महाराष्ट्र: हवामान

हे अॅप आवडल्यास प्ले स्टोरवर 5 Star द्या

महाराष्ट्र: हवामान भारतामध्ये एकूण 15 हवामान विभाग आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 03 हवामान विभाग आहेत. हवामानविभाग क्र. 07, 09 व 12 हे महाराष्ट्रात आहेत.

 महाराष्ट्र शासनाने स्वत:चे 09 हवामान विभाग तयार केले आहेत.

अति पर्जन्य विभाग :-

या विभागात 250 ते 400 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागात जांभा प्रकारची मृदा आढळते. जांभा मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या मातीस लाल रंग प्राप्त झाला आहे. संबंधीत विभागात दक्षिण कोकणातील   रत्नागिरी व सिंधुदूर्ग आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस अंबोली, ता. सावंतवाडी जि. सिंधुदूर्ग येथे पडतो. या मृदेत आंबा, काजू, वरी, नागली ही पिके घेतली जातात.

अति पर्जन्याचा विभाग :-

225 ते 300 मिली मीटर पाऊस पडतो. या विभागात जांभा विरहीत मृदा आढळते. तांबुस किंवा तपकिरी रंगाची मृदा येथे आढळते. रायगड, ठाणे, मुंबई, नाशिकमधील इगतपुरी हा तालुका येथे ही मृदा आढळते. या मृदेमध्ये तांदूळ, नाचणी, आंबा, काजू, चिकू ही पीके घेतली जातात.

सर्वाधिक पर्जन्याचा पश्चिम घाट माथा विभाग :-

300 ते 500 मिली मिटर एवढा पाऊस पडतो. या विभागात काळी भरडी मृदा आढळते. हा विभाग सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे, कोल्हापूर, सातारा यांच्या काही भागामध्ये आढळते. या मृदेमध्ये रगी, वरी, नाचणी ही पीके घेतली जातात.

संक्रमण पट्टा :-

125 ते 300 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागात तांबूस तपकिरी मृदा आढळते. नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्हयातील काही भाग येथे ही मृदा आढळते. या मृदेमध्ये वरी, रगी ही पीके मोठ्याप्रमाणात घेतली जातात.

पर्जन्य छायेचा विभाग :-

75 ते 125 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागात काळसर व करडी मृदा आढळते. नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्हृयाचा काही भाग येथे ही मृदा आढळते. या मृदेमध्ये तांदूळ, ज्वारी, ऊस, बाजरी, कापूस व भुईमुग ही पीके घेतली जातात.

अवर्षण विभाग :- .

50 ते 70 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागात )खरीब व रब्बीची पिके घेतली जातात. येथील मृदा चुनखडी युक्त काळी मृदा आहे. सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, धुळे या जिल्हयांचा काही भाग या विभागात येतो. या मृदेमध्ये ज्वारी व बाजरी ही प्रमुख पिके घेतली जातात. तसेच ऊस, कापुस, बोरे, डाळींब ही पीके घेतली जातात.

निश्चित पाऊस विभाग :-

70 ते 100 मिली मिटर पाऊस पडतो. या विभागातील मृदा ही मध्यम काळी मृदा आहे. मराठवाडा व विदर्भाचा पश्चिम भाग जळगाव, बुलढाणा अमरावती या जिल्हयांमध्ये ही मृदा आढळते. कापूस, ज्वारी, बाजरी, गहु, सुर्यफूल, केळी व संञी ही प्रमुख पिके घेतली जातात.

मध्यम जास्त पर्जन्य पावसाचा विभाग :-

या विभागामध्ये 90 ते 125 मिली मिटर एवढा पाऊस पडतो. या विभागामध्ये तपकिरी काळी मृदा आढळते. नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड जिल्हयाचा उत्तर भाग, वाशिम, परभणी येथे ही मृदा आढळते. तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहु, सोयाबिन, तीळ व जवस ही पीके घेतली जातात.

जास्त पर्जन्याचा पुर्व विदर्भ विभाग :-

125 ते 175 मिली मिटर एवढा पाऊस पडतो. तपकिरी तांबडी मृदा आढळते. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्हयामध्ये आढळते. तांदळाचे सर्वाधिक उत्पादन या विभागात होते. ज्वारी, आंबा, कापूस ही इतर पिके घेतली जातात.

 

Leave a comment

Your email address will not be published.

2 thoughts on “महाराष्ट्र: हवामान”

    • Rajkumar
error: