अशोक मेहता समिती

अशोक मेहता समिती (राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन समिती)

स्थापना- १२ डिसेंबर १९७७

अहवाल सादर- २१ ऑगस्ट १९७८

एकूण शिफारसी- २३२

सदस्य सचिव- एस. के. राव

महत्वाच्या शिफारसी
  1. संपूर्ण भारतासाठी द्विस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात यावी.
  2. पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात यावा.
  3. जिल्हा स्तरावरील विकासाची कामे जिल्हा परिषदेकडे सोपवावीत.
  4. प्राैढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे देण्यात यावा.
  5. न्याय पंचायतींना ग्रामपंचायतींपासून विभक्त करण्यात यावे.
  6. जिल्ह्यातील योजना तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती असावी.
  7. १५ ते २० हजार लोकसंख्येसाठी मंडल पंचायतीची स्थापना करण्यात यावी.
  8. निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असावा.
  9. कृषी व ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देण्यात यावे.
  10. जिल्हा परिषदेवर पुढील सहा प्रकारचे सदस्य असावेत. १)प्रत्यक्ष निर्वाचित सदस्य २) दोन महिला सदस्य ३) दोन स्वीकृत सदस्य ४) मोठ्या नगरपालिकेचे अध्यक्ष ५) अनुसूचित जाती, जमातींचे सदस्य ६) ग्रामपंचायतींमधील काही निर्वाचित सदस्य