि परिषदा :

अस्पृश्यांच्या प्रश्नासाठी व प्रबोधनासाठी डॉ.बाबासाहेबांनी औरंगाबाद, येवला, मुंबईत, मक्रणपूर, तडवळे ढोकी इत्यादी ठिकाणी सभा आणि परिषदा घेतल्या. मानगाव परिषद, अ.भा.बहिस्कृत समाज परिषद, मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद, अ.भा.अस्पृश्य परिषद दिल्ली. यातून शिक्षण सक्तीचे व मोफत मिळावे. कमी शिकलेल्यांना नोकरी मिळावी. स्थानिक स्वराज्य संस्थेत अस्पृश्याचे प्रतिनिधी नेण्यात यावेत. सरकारी खात्यात कर्मचारी म्हणून शिरकाव करा. सर्वासाठी एकच शाळा असावी. महार वतन पध्दतीत फेरफार करा व अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या द्याव्यात. तलाठ्याच्या जागेवर अस्पृश्यांच्या नेणुका कराव्यात. मुंबई इलाख्यातील कायदे मंडळातील शिक्षणमंत्री ब्रहमणेत्तर असावा. मद्यपान व मृत जनावरांचे मांस खाण्यास बंदी घालावी आदी मागण्या करण्यात आल्या. यातील नागपूर, दिल्ली, मानगाव या परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी हजर असण्याबरोबर महत्वपूर्ण कामगिरी बजावली. लोकांनी आपल्या हक्कासाठी संघटित होण्याची, परंपरागत व्यवसाय सोडून सन्मानाने जगण्यासाठी, योग्य असे उद्योगधंदे करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे या अस्पृश्य समाजाचे नेतृत्व डॉ.बाबासाहेबांनी करावे असे आपल्या भाषणातून आव्हान केले.

 

शैक्षणिक कार्य :

अस्पृश्य समाजाची रुढी परंपरागत सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी त्यांना जागृत करणे. डॉ.बाबासाहेबांना आवश्यक वाटत होते. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या कार्यावर भर दिला. अस्पृश्य व्यक्तीही प्रयत्नाने उच्चविद्याविभुषित होवू शकतो. हे आपल्या उदाहरणाद्वारे समाजापुढे मांडले. अस्पृश्य समाजाचे योग्यरितीने शिक्षण झाल्यास ते आपल्या समाजातील लोकांच्या हक्कासाठी जागृत होवून आपले हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करतील असा त्यांना विश्वास होता. अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने वाचनालये, प्रौढासाठी रात्रीच्या शाळा सुरु केल्या. शिक्षणाचे महत्व जानणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्याकडे सहानुभूतीने पाहणाऱ्या त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचीच नेणूक केली. तसेच अस्पृश्यांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती मिळणे आवश्यक आहे म्हणून गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाचा सदस्य म्हणून काम करताना व घटना समितीमध्ये सदस्य म्हणून काम करताना अस्पृश्य वर्गाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सवलती मिळतील याविषयी दक्षता घेतली. १९४६ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्याठिकाणी वसतीगृहाची स्थापना करुन अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याचा व अनुकुल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालाच त्यांनी वाहून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या शैक्षणिक कार्याुळेच अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. यातून शिक्षण घेतलेल्या अस्पृश्य समाजातील लोक आपल्या हक्कासाठी जागृत होवून समाजाच्या कामासाठी तयार झाले.

वृत्तपत्रे व ग्रंथ :

वृत्तपत्र हे समाजाच्या विकासाला चालना देणारे महत्त्वाचे साधन आहे. याची त्यांना जाणीव होती. वृत्तपत्रातून अस्पृश्यावर होणारे अन्याय अत्याचार समाजासमोर मांडणे. स्पृश्य समाजात परिवर्तनाचा विचार रुजविण्यासाठी, अस्पृश्यांच्या वेगवेगळ्याा चळवळीमागील हेतू समजावून सांगण्यासाठी तसेच चळवळीना विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी वृत्तपत्राची डॉ.बाबासाहेबांना गरज वाटत होती. म्हणून १९२० साली शाहू महाराजांनी दिलेल्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने मूकनायक सुरु केले. परदेशात गेल्यामुळे ते बंद पडले. १९२७ मध्ये ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक काढले. परंतु लोकाश्रया अभावी ते जास्त काळ चालले नाही. १९२८ साली समता परिषर्देतर्फे ‘समता’ हे पत्र सुरु केले. याशिवाय ‘जनता’ व ‘प्रबुध्द भारत’ हे वृतपत्रे सुरु केली. यातून अस्पृश्यावर अन्याय करणाऱ्या विविध विषयाची चर्चा घडवून आणली. त्याशिवाय अस्पृश्याना जागृत करण्याचा, संघटित करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला.

