अंदाज समिती

१९२१ मधे स्थापन झालेल्या स्थायी वित्तीय समितीमधे अंदाज समितीचा उगम आहे. स्वातंञ्यानंतर तत्कालीन अर्थमंञी जाॅन मथाई यांच्या शिफारसीनुसार १९५० मधे पहिली अंदाज समिती स्थापन केली गेली. सुरुवातीस या समितीची सदस्यसंख्या २५ होती. माञ १९५६ मधे या समितीची सदस्यसंख्या ३० करण्यात आली. समितीचे सर्व सदस्य हे लोकसभेतुन निवडले जातात. लोकसभेचे सदस्य आपल्यामधुन एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व पद्धतीद्वारे या समितीवर सदस्य निवडुन देतात. त्यामुळे सर्व पक्षांना योग्य प्रतिनिधीत्व मिळते. सदस्यांचा कार्यकाल १ वर्ष असतो. या समितीमधे मंञी सदस्य होऊ शकत नाही. समितीच्या अध्यक्षाची निवड लोकसभेच्या सभापतीकडून केली जाते. समितीचा अध्यक्ष निर्विवादपणे सत्ताधारी पक्षाचा असतो.

कार्ये

या समितीचे मुख्य कार्य हे अर्थसंकल्पातील खर्चाच्या अंदाजाची तपासणी करुन कपात सुचविणे हे असते. म्हणुन या समितीला सतत कपात सुचविणारी समिती असे म्हणतात.