जे शास्ञ हाडांचा अभ्यास करते त्याला Ostology असे म्हणतात. मानवी शरीरात वयोमानाप्रमाणे हाडांची संख्या व वजन बदलत जाते. शरीराच्या एकूण वजनाच्या जवळपास १८ टक्के वजन हे केवळ हाडांचे असते. मानवातील अस्थि संस्था (Skeletel System) पुढीलप्रमाणे.
- बाल्यावस्थेत म्हणजे अगदी अर्भकामध्ये हाडांची संख्या २७० एवढी असते.
- वयोमानानुसार प्रौढ व्यक्तीमध्ये हाडांची संख्या २०६ इतकी कमी होते कारण वयानुसार बालकांमधील काही हाडे एकमेकांना जोडली जातात.
- मानवी हाडे ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, इ. ची साठवणूक करतात. मानवी हाडांमध्ये कॅल्शियम ९०%, कॅल्शियम फाॅस्फेट ६०% तर कॅल्शियम कार्बोनेट हे काही प्रमाणावर असतात.
- मानवाच्या एका हातातील तळहातामध्ये १३ हाडे असतात (५-Meracarpels, ८-Carpels) आणि बोटामध्ये १४ हाडे असतात.
- दंडामध्ये Humerus या नावाचे हाड असते. दंडासमोरील भागात Radius व Ulna अशी दोन हाडे असतात. अंगठ्यामध्ये Radius व करंगळीच्या भागात Ulna .
- मानवाच्या एका पायातील तळपायात १२ हाडे असतात (७-Tarsals, ५-Metatarsal) आणि बोटामध्ये एकूण १४ हाडे असतात.
- गुडघ्याच्या खाली पायामध्ये Tibia व Fibula ही हाडे असतात त्यापैकी Tibia हे हाड शरीराच्या आतल्या बाजूस असते तर Fibula हे बाेहेरील बाजूस असते.
- मांडीमध्ये femur व गुडघ्यामध्ये knee bone किंवा Patella ही हाडे असतात.
- प्रत्येक हातात व प्रत्येक पायात प्रत्येकी ३० हाडे असतात.
- छातीच्या पिंजराच्या बगड्यात एकूण २४ हाडे असतात.
- कवटीमध्ये एकूण २२ हाडे असतात.
- प्रत्येक कानात ३ हाडे असतात.
- मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड मांडीचे हाड असते व सर्वात लहान हाड कानाचे हाड असते.
पाठीच्या मनक्यात एकूण ३३ हाडे असतात. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे- परंतु माकडहाड व ञिकास्थी हे जोडून असल्यामुळे मणक्यात एकूण २६ हाडे गृहीत धरली जातात.
सांध्यांचे प्रकार
दोन हाडे ज्या ठिकाणी एकमेकांना जोडली जातात, तेथे सांध्यांची निर्मिती होते. सांध्यांचे पुढीलप्रमाणे एकूण तीन प्रकार केले जातात.