राजकीय कार्य :

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय जीवनात धोरणात्मक कार्य केले. गव्हर्नांच्या कायदे कौन्सिलचे सभासद म्हणून काम करताना, ब्रिटिश सरकारबरोबरचे धोरण ठरविताना, कायदामंत्री म्हणून काम करताना व घटनेचा आराखडा तयार करताना अस्पृश्यांना न्यायहक्क कसे मिळवून द्यावयाचे हा एकच विचार ते करत असत. याशिवाय अस्पृश्याच्या शिक्षणाची सोय, त्यावर समान खर्च करण्याची तरतूद, सैन्य व पोलीसदलात अस्पृश्याची भरती, अस्पृश्यांना नोकरीत प्राधान्य देण्याची ३० वर्षाची तरतूद इ. मागण्या त्यांनी केल्या. त्यानुसार सर्व सोई सवलती आज मिळालेल्या दिसतात. डॉ.आंबेडकरांचे कार्य म्हणून अस्पृश्य समाजाची प्रगती होवून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे.

गोलमेज परिषदा :

१९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बोलावण्यात आले होते. त्यावेळी अस्पृश्यावर होणारे अन्याय, अत्याचार व त्याचे खडतर जीवन प्रभावीपणे डॉ.आंबेडकरांनी मांडले. आणि अस्पृश्य बांधवांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली तर सप्टेंबर १९३१ मध्ये भरलेल्या दुसऱ्या परिषदेत महात्मा गांधीच्या उपस्थितीमुळे म.गांधी, डॉ.आंबेडकर यांच्यात स्वतंत्र मतदार संघावरुन मतभेद निर्माण झाल्याने कोणताही निर्णय झाला नाही.

पुणे करार :

गोलमेज परिषदेत स्वतंत्र मतदार संघाबाबत एकमत न झाल्याने पंतप्रधान रॅम्से मॅकडोनल्ड यांनी १९३२ मध्ये जातीय निवाडा प्रसिध्द केला. त्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आला होता. अस्पृश्यांना हिंदूपासून फोडण्याचा या ब्रिटिशांच्या धोरणाला विरोध म्हणून म.गांधीनी आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणामुळे गांधीजीच्या प्रकृतीची काळजी निर्माण झाली. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी एक नवीन योजना तयार केली त्याला डॉ.बाबासाहेबांनी पुणे येथे मान्यता दिली. त्यानुसार स्वतंत्र मतदार संघाऐवजी अस्पृश्यांना राखीव मतदार संघ दिले. याबाबत डॉ.आंबेडकर म्हणतात मी काही दिवसापूर्वी बिकट परिस्थितीत सापडलो होतो. तशी वेळ कोणावरही आली नसेल. एकीकडे भारतातील जेष्ठ नेत्यांचा जीव वाचवण्याची जबाबदारी होती व दुसरीकडे अस्पृश्य बांधवांच्या संरक्षणाचा व कल्याणाचा गंभीर प्रश्न सोडविण्याची जबाबदारी होती. या करारामुळे मी महात्मा गांधीचे जीवनही वाचवू शकलो व दुसरीकडे अस्पृश्यांच्या कल्याणाचा व संरक्षणाचा प्रश्न सोडवू शकलो.

