अर्थसंकल्प- अर्थ, उद्दिष्ट्ये व प्रकार

अर्थसंकल्प- अर्थ व उद्दिष्ट्ये

प्रा. बॅस्टेबल यांच्या मते, “अर्थसंकल्प हे विशिष्ट काळातील उत्पन्न व खर्चाची किंवा वित्तीय समायोजनाची माहिती देणारे पञक असून ते मान्यतेसाठी संविधानाकडे किंवा संसदेकडे सादर केले जाते.”

अर्थसंकल्पाबाबत आपणास असे म्हणता येईल की,

 1. हे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे माहितीपञक असते.
 2.  हे एका वर्षासाठी असते.
 3. अर्थसंकल्पाला सार्वजनिक मान्यता मिळावी लागते.
 4. उत्पन्न कसे मिळवले जाणार आहे व खर्च कसा केला जाणार आहे याची माहिती अर्थसंकल्पात असते.
 5. चालू वर्षाचे अपेक्षित उत्पन्न व खर्च याप्रमाणेच गतवर्षाचे उत्पन्न खर्च याची माहिती अर्थसंकल्पात असते.

अर्थसंकल्पाची उद्दिष्ट्ये

अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामागे पुढील उद्दिष्ट्ये असतात.

 1. उत्पन्न व खर्चाचे नियोजन करणे.
 2. कालबद्ध उद्दिष्ट्ये सादर करणे. एका वर्षात कोणती आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य केली जाणार आहेत याची माहिती देणे.
 3. सुनिश्चित उद्दिष्टांसाठी निधीची किती प्रमाणात आवश्यकता आहे हे स्पष्ट करणे.
 4. निधी संकलन व खर्च यात कार्यक्षमता आणणे.
 5. मागील खर्चाच्या आधारे चालू वर्षाच्या खर्चाचा अंदाज करणे.
 6. उत्पन्न व खर्चाच्या विश्लेषणाचे साधन म्हणून कार्य करणे. उत्पन्न व खर्च यात कोणते बदल होत आहेत ते पाहणे.
 7. लोकांच्या प्रति असणारे आर्थिक इत्तरदायित्व स्पष्ट करणे.

अर्थसंकल्पाचे प्रकार

अर्थसंकल्पाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

शिलकीचे अंदाजपञक

ज्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते असे अर्थसंकल्प.

फायदे

 1. आर्थिक शिस्त
 2. आर्थिक कार्यक्षमता
 3. खर्चाचे प्राधान्यक्रम
 4. सरकारचा किमान हस्तक्षेप
 5. भविष्यकालीन तरतूद

तोटे

 1. आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करता येत नाहीत
 2. कालबाह्य संकल्पना
 3. आर्थिक आपत्ती
 4. कल्याणकारी राज्यसंकल्पनेशी विसंगत
 5. आर्थिक विकासास पूरक नाही
 6. अर्थसंकल्प साधन आहे, साध्य नाही

तुटीचे अंदाजपञक

ज्या प्रकारच्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा कमी असते किंवा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असतो.

फायदे

 1. उत्पन्न व रोजगारात वाढ
 2. मंदी विरोधी
 3. बेरोजगारी घटविणे
 4. आर्थिक विकास
 5. उत्पादनास चालना

तोटे

 1. भाववाढीचा धोका
 2. काळाबाजार
 3. खर्चावर नियंञण नाही
 4. उत्पादनरचना बिघडते
 5. विषमता वाढते

संतुलित अंदाजपञक

अशा अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न व खर्च समान असते.

फायदे

 1.  खर्चावर नियंञण
 2. चलनपुरवठा वाढत नाही
 3. उत्पादनवाढीस उपयुक्त
 4. कार्यक्षमता
 5. अर्थसंकल्पिय परिणाम नाही

तोटे

 1. अर्थव्यवस्थेस उपयुक्त नाही
 2. विकासाला पोषक नाही
 3. मंदी वाढते
 4. खर्चात अपव्यव
 5. सामाजिक लाभ नाहीत

 

पारंपारिक अंदाजपञक

उत्पन्न व खर्च यांच्यावर त्यातील समायोजनावर भर देणारे अर्थसंकल्प म्हणजे पारंपारिक अर्थसंकल्प होय.

कार्यात्मक अंदाजपञक

सरकारची उत्पन्न व खर्च ही साधने असून ती विशिष्ट सामाजिक उद्दिष्टांसाठी(कार्यास) वापरणे म्हणजे कार्यात्मक अर्थसंकल्प होय.

शून्याधिष्ठीत अंदाजपञक

मागील वर्षाच्या खर्चाचा आधार न घेता किंवा मागील वर्षाच्या खर्चाचा आधार शून्य समजून तयार केलेला अर्थसंकल्प.

 

संदर्भ-विकिपेडिया