Profile Photo

विष्णुदास भावे पुरस्कार

विष्णुदास भावे पुरस्कार

विष्णुदास भावे पुरस्कार कोणाकडून दिला जातो?

विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करते.

सुरूवात:

१९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप:

गौरव पदक, स्मृति चिन्ह आणि २५ हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे.

आजवरचे मानकरी:

आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री. काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, शरद तळवलकर, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, दिलीप प्रभावळकर(२००७), रामदास कामत (२००८), शं.ना. नवरे (२००९), फैय्याज इमाम शेख (२०१०), रत्‍नाकर मतकरी (२०११), अमोल पालेकर (२०१२), महेश एलकुंचवार (२०१३), डॉ.जब्बार पटेल (२०१४), विक्रम गोखले(२०१५), जयंत सावरकर (२०१६), मोहन जोशी(2017) आदींना मिळाला आहे.

October 9, 2017

No comments, be the first one to comment !

Leave a Reply

Login

Create an Account Back to login/register