अंतोदय अन्न योजना

अंतोदय अन्न योजना

  • ही योजना २५ डिसेंबर २००० रोजी सुरू करण्यात आली. राजस्थान या राज्याने ही योजना सर्वप्रथम लागू केली.
  • या योजनेद्वारे दारिद्र्य रेषेखालील अतिगरीब १ कोटी कुटुंबे निवडून त्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे दर महिना २५ किलो अन्नधान्य पुरविले जाते. २ रुपये प्रति किलो या दराने गहू व ३ रुपये प्रति किलो या दराने तांदूळ यांचा पुरवठा केला जातो.
  • या योजनेत वितरणाचा खर्च राज्य ⁄ केंद्रशासित प्रदेशाने करावयाचा आहे.
  • २००२ पासून अन्नधान्य २५ किलोंऐवजी ३५ किलो पुरविण्यात येते.
  • तद्नंतर या योजनेचा विस्तार करून या योजनेत २.५ कोटी कुटुंबांचा समावेश करण्यात आला.