राजकीय पक्ष संघटन :

देशाच्या राजकारणात भाग घेवून अस्पृश्यांचे प्रश्न मांडल्याशिवाय आपले उदि्‌दष्ट साध्य होणार नाही. म्हणून १९३५ च्या कायद्याने होणाऱ्या निवडणूकीसाठी ‘स्वतंत्र मजूर पक्षाची’ स्थापना केली. १९३७ च्या निवडणूकीत या पक्षाने १३ जागा जिंकल्या. बाबासाहेब स्वत:ही निवडून आले. १९३७ ते १९४२ या काळात विधीमंडळात व बाहेर शेतकरी व कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठविला. खोती पध्दत बंद करण्यासाठी प्रयत्न केले. कामगाराचे कामाचे तास आठ केले. कामगारांना निवास व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली. नंतर त्यांनी ‘आखिल भारतीय शेडयुल्ड कास्ट फेडरेशनची’ स्थापना केली. १९५२ च्या निवडणूकीत फेडरेशनने २२ पैकी १३ जागा जिंकल्या. याकाळात वेगवेगळ्याा योजनामधून अस्पृश्यांचे हितसंबंध डावलले जात आहेत हे पाहून त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना स्वतंत्र निवेदने दिली. १५ ऑगस्ट १९४७ च्या पंडित जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळात ते कायदामंत्री झाले. घटनेच्या मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी बाबासाहेबांच्याकडे देण्यात आली. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. अस्पृश्यतेचे निर्मुलन करण्यासाठी घटनात्मक तरतुदी केल्या. अस्पृश्य (दलित) जाती जमातीना राखीव जागा, सोई सवलती इ. तरतुदी करुन आपल्या अस्पृश्य बांधवासाठी अमुल्य असे कार्य केले. हिंदू कोड बिल तयार करुन सर्व घटकांना समान संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो मान्य करण्यात आला नाही. म्हणून डॉ.बाबासाहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आपले लक्ष पूर्णपणे शैक्षणिक कार्यावर केंद्रित केले.

धर्मांतर :

सुरुवातीपासून अस्पृश्यता निवारण करण्याच्या कार्यात डॉ.बाबासाहेबांना जे अनुभव आले. त्यामुळे हिंदू धर्मात अस्पृश्यांना माणुसकीचे अधिकार मिळणार नाहीत. असे त्यांना वाटू लागले. मनुष्यपण मिळविण्यासाठी धर्मांतर आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते. म्हणून १३ ऑक्टोबर १९३५ मध्ये येवला येथील परिषदेत ‘‘मी हिन्दू म्हणून मरणार नाही’’ असे जाहीर केले. ही प्रतिज्ञा त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी पूर्ण केली. नागपूर येथे ऐतिहासिक समारंभात असंख्य अनुयायासह बौध्द धर्माची दिक्षा घेतली. हे त्यांनी केलेले धर्मांतर अस्पृश्य समाजात क्रांतीकारक बदल करणारे ठरले. २० व्या शतकात सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात असामान्य काम करणाऱ्या सुधारकामध्ये डॉ.आंबेडकरांचे नांव सर्वश्रेष्ठ मानले जाते. हजारो वर्षापासून परावलंबी व असहाय्य जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांना माणूस म्हणून स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार डॉ.आंबेडकरांनी मिळवून दिला. अस्पृश्यांना समान हक्क कोणाची सहानुभूती किंवा मेहरबानी म्हणून मिळावेत हे त्यांना मान्य नव्हते. समान हक्काच्या मागणीसाठी अस्पृश्य समाज जागृत व संघटित व्हावा. त्याचे परावलंबीत्व नष्ट व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी अस्पृश्य समाजाला बौध्द धर्माचा संदेश दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यामधील माणूस जागा केला व त्याला ताठ मानेने जगण्यास शिकविले. ही अतिशय महत्वाची सामाजिक घटना होय. भारतीय घटनेच्या आधारे आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत १७ व्या कलमात अस्पृश्यतेला कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.

