आणीबाणी

हे अॅप आवडल्यास प्ले स्टोरवर 5 Star द्या

घटनेच्या अठराव्या भागातील कलम ३५२ ते ३६० यात आणीबाणीविषयक तरतूदी आहेत. अपरिहार्य अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी घटनाकारांनी या तरतूदींचा समावेश घटनेत केला आहे. आणीबाणी दरम्यान घटनादुरुस्ती न करताही संघराज्य व्यवस्थेचे एकात्मिक संरचनेत रुपांतर होते.

भारतीय राज्यघटनेत तीन स्वरुपाच्या आणीबाणी नमुद केल्या आहेत.

१) राष्ट्रीय आणीबाणी(कलम ३५२)-

युध्द, परकीय आक्रमण किंवा सशस्ञ बंडाळी अशा परिस्थितीत.  या आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी असे म्हटले आहे. घटनेत हिला आणीबाणीची उदघोषणा असे म्हटले आहे.

२) राज्य आणीबाणी (कलम ३५६)-

राज्यातील घटनात्मक यंञणा कोलमडल्यास. या आणीबाणी राष्टृपती राजवट असे म्हटले आहे.  हिला  राज्य  आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असेही म्हटले जाते. परंतू राज्यघटनेत हिचा उल्लेख आणीबाणी असा केलेला नाही.

३) आर्थिक आणीबाणी (कलम ३६०)-

भारताचे आर्थिक स्थैर्य किंवा पत धोक्यात आल्यास आर्थिक आणीबाणी घोषित केली जाते.

कलम तरतूद
३५२ राष्ट्रीय आणीबाणी
३५३ राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम
३५४ राष्ट्रीय आणीबाणी असताना महसुल वाटपाच्या तरतूदींचा वापर
३५५ परकीय आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता यापासून राज्यांचे संरक्षण करणे हे केंद्राचे कर्तव्य
३५६ राज्य आणीबाणी
३५७ राज्य आणीबाणी दरम्यान कायदे करण्याच्या अधिकाराबाबत तरतूदी
३५८ आणीबाणी दरम्यान कलम १९ अंतर्गत असलेल्या मूलभूत हक्कांचा संकोच
३५९ आणीबाणी दरम्यान घटनेच्या भाग तीन अंतर्गत असलेल्या मूलभूत हक्कांचा संकोच
३६० आर्थिक आणीबाणी

Leave a comment

Your email address will not be published.

error: