असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक

असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक –

२०१० च्या मानव विकास अहवालापासून हा निर्देशांक जाहीर केला जात आहे.२०१६ च्या मानव विकास अहवालानुसार, समाजात असलेली असमानता विचारात घेतली असताना मानव विकासाचा स्तर म्हणजेच असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक होय.

हा निर्देशांक HDI प्रमाणेच काढला जातो माञ त्यामध्ये समाजात असणारी असमानता समायोजित केलेली असते.

ज्यावेळी समाजात पूर्ण समानता असते तेंव्हा HDI व IHDI समान असतात. दोन्ही निर्देशांकात जितके जास्त अंतर असेल समाजात तितकी जास्त असमानता असते.