गोपाळबाबा वलंगकराचे कार्य :

वळंगकर मुळचे दापोलीचे रहिवाशी सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर म.फुलेचे कार्य वळंगकरांनी चालू ठेवले. गोपाळबाबा वळंगकर अस्पृश्य चळवळीच्या प्रारंभीचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांनी ‘अनार्यदोषपरिहारक’ या नावाची संस्था काढली. सत्यशोधक समाजाचे ते क्रियाशील कार्यकर्ते होते. महात्मा फुलेचे ते चांगलेच ओळखीचे होते. वळंगकरांनी पुणे १८९५ साली भरलेल्या सामाजिक परिषदेत मन हेलावून सोडणारे भाषण केले होते. सवर्ण हिंदूनी शाळा, सरकारी गेस्ट हाऊस, पाणवठे, सरकारी नोकऱ्या व व्यापार यात अस्पृश्य बांधवांना हिंदू धर्मियाप्रमाणे प्रवेश द्यावा. काँग्रेसने अस्पृश्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी असे मत मांडले होते. त्यांनी १८८८ मध्ये विटाळ विध्वंसक नावाचे पुस्तक लिहले. त्यांच्या मते जातीभेद व अस्पृश्यता हे दोन काल्पनिक राक्षस हिंदू धर्मात निर्माण झाले आहेत. त्यात परमेश्वराचा मुळीच संबंध नाही. हिंदू धर्म शास्त्रात जातीभेद व अस्पृश्यता परमेश्वराने निर्माण केली असे लिहले आहे. ते खोटे आहे. वळंगकरांनी या पुस्तकात जातीभेद व अस्पृश्यता यासंबंधी अनेक प्रश्न विचारले. त्याचे उत्तर हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्यांनी द्यावीत असे जाहीर आव्हान केले. अस्पृश्यता मानवनिर्मित आहे. असे फुले यांच्याप्रमाणे वळंगकराचेही मत होते. धर्म, इतिहास, समाज, संस्कृती याबाबत म.फुले व वळंगकर यांच्या विचारात सारखेपणा आहे. अस्पृश्यांना लष्करात भरती करण्याचा आग्रह एका निवेदनाद्वारे त्यांनी धरला होता. अस्पृश्यावरील अन्याय अत्याचारास धर्म कारणीभूत आहे असे त्यांचे मत होते. अस्पृश्यांच्या चळवळीतील त्यांच्या योगदानाबद्‌दल डॉ.आंबेडकर म्हणतात. अस्पृश्यतेची चळवळ प्रथम सुरु करण्याचा मान कोणास द्यावयाचा झाल्यास तो ‘अनार्य दोषपरिहारक मंडळास’ व मुंबई प्रातांस द्यावा लागेल. त्यांच्या कार्याची दखल घेवून १८९५ साली महाड लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून कुलाब्याच्या जिल्हाधिकाऱ्याने वळंगकराची नेणूक केली. त्यानंतर २० मार्च १८९५ रोजी होणाऱ्या लोकल बोर्डाच्या बैठकीवर सर्व सवर्ण समाजातील सदस्यांनी बहिष्कार घातला. गणसंख्ये अभावी बैठक स्थगित करण्यात आली. परंतु जिल्हाधिकारी व वळंगकर हे सवर्णाच्या या दडपणाला बळी पडले नाहीत.

महर्षि विठ्‌ठल रामजी शिंदे :

