अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. ही योजना मुख्यतः असंघटित क्षेञातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे. बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे.

सुरुवातीस २०१५ च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांनी या योजनेची घोषणा केली होती. ९ मे २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथून आैपचारिक सुरूवात केली. आणि १ जुन २०१५ पासुन अंमलात आली.

या योजनेमार्फत असंघटित क्षेञातील व्यक्तींना स्वतःच्या निवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

ही योजना स्वावलंबन व NPS Lite scheme या दोन योजनांच्या ऐवजी सुरू केली आहे.

 

  • या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (2015-16 ते 2019-20) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे.
  • १८ ते ४० वर्षे वयाच्या व्यक्तीला सभासद होता येते. १००० ते ५००० रुपयांचे निवृत्तीवेतन.
  • सभासदाच्या मृत्युनंतर त्याच्या पती⁄ पत्नीला तितक्याच रकमेचे निवृत्तीवेतन.
  • दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे.
  • या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर NPS प्रमाणे आयकर सूट. ( सेक्शन 80CCD(1) अंतर्गत ५०००० रु. ची अतिरिक्त सूट)
  • कोणत्याही कायदेशीर सामाजिक सुरक्षा योजनेचे सदस्य नसलेल्या सर्व व्यक्तींसाठी ही योजना खुली आहे.
  • सदस्यत्वासाठी वयोमर्यादा कमीतकमी १८ व जास्तीत जास्त ४०.