महर्षि विठ्‌ठल रामजी शिंदे कर्ते सुधारक होते. महाराष्ट्रात जे अनेक समाज सुधारक होवून गेले. त्यापैकी एक वि.रा.शिंदे होते. महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या समाज सुधारकाप्रमाणेच वि.रा.शिंदे हे गौतम बुध्दाच्या परंपरेतील एक मोठे सुधारक होते. अस्पृश्यता निवारण्याच्या कामी त्यांचे कार्य महत्वाचे होते. यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. १८ व्या वर्षी ते मॅट्रिक पास झाले. मॅट्रिकनंतर शिक्षक व कारकुणाची नोकरी केली. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.झाले. १९०१ साली मुंबई प्रार्थना समाज व कोलकत्ता ब्राहमोसमाजातर्फे इंग्लडला धर्माचा अभ्यास करण्यासाठी गेले. १९०६ मध्ये अश्रश्र खपवळर ऊशिीशीीशव उश्ररीी चळीीळेप ची स्थापना केली. यांच्यावर आगरकरांच्या विचाराचा प्रभाव पडला होता. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केले. त्यातील भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, णर्पींेीलहरश्रश खपवळर यातून त्यांनी अस्पृश्यतेची भारतीय समाजातील स्थिती विषयी माहिती दिली आहे. वि.रा.शिंदे यांनी १९२४ साली वायकोस (केरळ) येथे अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. पुणे येथील पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहात सक्रिय सहभागी होते. ज्यांना मानवी हक्क पाहिजेत त्यांनी इतर समाजाला मानवी हक्क दिले पाहिजेत हे त्याचे मत होते. १९०३ साली सयाजीराव गायकवाड (बडोद्याचे संस्थानिक) यांनी दिवाण पद देवू केले परंतु त्यांनी ते नाकारले. पद दलितांची सेवा करण्यास प्राधान्य दिले. प्रार्थना समाजाचे कार्य केले. वि.रा.शिंदे यांना जातीचे मोठेपण मान्य नव्हते ते अस्पृश्यांच्या वस्तीत जावून राहिले. मराठा समाज त्यांना ‘महार’ असे संबोधित असे. अश्रश्र खपवळर ऊशिीशीीशव उश्ररीी चळीीळेप ची स्थापना मुंबईत १६ ऑक्टोंबर १९०६ रोजी अस्पृश्यता निवारण कार्यासाठी केली. त्याचा उद्‌देश अस्पृश्य समाजात शिक्षण प्रसार करणे, अस्पृश्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देणे, त्यांच्या सामाजिक अडचणी सोडवणे. अस्पृशांच्या मुलासाठी मोफत वस्तीगृह चालवणे. पुणे नगरपालिकेने संस्थेच्या कार्यासाठी ७ एकर जागा मोफत दिली होती. इंदोरच्या तुकोजी होळकरांनी २०००० रु.देणगी दिली. मुंबई सरकारचीही मदत मिळाली यामुळे ही संस्था नावारुपाला आली. महर्षी शिंदेनी या संस्थेचे व्यवस्थापन अस्पृश्य मंडळीच्या हाती देवून एक आदर्श समाजापुढे ठेवला. वि.रा.शिंदे हे अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे संशोधन करणारे पहिले संशोधक म्हणून ओळखले जातात. १९३३ साली त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहला. या पुस्तकात त्यांनी अस्पृश्यता कशी उदयास आली. ती भारतात कशी रुजली वाढली याची माहिती दिली आहे. या संस्थेच्या कार्याला अनेक उदार दात्यांनी आर्थिक मदत दिली. त्यामुळे या संस्थेच्या देशभर अनेक शाखा कार्य करत होत्या. १९१७ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असा ठराव केला होता. अस्पृश्यतेच्या कार्यासाठी त्याने अस्पृश्यता निवारण परिषदा घेतल्या. त्याच्या या कार्याविषयी वामनराव सोहोनी यांचे मत अस्पृश्यता निवारणाला महात्मा फुले यांनी सुरुवात केली होती. पण मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता निवारण्याचे व्यवस्थित प्रयत्न वि.रा.शिंदे यांनी केले. अस्पृश्यांच्या प्रश्नाला त्यांनी राष्ट्रीय मान्यता मिळवून दिली.

शिवराम जानबा कांबळे :

गोपाळबाबा वळंगकरानंतर अस्पृश्यांच्या चळवळीत शिवराम जानबा कांबळे यांनी महत्वपूर्ण कार्य केले. १९०३ साली सासवड येथे ५१ गावातील महारांची सभा भरवून अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्या अशी मागणी सरकारकडे अर्ज करुन केली. १९०४ साली ‘श्रीशंकर प्रासादिक सोवंशीय हितचिंतक मित्र समाज’ स्थापन केला. या समाजाच्या वतीने ग्रंथालय सुरु केले. अस्पृश्यता निवारणासाठी त्याने अनेक सभा, संेलने, अधिवेशने भरविली. पुण्याच्या पर्वती मंदिर सत्याग्रहात ते सहभागी झाले. १९२० च्या नागपूर येथील अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषदेत त्यांचे भाषण झाले. अस्पृश्यांनी जुन्या चालीरितीचा त्याग करुन अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तयार व्हावे हे त्यांच्या चळवळीचे सुत्र होते. ज्यांनी विषमता निर्माण केली त्यांनीच ती दूर करावी. जातीभेद हे सर्व सुधारणाच्या मार्गातील अडथळे आहेत असे त्यांचे मत होते.